Type Here to Get Search Results !

बापरे धावत्या टेम्पोतून धावत्या टेम्पो मधून सात फ्रीजची चोरी.

 मुर्टी ते नीरा दरम्यान धावत्या टेम्पो मधून सात फ्रीजची चोरी.

नीरा येथील पोलीस दुरक्षेत्रात तक्रार दाखलनीरा दि.22


   बारामती तालुक्यातील मुर्टी ते पुरंदर तालुक्यातील नीरा दरम्यान सातारा अहमदनगर नगर रोडवर धावत्या टेम्पो मधून सात फ्रिजची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत टेम्पोचालकाने नीरा येथे पोलीस दुर्क्षेत्रत फिर्याद दिली आहे.यांदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

यासंदर्भात आज दिनांक 22 फेब्रुवारी रामेश्वर सदाशिव आडसुळ रा.लातूर. यांनी नीरा  पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानीं दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांच्या मालकीच्या आयशर टेम्पो मधुंन रांजणगाव एमआयडीसी येथून वरपुल कंपनीचे फ्रिज घेऊन ते कोल्हापूर व हातकलंगले या ठिकाणी चालले होते. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री  मुर्टी येथील जयमल्हार ढाबा येथे ते चहा पिले. त्यावेळी गाडी मध्ये सर्व  फ्रिज होते.सातारा जिल्ह्यातील वाठर स्टेशन येथे गेल्यावर साई ढाबा येथे जेवणासाठी  त्यानीं टेम्पो उभा केला असता, त्यांना टेम्पोत सात फ्रिज नसल्याचे  आढळले .त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नीरा येथील सीसीटिव्ही पुटेज तपासले असता त्यांना टेम्पोत सात फ्रिज कमी असल्याचे आढळून आले.म्हणजेच मुर्टी ते नीरा या दरम्यान हे फ्रिज चोरीला गेले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर व नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक कैलास गोतपागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हरिश्चंद्र करे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies