Type Here to Get Search Results !

निरा येथे भरपेठेत चार वाहनांचा अपघात; दोन कारसह दोन दुचाकींच नुकसान


 निरा येथे भरपेठेत चार वाहनांचा अपघात; दोन कारसह दोन दुचाकींच नुकसान


 नीरा दि.२८


  पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दुपारी चार वाहनांचा अपघात झाला सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.भर पेठेत हा अपघात झाल्याने नगरिंमध्ये मात्र मोठी घबराट निर्माण झाली होती.      याबाबत प्रत्यक्ष दर्शी लोकांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजलेच्या दरम्यान निरेटील मुख्य बाजार पेठेत. सातारा येथे राहणारे तनवीर शेख हे इनोव्हा कार (एम एच 11 ए के 5971) मधून बरामतिकडे चालले होते.निरेचे सरपंच तेजश्री काकडे यांच्या घरा जवळ आल्यावर कारमध्ये चालका बरोबर चालकाच्या मांडीवर बसलेल्या मुलाने कारचे स्टेअरींग अचानक वळवले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या (एम एच 12 एम आर 8599) कारला धडकली.धडक इतकी जोरदार होती की,त्या धडके नंतर कार 20 फुटपुढे ढकलली गेली.त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या दोन दुचाकी स्कूटी (एम एच 12 एच के 75, एम एच12 पी आर .2586) या देखील कारच्या खाली आल्याने त्यांचेही नुकसान झाले.अपघाता नंतर स्थानिक लोकांनी तातडीने मदत करून इनोव्हा मधील लोकांना बाहेर काढले.दरम्यान नीरा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.पोलिसांनी इनोव्हाच्या चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान निरां शहरात वाढत मुख्य रस्त्यावर वाढत चालेल्या अतिक्रमणामुळे अपघातांचा धोका वाढत असून.ग्रामपंचायतीने फूट पाथ व रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवावती अशी मागणी होत आहे. Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies