पिसूर्टी येथे टेम्पो झाला पलटी सुदैवाने जीवित हानी नाही; मात्र चालक जखमी नीरा दि.२६ पुरंदर तालुक्यातील नीरा वाल्हे दरम्यान आज दुपारी एक टेम्पो पलटी झाला आहे. सुदैवाने यामधील कोणालाही मोठी दुखापत झाली नाही मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. प्रत्यक्ष दर्शी स्थानिक लोकांनी दिलेली माहिती अशी की,दुपारी साडेतीन वाजले च्या सुमारास निराबजुकडून वाल्हे कडे एक टेम्पो चालला होता.या टेम्पोच्या मागचा टायर अचानक पुटला.रस्ता अरुंद व तिरका असल्याने टेम्पो लगेचच पलटी झाला. स्थानिक लोकांनी मदत करून चालकाला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या टेम्पो मधून अन्य तीन महिला प्रवास करीत होत्या. दरम्यान वल्हा येथील पोलीस हवालदार संदीप मदने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.टेम्पो चालक आणि मालक याबाबत अद्याप कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

 पिसूर्टी येथे टेम्पो झाला पलटी सुदैवाने जीवित हानी नाही; मात्र चालक जखमी



 नीरा दि.२६

पुरंदर तालुक्यातील नीरा वाल्हे दरम्यान आज दुपारी एक टेम्पो पलटी झाला आहे. सुदैवाने यामधील कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

 प्रत्यक्षदर्शी स्थानिक लोकांनी दिलेली माहिती अशी की,दुपारी साडेतीन वाजलेच्या सुमारास टेम्पो चालक शंकर बनसोडे हे त्याच्या (एम एच 42 बी 5136) टेम्पो मध्ये लोखंडी सळई घेऊन पुण्याहून नातेपुते येथे चालले होते. पिसुर्टी येथे या टेम्पोला एक कार अचानक आडवी आली.चालकाने अचानक ब्रेक दाबला .यामध्ये टेम्पोच्या मागचा टायर अचानक पुटला.रस्ता अरुंद व तिरका असल्याने टेम्पो लगेचच पलटी झाला. स्थानिक लोकांनी मदत करून चालकाला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या टेम्पो मधून अन्य तीन महिला प्रवास करीत होत्या. दरम्यान वल्हा येथील पोलीस हवालदार संदीप मदने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.