मला माझी गॅंग सांभाळावी लागते. माझी पोरे कमरेला घोडे लावून फिरतात ,तुला मारायला मला वेळ लागणार नाही. जेजुरीत खंडणीसाठी व्यावसायिकांचे अपहरण

 मला माझी गॅंग सांभाळावी लागते..... माझी पोर कमरेला घोडे लावून फिरतात ,तुला मारायला मला वेळ लागणार नाही..... जेजुरीत खंडणीसाठी व्यावसायिकांचे अपहरण ..




   पुरंदर दि.८


      पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसी मधील  

व्यावसायिकांचे अपहरण करून डोक्याला रिवाल्वर लावून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.तुझा भंगार (स्क्रॅपचा) व्यवसाय आहे.माझ्याकडे गँग आहे.  माझी मुले कमरेला पिस्तूल लावून फिरतात. तुला मारायला वेळ लागणार नाही. अस म्हणत जेजुरीतील व्यावसायिकाकडे 5 लाखाची खंडणी मागण्यात आली आहे . तर दर महिला 50 हजार देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे खंडणी मागणारा जेजुरी येथील शिवसेनेचा ( एकनाथ शिंदे ) शहर अध्यक्ष आहे.त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  या प्रकरणी जेजुरी शहर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे )युवा अध्यक्ष ओंकार नारायण जाधव रा.जेजुरी व हर्षल गरुड रा.बेलसर यांचेसह इतर पाचजणांवर अपहरण करणे,खंडणी मागणे, पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे आदी बाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बजरंग हनुमंत पवार रा.पवारवाडी ,जेजुरी,यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

       या बाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार प्रभारी पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिलेली माहिती अशी की, बजरंग पवार हे शनिवारी ( दि.३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेजुरीतून आपल्या दुचाकीवरून घरी निघालेले असताना त्यांच्या दुचाकीला हर्षल गरुड याने अडवले. तर ओंकार जाधव व इतरांनी त्यांना चार चाकी वाहनामध्ये ( फॉरचूनर एम एच १२एल झेड ९१९१) जबरदस्तीने बसवून मावडी पिंपरी गावच्या हद्दीतील एका शेतात नेली. तेथे डोक्याला पिस्तुल लावून दमदाटी व शिवीगाळ करत पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच "मला माझी गॅंग सांभाळावी लागते. माझी पोरे कमरेला घोडे लावून फिरतात.तुला मारायला मला वेळ लागणार नाही. तुझा एमआयडीसी मध्ये वेस्टेज उचलण्याचा व्यवसाय आहे. मला आठ दिवसात पाच लाख रुपये द्यायचे आणि दर महिन्याला ओंकार भाऊला ५०हजार रुपये द्यायचे". अस म्हणत आठ दिवसांत पैसे देण्याची मागणी करत पुन्हा मोरगाव चौक, जेजुरी येथे आणून सोडले.

         याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३०८(२)१३७(२)१४०(२)३५२,३५१ ,१८९(२)१९१(२)शस्त्र प्रतिबंधक कायदा ३(२५)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत . सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 



आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल


     यातील आरोपींवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपातील पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तरी देखील पोलीस प्रशासन त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यात आली नाही. त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणीच काही करू शकत नाही. अशी जेजुरीकर ग्रामस्थांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.दरम्यान सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शहर युवा अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ माजली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे ,

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..