दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असतानाच, त्या दु:खातूनच कर्तव्याचा नवा अध्याय सुरू झाला. दिवंगत दादांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी राजभवनात साध्या पण भावनिक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वैयक्तिक आघात बाजूला ठेवत, जनसेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला. बुधवारी (दि. २८) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्याच रात्री सुनेत्रा पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळीच राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आणि सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ...