Saturday, January 3, 2026

'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा' - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

 'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा'  - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन 


- नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा 



नीरा : प्रतिनिधी 


         'सन २००४ मध्ये मला आमदारकीला उभे राहण्यास दादांनी माझ्यात मोठा आत्मविश्वास निर्माण केला. तसेच मी आमदार होण्यात ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली त्यामध्ये तसेच सन १९८० मध्ये संभाजी कुंजीर यांना निवडून आणण्यास लक्ष्मणदादा चव्हाण यांचा मोठा वाटा' असल्याचे प्रतिपादन पुरंदरचे  माजी आ. अशोक टेकवडे यांनी नीरा येथे केले.

         पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचंतन सोहळा नीरा ( ता.पुरंदर) येथे पार पडला. त्यावेळी माजी आ. अशोक टेकवडे बोलत होते.

       टेकवडे पुढे म्हणाले की, 'पुरंदरच्या जडणघडणीत दादांचा मोठा वाटा असून माझ्या ४१ वर्षाच्या राजकीय सहवासात लक्ष्मणदादा चव्हाण यांनी माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन करून राजकारणात उत्तम कार्यकर्ते घडविले. लक्ष्मणदादांनी समाजकारण व राजकारण करताना आदर्श कुटूंब कसे असावे याचे उत्तम उदाहरण घालून दिले'. 

      यावेळी  पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी जि.प.सदस्य सुदामराव इंगळे, विजयराव कोलते, सोमेश्वरचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, माजी चेअरमन राजवर्धन शिंदे,‌ जि.प.चे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुका‌ध्यक्ष उत्तम धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय निगडे, सचिन लंबाते, माजी सभापती व शिवसेनेचे नेते अतुल म्हस्के, सोमेश्वरचे व्हा.चेअरमन  मिलिंद कांबळे, संचालक जितेंद्र निगडे, कांचन निगडे, नंदुकाका जगताप, उदय काकडे, ग्रा.पं.सदस्य प्रमोद काकडे, संदीप धायगुडे, डॉ.वसंतराव दगडे, कल्याण जेधे यांच्यासह नीरा व परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व ग्रामस्थांनी लक्ष्मणदादा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. 


     यावेळी चव्हाण कुटूंबियातील माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, अँड. पृथ्वीराज चव्हाण, दयानंद चव्हाण यांच्यासह नीरेतील चव्हाण  मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

       यावेळी माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण यांनी स्वागत केले तर ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण यांनी आभार मानले. 


-----------------------------------------------------------------

                चौकट 


'राजकारणांत लक्ष्मणदादांसारखी उंची गाठता आली पाहिजे' - प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे 


     'लक्ष्मणदादा चव्हाण हे आमदार, मंत्री नसताना देखील त्यांचे अभिष्टचंतन करण्यासाठी विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी उपस्थित राहिले. हे केवळ दादांनी विविध राजकीय पक्षातील जोडलेली माणसे आहेत. माणसं माणसात आणणारे, राजकारणात कितीही मोठ्या संघर्षाची वेळ आली तरी दादा चांगली भुमिका घेतात. कधीही राजकारणात व समाजकारणात संधी मिळाली तर पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. अशा प्रकारची राजकारणात उंची लक्ष्मणदादांसारखी गाठता आली पाहिजे' असे मत जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.

-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Featured Post

'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा' - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

 'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा'  - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन  - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हा...