जेजुरीच्या खंडोबा मंदिरात नवविवाहितांनी केला आनंदोत्सव साजरा : त्याला कारणही तसंच

 जेजुरीच्या खंडोबा मंदिरात नवविवाहितांनी केला आनंदोत्सव साजरा : त्याला कारणही तसंच

ऑपरेशन_सिंदूर नंतर खंडोबा गडावर नवदांपत्यानी केला आनंदोत्सव तर पहलगाम येथील दहशदवादी हल्ल्याचा केला निषेध



पुरंदर दि.८

   पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून पर्यटकांची हत्या केली होती. विशेषता या हल्ल्यात नुकतेच लग्न झालेल्या नवदाम्पत्यातील पुरुषाची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. नुकतच विवाह झालेल्या त्या तरुणीचं कुंकू दहशतवाद्यांनी पुसलं होतं. त्याचा बदला घेणाऱ्या ऑपरेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन शिंदूर हे नाव दिलं होत.बुधवारी मध्यरात्री हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आले आणि संपूर्ण देशभरात आनंद साजरा करण्यात आला. 


   महाराष्ट्रातील जेजुरी येथे असलेल्या कुलदैवत खंडोबा गडावर, खंडोबाचं दर्शन घेऊन महाराष्ट्रातील बहुतेक नवविवाहित तरुण हा आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करत असतो . म्हणूनच आज जेजुरी गडावर आलेल्या नवविवाहित दाम्पत्यांनी आणि जेजुरी येथील मार्तंड संस्थांच्यावतीने ऑपरेशन शिंदूर यशस्वी झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी भारतीय जवानांची आभार मानले. त्याच बरोबर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.



     आपल्या सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल हा आनंदोत्सव साजरा केलाय.. या विशेष मोहिमेत पाकिस्तानमधील विविध दहशतवादी अड्डे उध्वस्त करून आतंकवाद्यांचा खातमा आपल्या सैन्यानं केला. या शूरवीर जवानांच्या शौर्याचा गौरव करत, जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थान येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला, 

              विशेष म्हणजे मंदिरामध्ये दर्शनाला आलेल्या नवदांपत्यांच्या उपस्थितीत, सर्व सेवेकरी व भाविक यांच्यावतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भंडारा उधळून व बुंदी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी "भारत माता की जय, वंदे मातरम व येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणा दिल्या.यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, PSI हनुमंतराव भोईटे, बाल अभिनेता दर्श खेडेकर, पुजारी वर्ग, ग्रामस्थ व सर्व अधिकारी कर्मचारी वृंद आणि भाविक भक्त या उपस्थित हो

ते.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..