नीरा भिमा काठच्यांना सतर्कतेचा इशारा सलग पावसाने नदीच्या पाणीपातळीत वाढ.

 नीरा भिमा काठच्यांना सतर्कतेचा इशारा 


सलग पावसाने नदीच्या पाणीपातळीत वाढ. 



पुरंदर : 

   नीरा भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग सहा दिवसांपासून राज्यसह पुणे जिल्ह्यात मान्सून पुर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ओढे नाले प्रवाहित होऊन बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. ओढ्यातून वाहणारे पाणी आता नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नीरा व भिमा नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


    उपरोक्त विषयान्वये मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खो-यामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदयथितीत निरा नदीपात्रात लाटे येथे २६,५२५ क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे. तसेच सदयस्थितीत भीमा नदीपात्रातील को. प. बंधा-यांमध्ये आधीपासूनच पाणीसाठा आहे. त्यामुळे सदयस्थितीतील विसर्ग पाहता भीमा नदीपात्रातील सर्व को. प. बंधा-यांवरून पाणी जाण्याची शक्यता आहे. तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देणेबाबत विनंती आहे. 


हे आपले माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर. 


स्थळ प्रतीवर मा.का.अ. यांची सही असे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.