पारंपारिक मारामारीने अर्थात रंगाची उधळण करत वीर यात्रेची सांगता

 

पारंपारिक  मारामारीने  अर्थात रंगाची उधळण करत वीर यात्रेची सांगता

 


वीर दि.२५

    .पुरंदर तालुक्यातील  वीर येथे श्री नाथ मस्कोबानाथाच्या  दहा दिवस सुरू असलेल्या यात्रेची  आज सांगता करण्यात आली. पारंपारिक  मारामारीने  अर्थात रंगाची उधळण करत या  यात्रेची सांगता करण्यात आली आहे  यावेळी मंदिरात सवाई सर्जाचा जयघोष करून मानाच्या पालख्यांवर फुलांची उधळण करत रंग टाकण्यात आला. श्री नाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उस्तव मुर्तींवर रंगाचे शिंपण करून करण्यात आले . याच  उत्सवाला' मारामारी' असे म्हणतात.



   आज दिनानक  २५ फेब्रुवारी रोजी  पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली. त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काट्या ढोल ताशासह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व सर्व मानकरी मंदिरातली मानाच्या पालखीने मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या.त्यानंतर  देऊळवाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, लक्ष्मण शिंगाडे, दादा बुरुंगले यांनी भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली .

भाकणूकीत नंतर दुपारी दीड वाजता रंगाची शिंपण मानकरी जमदाडे यांच्यामार्फत करण्यात आली.एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व पालख्या आपापल्या स्थळी गेल्या यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने यात्रे निमित्त भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, मंदिरस  आकर्षक विद्युत रोषणाई, स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

 

...

 

 

फोटो ओळ- श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे रंगाची उधळण दहा दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?