जेजुरीतील फरार गुन्हेगाराचा "आका "कोण ? अटक न केल्यास ग्रामीण अधीक्षक कार्यालयात उपोषण करणार -शशिकला वाघमारे यांचा इशारा
जेजुरी,दि.९(वार्ताहर) कुलदैवत खंडेरायाच्या देवदर्शनासाठी राज्यभरातून भाविक भक्त येत असतात ,अठरा पगड जातीधर्माचे हे शहर आहे ,येथील समाज व्यवस्था शांतता व सलोखा जपणारी आहे , परंतु ही ओळख आता पुसली जात असून जेजुरी शहरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत ,दादागिरी ,जीवघेणा हल्ला ,खंडणी मागण्यांचे प्रकार होत आहेत ,गुंडाच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत तक्रार करायला पुढे येत नाहीत .या गुन्हेगारांचा आका कोण ?कोणत्या आमदार ,खासदार यांचा आशीर्वाद त्यांना आहे ?नाझरे ,एखतपूर ,मावडी पिंपरी ,बेलसर या परिसरात महसूल विभागाच्या आशीर्वादाने बेकायदा वाळू उपसा सुरू आहे .तेथेही धमकवण्याचे प्रकार घडत आहेत .पोलीस सुद्धा या कुख्यात गुंडांना पाठीशी घालत आहेत पोलीस ठाणे आणि गुन्हेगारांचे काय साटेलोटे आहे ,? असे अनेक सवाल उपस्थित करत ,दोन दिवसात आरोपी अटक न केल्यास पुणे येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात उपोषण करणार असल्याचे आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले .
जेजुरी शिवेसना(शिंदे गट ) युवा अध्यक्ष ओंकार नारायण जाधव तसेच त्याचा सहकारी हर्षल गरुड याच्यावर अपहरण ,खंडणी मागणे ,पिस्तुलाचा धाक दाखवणे ,जीवे मारण्याची धमकी देणे असा गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे ,याबाबत गुरुवारी (दि.८)पत्रकार परिषदेमध्ये वाघमारे बोलत होत्या ,
वास्तविक पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ करत होते आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर गुन्हा दाखल झाला .ओंकार जाधव व त्याच्या सहकाऱ्यांवर यापूर्वी लोणावळा व जेजुरी पोलीस ठाण्यात सहा ते सात गुन्हे दाखल आहेत तरीही त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई का होत नाही ,
बातमी चौकट @@@@@@
प्रसारमाध्यमाद्वारे पालकमंत्र्यांना साकडे ------
सध्या पुरंदर मध्ये गुन्हेगारी वाढत आहे ,मात्र ,शेजारच्या तालुक्यात कर्तव्यकठोर पालकमंत्री आहेत त्यांना गुन्हेगारीविषयी प्रचंड चीड आहे मात्र ,ते पुरंदर विशेषतः जेजुरीतील गुन्हेगारीबाबत लक्ष का घालत नाहीत ,सत्ताधारी पक्षातील युवा नेता दिवसाढवळ्या पिस्तूलाचा धाक दाखवून खंडणी मागत आहे ,अनेकांवर त्याने जीवघेणे हल्ले केले आहेत . तीर्थक्षेत्र असलेल्या नगरीतील धार्मिक व्यवस्थे वर भीतीचे सावट आहे. ना.अजितदादा पवार यांना लक्ष घालून येथील दहशतीचा बिमोड करण्याचे आवाहन प्रसार माध्यमांद्वारे वाघमारे यांनी करत येत्या दोन दिवसात त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले ,