Type Here to Get Search Results !

पारंपरिक मिरवणूकिने निरा येथील शिवजयंती उत्सवाची करण्यात आली सांगता

 पारंपरिक मिरवणूकिने निरा येथील शिवजयंती उत्सवाची करण्यात आली सांगता .

 महिलांचा जिजाऊ पुरस्कराने करण्यात आला सन्मान नीरा दि २०


       पुरंदर तालुक्यातील नीरा येथील  अखिल नीरा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दोन दिवस शिवमहोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा जिजाऊ पुरस्कराने सन्मान, शिवचरित्र विषयावर व्याख्यान, दुमजली शिवरथ व पारंपरिक मिरवणूक आयोजित करून शिवमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं.      शनिवारी पहाटे युवकांनी पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योत आणली. सकाळी नीरा शहरातील विविध जाती धर्माच्या तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रीत येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवज्योतीचे स्वागत केले.सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अनंता शिंदे, अभिषेक भालेराव, वैशाली काळे, माधुरी वाडेकर, राधा माने, मंगेश ढमाळ, नीरा पोलीस दुरक्षेत्राचे राजेंद्र भापकर, निलेश जाधव आदींनी स्वागत केले.   शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते अमोल खेसे, साखरवाडी यांच्या शिवचरित्र या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अँड.आदेश गिरमे, डॉ. वसंत दगडे, अँड. विजय भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी विविध क्षेत्रात उलेखणीय कार्य केलेल्या महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायतमधील आजी, माजी सदस्य, विविध सामाजिक संघटनांनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.     आज    रविवारी संध्याकाळी बुवासाहेब चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यानच्या मुख्य बाजारपेठेत पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडलडे यांनी शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मिरवणुकीमध्ये आकर्षक शिवरथ, सनई चौघडा, गोंधळी, महाराजांच्या वेशभुषा केलेले युवक, घोड्यावर स्वार मावळे, ढोल ताशा पथक, हलगी वाद्य पथक, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठिकाठी यांसारख्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बालकांनसह महिला, ग्रामस्थ व तरुणींची गर्दी झाली होती.         संध्याकाळी सहा ते दहा दरम्यान चाललेल्या मिरवणूकीत नीरा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व्यवस्थेत बदल करून सुरळीतपणे सुरू ठेवली होती. नीरेतील सहा ही प्रभागातील सुमारे दिडशे तरुणांनी एकत्र येत शिवमहोत्सव २०२२ यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सर्व जाती धर्माचे तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारे युवक एकत्रित आल्याने सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies