Type Here to Get Search Results !

राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेंना वैष्णवी मृत्यू प्रकरणी अटक दोघे ७ दिवसांपासून फरार होते

राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेंना वैष्णवी मृत्यू प्रकरणी अटक 


दोघे ७ दिवसांपासून फरार होते 




पुणे : 

     पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. शुक्रवारी (दि.२३) पहाटे ४:३० वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बावधन पोलिसानी अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते, अटक कशी करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून थोड्याच वेळात माहिती सांगितली जाण्याची शक्यता आहे. 



सासरच्या लोकांच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या ७ दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. 



पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल-

वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा, सुव्यवस्था व प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे. गुन्हा नोंद आहे‌. आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्टवर दिली होती.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies