"माहिती व जनसंपर्क विभागाने योजनांच्या माहितीची पुस्तिका काढून त्याचे वितरण करावे" : एस.एम.देशमुख. पुण्यामध्ये विकास पत्रकारिता कार्यशाळा, एस. एम. देशमुख यांनी केले महत्त्वाचे वक्तव्य

"माहिती व जनसंपर्क विभागाने योजनांच्या माहितीची पुस्तिका काढून त्याचे वितरण करावे" : एस.एम.देशमुख. पुण्यामध्ये विकास पत्रकारिता कार्यशाळा, एस. एम. देशमुख यांनी केले महत्त्वाचे वक्तव्य पुणे : "बहुसंख्य पत्रकारांना आपल्या लाभाच्या योजनाची माहिती नसल्याने ते योजनांपासून वंचित राहत होते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क विभागाने या योजनांच्या माहितीची पुस्तिका काढून त्याचे वितरण करावे" असे वक्तव्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य एस. एम. देशमुख यांनी केले. विभागीय माहिती कार्यालय पुणे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे माध्यम प्रतिनिधींना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख बोलत होते. यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, स्वप्नील बापट, शरद पाबळे, विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, पुणे सदस्...