पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरद विजय सोसायटी करणार मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप. बाळासाहेब वि. निगडे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.

इमेज
 शरद विजय सोसायटी करणार मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप. बाळासाहेब वि. निगडे  सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.  पुरंदर : प्रतिनिधी     पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आता शरद विजय सहकारी सोसायटी मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप करणार असून, सभासद शेतकऱ्यांसाठी विहिर बांधणी, गाई-म्हशी गोठा, पाइपलाइन इत्यादी कारणांसाठी पाच वर्षे परत फेडीचे मध्यमुदत तर शेततळे निर्मितीसाठी सात वर्षं परतफेडीचे दिर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होणार. तरी शेतकऱ्यांनी या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद विजय सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब विठ्ठलराव निगडे यांनी केले आहे.       कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील शरद-विजय विविध कार्यकारी सेवा सह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्योतीबा मंदिराच्या सभामंडपात  खेळीमेळीच्या वातावरणात शनिवारी पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरून सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब निगडे बोलत होते. सोसायटीचे सभासद पृथ्वीराज निगडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन धोरणानुसार आपली सोसायटी पण मध्यमुदत व...

पुरंदर मधील रावडेवाडी येथे एकाचा खून तर तीन जण जखमी

इमेज
 पुरंदर मधील रावडेवाडी येथे एकाचा खून तर तीन जण जखमी   सासवड      पुण्यातील पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी येथे एकाचा खून करण्यात आला आहे. तर तीन जण गंभीर तजखमी झालेत .. रावडे वाडी येथे आज सायंकाळच्या सुमाराची घटना घडलीय ...या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलय....तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आलीत.. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झालाय ..तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघेजण गंभीररित्या जखमी झालेत.. तर यामधील आरोपींची संख्या मोठी असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विविध ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत . आरोपीं पैकी काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे हत्येचं कारण अद्यापही कळून आले नसून यासंदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत..

अपघात पुणे पंढरपूर महामार्गावर जेऊर फाटा येथे अज्ञात टेम्पोच्या धडेत एकाचा मृत्यू

इमेज
 अपघात  पुणे पंढरपूर महामार्गावर जेऊर फाटा येथे अज्ञात टेम्पोच्या धडेत एकाचा मृत्यू  नीरा : दि.२९      पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर जेऊर फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडेत एकाचा मृत्यू  झालाय. अपघातानंतर स्थानिक लोकांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मूर्ती झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.       याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांकडून व पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज शुक्रवारी दुपारी चार वाजलेच्या दरम्यान मृत दिलीप भुजंग थोपटे हे पिंपरे येथून सासवडला जाण्यासाठी आपल्या मोटार सायकल वरून निघाले होते. जेऊर फाटा येथे आले असता जेजुरी बाजूकडून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्यांना समोरून धडक दिली. यामध्ये थोपटे गंभीर जखमी झाले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर नामदेव दगडू थोपटे यांनी नीरा येथील पोलीस चौकीत दिली आहे. याबाबत अधिकचा तपास  सहाय्यक फौजदार  संदीप मोकाशी करीत आहेत.

नीरा येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंती निमित्त 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची भव्य मिरवणुक काढण्यात आली

इमेज
  नीरा येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंती निमित्त 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची भव्य मिरवणुक काढण्यात आली पुरंदर :          पुरंदर तालुक्यातील नीरा येथे पैगंबर जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या १४४५ व्या जयंती निमित्त स्टेशन मस्जिद व नीरा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने नीरा शहरातून 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे निरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे व हिंदू बांधवांनी ठीक ठिकाणी स्वागत केलं.        नीरा (ता.पुरंदर) येथे पैगंबर जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे स्टेशन मस्जिद पासून लोणंदरोड,  नगररोड, बुवासाहेब चौक, अहिल्यादेवी चौक, शिवाजी चौक मार्गे पुन्हा पालखी महामार्गवरून लोणंदरोड व मस्जिद पर्यंत अशी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या दर्गाहच्या 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीमध्ये लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत नागरिक उपस्थित होते. नार- ऐ- तक...

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केली जेजुरी गडावरील कामाची पाहणी

इमेज
 जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केली जेजुरी गडावरील कामाची पाहणी जेजुरी येथे सुरू आहेत विकास आराखड्याची कामे काम लवकर पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना   जेजुरी दि.२७       पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज जेजुरी गडावर खंडोबा मंदिराच्या सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाची आज बुधवारी पाहणी केली. खंडोबाच्या जेजुरी गडावर राज्य सरकारच्या विकासा आराखड्याच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली हे काम सुरू आहे. आज जिल्हाधिकारी यांनी जेजुरी येथील गडावर येऊन या कामाची पाहणे केली.. त्याचबरोबर हे काम लवकर पूर्ण करण्याचा सूचना केल्या. यावेळी त्यांचे सोबत पुरातत्व खात्याचे अधिकारी,पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे व अन्य विश्वस्त,ग्रमास्थ मानकरी,खंदेकरी, व पुजारी उपस्थित होते. 

पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र व मतदार यादी दुरुस्तीच्या हरकती वेळापत्रक जाहीर.

इमेज
 पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र व मतदार यादी दुरुस्तीच्या हरकती वेळापत्रक जाहीर.  पुरंदर :  पुरंदर विधानसभा मतदारसंघात काही मतदान केंद्राच्या इमारती पडल्या आहेत किंवा जीर्ण झाल्या आहेत. ते मतदान केंद्राजवळील खोलीत स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघातील प्रसिद्ध मतदार यादीबाबत कोणत्याही सूचना किंवा हरकती संबंधित मत नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दिनांक 26/9/2023 ते 2/10/2023 या कार्यालयीन वेळेत देता येतील. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असे जाहीर प्रकटन दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी पुरंदर मिनाजी मुल्ला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.          मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1/1/2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 202- पुरंदर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे.  एकूण 410 मतदान केंद्र असुन काही मतदान केंद्र...

भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांत प्रभावी कामगिरी करेल : सचिन लंबाते भाजप जिल्हा चिटणीसपदी संजय निगडे व जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब भोसले यांची नियुक्ती.

इमेज
  भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांत प्रभावी कामगिरी करेल : सचिन लंबाते भाजप जिल्हा चिटणीसपदी संजय निगडे व जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब भोसले यांची नियुक्ती. पुरंदर :         तालुकाध्यक्ष सह विविध आघाड्या, मोर्चांवर पुरंदर तालुक्यातील अनेक दिग्गजांची वर्णी लागलेली आहे. या नव्या नियुक्त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अधिक जोमाने काम करणे शक्य होईल. येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात बूथ सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सर्वसामान्यांना लाभदायक असणाऱ्या योजना आणलेल्या आहे. त्या योजना त्याचबरोबर राज्यामध्ये शिंदे, फडणवीस सरकारने केलेल्या नवनवीन अनेक योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे. त्याचा लाभ त्यांना मिळवून देणे या व अशा प्रकारची अनेक कामांचे प्रभावी नियोजन करून तेच गावागावांमध्ये यशस्वीपणे पोहोचविण्याचे काम हा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथचा अध्यक्ष प्रामाणिकपणे करत असून त्यामुळे अ...

पुरंदर आप युवा आघाडी अध्यक्षपदी महेश जेधे यांची निवड

इमेज
  पुरंदर आप युवा आघाडी अध्यक्षपदी महेश जेधे यांची निवड पुरंदर :         पुरंदर तालुका आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्या अध्यक्ष पदी नीरा येथील महेश अर्जून जेधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीरा शहरासह ग्रामीण भागातील युवकांनी जेधे यांचे अभिनंदन केले.      सोमवार दि. २५ रोजी आम आदमी पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सासवड येथील पक्षाच्या कार्यालयात आम आदमी पार्टी पुरंदरचा युवा आघाडी अध्यक्षपदी निराचे सामाजिक कार्यकर्ते महेश जेधे यांची तर उपाध्यक्ष पदी मावडी क. प. चे सचिन गायकवाड यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती जाहीर केली. यावेळी शेतकरी आघाडी अध्यक्ष संजयनाना जगताप, संघटक अमोल कड, निरा शाखा अध्यक्ष विजय धायगुडे, पिसर्वे शाखेचे शहाजी कोलते, संपतराव मोटे, कुंजीर, रेवण पोटे, सुदाम चव्हाण, विशाल मोहिते आदी उपस्थित होते.      निवडीनंतर पक्षाची ध्येय धोरणे तसेच दिल्ली व पंजाब सरकारची कामे सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवण्याबरोबर पुरंदर तालुक्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे जेधे व गायकवाड यांनी...

*World press freedom index* *लाजिरवाणे... भारत आहे 161 व्या स्थानावर*.. *आपल्यापेक्षा पाकिस्तान, अफगाणिस्तानची स्थिती बरी*..

इमेज
 *World press freedom index*  *लाजिरवाणे... भारत आहे 161 व्या स्थानावर*.. *आपल्यापेक्षा पाकिस्तान, अफगाणिस्तानची स्थिती बरी*..  मुंबई :        लोकशाही चॅनलवर भारत सरकारनं अचानक 72 तासांची बंदी घातली. अगोदर सूचना नाही, नोटीस नाही. थेट कारवाई. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ही मनमानी न्यायालयात टिकली नाही. टिकणारही नव्हतीच. दिल्ली उच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश रद्द ठरवत लोकशाहीला पुन्हा प्रक्षेपण करण्याची परवानगी दिली. सरकारी मनमानीला ही सणसणीत चपराक होती. तरीही चॅनल जवळपास 24 तास बंद राहिले याचं दु:ख आहेच.  या घटनेनंतर देशातील माध्यम स्वातंत्र्याची चर्चा देशभर सुरू झाली. देशातील माध्यम स्वातंत्र्याची स्थिती 2014 नंतर बिघडत गेली हे वास्तव आम्ही मांडलं की, भक्त अंगावर येतात. मात्र ते वास्तव जगानं मान्य केलंय. 14 नंतर माध्यमांवर सरकारचा नको तेवढा अंकुश आला, आपल्याला अनुकूल नसलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी सुरू झाली. पत्रकारांच्या हत्या वाढल्या, पत्रकारांवरील हल्ले वाढले, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचे ...

काळानुसार रूढी आणि परंपरा बदलायला हव्यात : बौद्धाचार्य दादा गायकवाड

इमेज
काळानुसार रूढी आणि परंपरा बदलायला हव्यात :  बौद्धाचार्य दादा गायकवाड   वडिलांच्या अस्थी शेतामध्ये विसर्जित करून दिला जलप्रदूषण टाळण्याचा संदेश    नीरा       आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या, त्या आपण पाळत आलो मात्र काळानुरूप त्यामध्ये काही बदल होत असतात यापूर्वी सुद्धा त्या बदल केले गेले. अनेक वेळा असे बदल होत असतात आणि म्हणूनच आजही आपल्याला काही रुढीपरंपरा बदलणे गरजेचे आहे. ज्यामध्ये समाजहित आहे ते लक्षात घेऊन या रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत असं आवाहन बौद्धाचार्य दादा गायकवाड यांनी केलं आहे.त्याची सुरवात स्वतः पासूनच करायला हवी असही त्यांनी म्हटलं आहे.     पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील रहिवासी असलेले शाहू फुले आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते विष्णू पोपट गायकवाड यांचं नुकतंच निधन झालं... यानंतर त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम पिसुर्टी येथे  पारपडला मात्र त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमानंतर अस्थी विसर्जन पाण्यात न करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. बौद्धाचार्य असलेल्या दादा गायकवाड यांनी याला पाठिंबा ...

जवळार्जून सोसायटीचा १२ टक्के लाभांश. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते लाभांश वाटप.

इमेज
  जवळार्जून सोसायटीचा १२ टक्के लाभांश. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते लाभांश वाटप. पुरंदर : जवळार्जुन विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सभासदांना १२ टक्के लाभांशाचे शटप करण्यात आले.        पुरंदर तालुक्यातील जवळार्जून येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका जगताप, उत्तमराव शिंदे, देवा नाझीरकर, अण्णासाहेब राणे, सुधाकर टेकवडे, रामभाऊ राणे, मामासाहेब गुळूमकर, अनिल उरवणे, खैरे, सुभाष कुतवळ, सयाजी राणे, सोसायटीचे चेअरमन महेश राणे, व्हा.चेअरमन नवनाथ राणे सर्व संचालक मंडळ व मोठ्या संख्येने सभासद बंधू भगिनी  उपस्थित होते. जवळार्जुन विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना १२ टक्क्यांनी लाभांशचे वाटप आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.      पुरंदर उपशाचे पाणी १० नंबर मायनर पासून जवळार्जुनच्या ९ नंबर चारी पर्यंत डिसेंबर...

लोकशाही चॅनलवरील एकतर्फी कारवाई निषेधार्ह आणि संतापजनक : एस.एम.देशमुख

इमेज
 लोकशाही चॅनलवरील एकतर्फी कारवाई निषेधार्ह आणि संतापजनक : एस.एम.देशमुख  मुंबई :    नुकतेच लोकशाही न्युज चॅनलने भाजप नेते किरीट सोमय्या यांची एक बातमी प्रदर्शित केली होती. राज्यात या बातमीच्या दृषांनी खळबळ माजवली होती. सोमय्या यांनी या बाबत कोणतीच भुमिका घेतली नाही. या बातमीची दखल पीआयबीने घेत अचानक कारवाई करीत लोकशाही न्यूज चॅनल ७२ तास बंद ठेवण्याचा आदेश काढला. ही एकतर्फी कारवाई निषेधार्थ आणि संतापजनक असुन माध्यम स्वातंत्र्य वरील या दडपशाहीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम. देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.        माध्यमांचा आवाज बंद करण्याचा देशात सातत्यानं प्रयत्न होताना दिसतो आहे. लोकशाही न्यूज चॅनल पुढील ७२ तास बंद ठेवण्याचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश हा त्याचाच एक भाग आहे. लोकशाही न्यूज चॅनलने मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भात एक बातमी चालविली होती. जी बातमी दाखविली गेली ती खोटी आहे, किंवा त्यात दिसणारी व्यक्ती किरीट सोमय्या नाहीत असा दावा ना...

हरवले आहेत राख येथून कर्नाटकी मजूर बेपत्ता..

इमेज
  हरवले आहेत  राख येथून कर्नाटकी मजूर बेपत्ता.. पुरंदर : राख (ता. पुरंदर) येथे पाइपलाइनच्या कामासाठी आलेल्या मजुरांपैकी एक ३६ वर्षीय मजूर बेपत्ता झाल्याची फिर्याद वाल्हे पोलीस चौकीत दाखल झाली आहे. या बाबत राख येथील मजुरी कामगार विलास पवार बेपत्ता झाल्याची माहिती मुकादम सागर राठोड यांनी आज निरा येथे माध्यमांना दिली.    दोन महिन्यांपूर्वी राख येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामासाठी काही मजूर कर्नाटक राज्यातून आले आहेत. मंगळवार दि. १९ रोजी सकाळी दहाच्या सुमारास विलास टाकू पवार वय ३६ वर्षे हे राहत्या ठिकाणाहून पत्नीला येतो थोडे फिरुन म्हणून बाहेर गेले. ते आज शनिवार दि.२३ रोजी पर्यंत परत आले नाहीत. याबाबत वाल्हा पोलीस दुरक्षेत्रात बुधवार दि. २० रोजी हरवल्याची फिर्याद देण्यात आली आहे. सोबत आलेल्या लोकांनी व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली असता ते मिळून आले नाहीत.     नातेवाईकांनी आज निरा येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना विलास टाकू पवार मुळ रहिवासी टक्कळकी ता. निकोटा, जि. विजापूर हल्ली मुक्काम राख, ता. पुरंदर, जिल्हा पुणे हे गेली पाच ...

पिंगोरी गावच्या उपसरपंचपदी भाग्यश्री शिंदे यांची बिनविरोध निवड

इमेज
 पिंगोरी गावच्या उपसरपंचपदी भाग्यश्री शिंदे यांची बिनविरोध निवड   नीरा दि.२१ पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी गावच्या  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिला सदस्यांची निवड करण्यात आली आहे... भाग्यश्री शिंदे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. आज गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ही निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे उपसरपंचपद रिक्त झालं होतं... यानंतर झालेल्या बैठकीत सर्वांनु मते भाग्यश्री शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.     यावेळ  ग्रामपंचायत. सरपंच संदीप यादव ,माजी उपसरपंच आणि सदस्य  प्रकाश शिंदे, माजी सरपंच आणि सदस्य जीवन शिंदे, सदस्य ज्योती शिंदे, अनीता शिंदे, शुषमा भोसले, ग्रामसेवक मोहिनी कुदळे, इत्यादी उपस्थित होते.  निवडी नंतर पिंगोरी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित  उपसरपंच भाग्यश्री शिंदे यांचा सत्कार केला यावेळी ,सचिन शिंदे, निलेश शिंदे, अरुण शिंदे ,रुपेश यादव ,उत्तम शिंदे,महादेव गायकवाड,कांताराम  शिंदे,महेश शिंदे, मिलिंद यादव ,पोप...

नागपुरात पत्रकारावर रात्रीच्या १२ वाजता हल्ला मराठी पत्रकार परिषदेनेने हल्लयाचा निषेध करत, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  नागपुरात पत्रकारावर रात्रीच्या १२ वाजता हल्ला मराठी पत्रकार परिषदेनेने हल्लयाचा निषेध करत, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी नागपूर :          नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर सोमवारी रात्री १२ वाजता तीन अज्ञात युवकांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार कृष्णा मस्के थोडक्यात बचावले. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून डीसीपी झोन ४ नेही गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.        पूर्व नागपुरातील वाठोडा येथे १४ सप्टेंबर रोजी "शासन आपल्या दारी" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिराला स्थानिक पदाधिकाऱ्याचे सहकार्य होते असे मस्के यांनी बातमीत म्हटले होते. शिबिरात दलालांचा सुळसुळाट असल्याची बातमीही कृष्णा मस्के यांनी त्यांच्या वेबपोर्टलवर लावली होती. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पूर्व नागपुरात वाठोडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून मस्के यांना अटक करण्याची मागणी केली गेली होती. ...

भीषण अपघात : दिवे घाटात टेम्पो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

इमेज
 दिवे घाटात टेम्पो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू तर १९ जण जखमी  सासवड दि.१७  बांधकामाचे साहित्य घेऊन पुण्याकडे जात असलेला एक टेम्पो दिवे घाटात पलटी झालाय..यामध्ये १९ कामगार जखमी झालेत. एक जनाचा मृत्यू झालाय. दिवे घाटातून पुण्याकडे जात असताना दुसऱ्या वळणावर सकाळी हा अपघात घडलाय ...  या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार बंधामाचे साहित्य व कामगारांना घेऊन टेम्पो सासवडहून पुण्याकडे जात होता. दिवे घाटातील दुसऱ्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला. त्यातील सर्व साहित्य आतील कामगारांच्या अंगावर पडले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय तर १९ कामगार जखमी झालेत.जखमी पैकी ४ जणांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात तर १५ जणांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आलंय..   माजी सैनिकांनी केली मदत    दरम्यान हा अपघात घडलं तेव्हा माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर सह सचिव संतोष लक्ष्मण झिंजुरके हे तिथे होते.अपघातानंतर त्यांनी अपघात ग्रस्थांना मोलाची मदत केली. जमखमी कामगारांना इतरांच्या मदतीने बाहेर काढले.अपघाताच...

धक्कादायक प्रकार 'पन्नास द्या नाहीतर वाहन जाऊ देणार नाही, माघारी फिरा' नीरा वाल्हा दरम्यान रेल्वेच्या कामामूळे वाहनचालकांना मनस्ताप.

इमेज
  धक्कादायक प्रकार 'पन्नास द्या नाहीतर वाहन जाऊ देणार नाही, माघारी फिरा' नीरा वाल्हा दरम्यान रेल्वेच्या कामामूळे वाहनचालकांना मनस्ताप. पुरंदर : पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा वाल्हे दरम्यानच्या रेल्वे गेटचे काम गेली दोन दिवस सुरू आहे. रेल्वे विभागाने सुचवलेल्या पर्यायी मार्ग लांबपल्याचा असल्याने चारचाकी व दुचाकी स्वार रेल्वे लाइनच्या शेजारील माळरानातून मार्ग काढत आहेत. मात्र याच संधीचा फायदा स्थानिकांने घेत आता प्रती वाहन पन्नास रुपये वसुली सुरू केली आहे. त्यामुळे नीरा वाल्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.     शनिवारी सकाळी सात ते रविवारी सायंकाळी सात पर्यंत रेल्वे गेटच्या कामा निमित्त वाल्हा नीरा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचे पत्र स्थानिक ग्रामपंचायत, एसटी महामंडळ, पोलीस प्रशासन यांना दिली होती. प्रसिद्धी माध्यमांनी आठवडाभरापासून याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाने जेजुरी वाल्हा बाजुने येणाऱ्या वाहनांना कोठे ही बॅरिकेट न लावल्याने वाहन थेट रेल्वे गेट समोर येत आहे. ऐन वेळी पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक र...

सनी शिंदे, विकास गावकर डिजिटल मिडिया परिषदेचे उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या डिजिटल मिडिया परिषदेची नियुक्ती

इमेज
 सनी शिंदे, विकास गावकर डिजिटल मिडिया परिषदेचे उपाध्यक्ष  मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या डिजिटल मिडिया परिषदेची नियुक्ती  मुंबई : डिजिटल मिडिया परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सनी शिंदे आणि सिंधुदुर्ग येथील पुढारी चॅनलचे ब्युरो चीफ विकास गावकर यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.        सनी शिंदे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची आणि विवेक गावकर यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सनी शिंदे यांनी डिजिटल मिडिया परिषदेचं भक्कम संघटन सातारा जिल्ह्यात उभारलं आहे. जिल्ह्यातील युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलचे संपादक परिषदेच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. विविध उपक्रम राबवून त्यांनी संघटन मजबूत केले. त्यामुळे राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येत आहे. गावकर यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल मिडियातील पत्रकारांना एकत्र करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.        प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उभयतांनी अनुक्रमे...

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद; ऐन गणपती सणानिमित्त गावी जाणाऱ्यांना ४० किलोमीटरचा वळसा.

इमेज
  पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद; ऐन गणपती सणानिमित्त गावी जाणाऱ्यांना ४० किलोमीटरचा वळसा. नीरा :            पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावर, वाल्हे- नीरा दरम्यानचे, थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट शनिवार - रविवारी ३६ तास बंद राहणार असल्याचे रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.         पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वेफाटक शनिवार (दि.१६) सकाळी ७ ते रविवार (दि.१७) सायंकाळी ७ पर्यंत ३६ तास वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रका द्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.          पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ न...

||धक्कादायक बातमी|| मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

इमेज
 ||धक्कादायक बातमी||  मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे  मुंबई :       सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर हवामानाच्या बदलामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमान हे खाजगी विमान आहे. ही दुर्घटना घडताच मुंबई विमानतळावरील विमानांची टेकऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आली आहे. अपघात झालेल्या विमानामध्ये एकूण सहा जण होते. त्याचबरोबर दोन क्रूमेंबर देखील या विमानामध्ये होते. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.         सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशाखापट्टनमच्या विझाग येथून निघालेलं विमान मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी खाली उतरत होतं यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. मात्र जमिनीच्या अवघ्या काही अंतरावर असतानाच विमान क्रॅश झाले.           हे विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीन...

नीरेच्या शिरपेचात मानाचा तुरा इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या संचालकपदी अमृतराज मालेगांवकर.

इमेज
  नीरेच्या शिरपेचात मानाचा तुरा इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या संचालकपदी अमृतराज मालेगांवकर.  पुरंदर :         पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या निरा येथील अमृत ज्वेलर्सचे प्रोप्रायटर अमृतराज मालेगांवकर यांची इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र संचालक पदी नियुक्ती झाली आहे. मालेगांवकर यांचे पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यासह निरा व परिसरातील सराफ - सुवर्णकार व्यवसायीकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.      आय.बी.जे.ए. ही १०२ वर्ष जुनी संस्था आहे. आणि भारत सरकार व पी.एम.ओ कार्यालय यांची एक सल्लागार समिती (सोने व चांदी व्यापार) मध्ये सुद्धा महत्वाची भूमिका  बजावते. या शिवाय दररोज भारतातील सोने - चांदीचे दर देखील आय.बी.जे.ए.  ठरवते. अशा या संस्थेच्या संचालक पदावर निरेतील अमृतराज मालेगांवकर यांना करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.        मालेगांवकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला असता, इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्...

फुकट चहा - पान बरोबर फुकट मसाजही मिळाला पाहिजे.. मुंबई - गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यातूनच मार्ग.

इमेज
  फुकट चहा - पान बरोबर फुकट मसाजही मिळाला पाहिजे.. मुंबई - गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यातूनच मार्ग.  मुंबई :     "चहा, पाणी, नाश्ता फुकट द्या" अशी मागणी कोकणातील एकाही व्यक्तीनं केली नव्हती. केली नाही. तरीही रवींद्र चव्हाण साहेबांनी रायगड जिल्ह्यात प्रत्येक पंधरा किलो मिटरला एक "सुविधा केंद्र" सुरू करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अगदी फुक्कट चहा, पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था केलीय. जेथे हे फुकट मिळणार आहे, त्याचं नामकरण "सुविधा केंद्र" असं करण्यात आलंय. कोकणी जनतेचं मुळ विषयाकडून लक्ष अन्यत्र वेधण्याचा हा अत्यंत बालिश प्रयत्नय. जनतेला गप्प करण्यासाठी त्यांच्या हाती सुविधांचं चॉकलेट देण्याची कोशिश सरकारनं केली आहे. यापुर्वी कोणत्याही वर्षी गणेशभक्तांसाठी अशी फुकटछाप सुविधा केंद्र उभारली गेली नव्हती.       कोकणी जनतेची मागणी काय? मुंबई - गोवा महामार्ग लवकर सुरू करावा ही. सतरा वर्षे कोकणी जनता ती करतेय. सरकार ती पूर्ण करीत नाही. सरकारनं काही दिवसांपुर्वी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. "गणपतीपुर्वी एक...

सासवड येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

इमेज
 सासवड येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन    सासवड दि.१४   पुण्यातील सासवड येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय ...६५ ते ७० वयोगटातील हा व्यक्ती असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही..... कोणाच्या घरातील या वयोगटातील एखादी व्यक्ती हरवली असल्यास सासवड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सासवड पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय..     आज गुरुवारी सकाळी सासवड पोलिसांना एका दुकानाच्या समोर हा मृतदेह आढळून आला.आंगत भगवा शर्ट,पांढरी पँट, परिधान केल्या आहेत तर त्याच्या जवळ दोन पिशव्या आढळून आल्या आहेत. तो वाटसरू किंवा वारकरी असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सोमेश्वर इंजिनियरिंग कॉलेजच्या इमारतीच्या ठेकेदाराला न्यायालयाचा दणका

इमेज
सोमेश्वर इंजिनियरिंग कॉलेजच्या इमारतीच्या ठेकेदाराला न्यायालयाचा दणका  आता ठेकेदाराला द्यावी लागणार नुकसान भरपाई नीरा दि.१२      सोमेश्वर कारखान्याच्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला बारामती जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला असून प्रतिवादी कंत्राटदार अजय कदम यांना दणका दिला आहे. मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीच्या कामात हलगर्जीपणा केला, काम अपूर्ण ठेवले व संस्थेचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान केले याबद्दल कदम यांनी संस्थेला ९३ लाख ६३ हजार ७९४ रूपये नुकसानभरपाई द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे. शिवाय या रकमेपोटी दावा दाखल केल्याच्या तारखेपासून नऊ टक्के व्याजही कदम यांना द्यावे लागणार आहे. दुसरीकडे कदम यांचा संस्थेविरोधातील नुकसानभरपाईचा दावा मात्र न्यायालयाने फेटाळला आहे.        सोमेश्वर कारखान्याने टेंडरप्रक्रियेव्दारे २०१० साली अजय कदम यांच्या अथर्व बिल्डकॉन कंपनीस इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत बांधकाम, वर्कशॅाप इमारत बांधकाम, साईट डेव्हलपमेंट तसेच सोमेश्वर विद्यालय इमारत बांधकाम करण्याचे कंत्राट दिले होते. मात्र इमारत वेळेत उभी राहिली नाहीच शिव...

मराठा आरक्षण आंदोलन बाबत नवी माहिती : जारंगे उपोषण घेणार मागे

इमेज
  मनोज जारंगे यांनी सरकारला दिला एक महिन्याचा वेळ  महिन्यात आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा  पुणे  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेली 15 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या काळात सरकारच्या वतीने अनेकदा शिष्टमंडळ पाठवून जरांगे पाटील यांना वेगवेगळी आश्वासने देण्यात आली मात्र जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम होते. काल सोमवारी जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानुसार जरांगे पाटील यांनी दोन पावले मागे घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, "सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिला नसल्याचे म्हणू नये. त्यामुळे असेही पंधरा दिवस गेले असून, सरकारला आणखी एक महिन्याचा वेळ देण्यात येत आहे. त्यांनी एक महिन्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मात्र, तीस दिवस संपल्यावर 31 व्या दिव...

हिंजवडी येथे मुलाचे अपहरण : सासवड पोलिसांनी केली सुटका : पहा नक्की काय आहे प्रकरण ?

इमेज
आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैशांची चणचण...! हिंजवडीत थेट अल्पवयीन मुलाचे अपहरण...! ३०  लाखांची मागितली खंडणी सासवड पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद  नीरा   : आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणून ताथवडे, हिंजवडी परिसरातून एका व्यावसायिकाच्या १४ वर्षाच्या मुलाचे शास्त्राचा धाक दाखवून तीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्या अपहरण कर्त्याना सासवड पोलिसांच्या मदतीने हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अपहरण झालेल्या १४ वर्षीय मुलाची सासवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे सासवा पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे.    या प्रकरणी सासवड पोलिसांनी तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २१ वर्षे, रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी, पुणे मुळ रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे, अर्जुन सुरेश राठोड वय १९ वर्षे, रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी पुणे, मुळ रा. लांबुरातांडा, ता. निलंगा, जि. लातूर, विलास संजय म्हस्के वय २२ वर्षे, रा. शिवारवस्ती, भुमकरचौक, पुणे मुळ पिंपळगाव, ता. जामखेड जि. अ.नगर यांना अटक केली असून त्यांना हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आह...

निरा नदीत ४ हजार २३० क्युसेक्सने पाणी सोडले

इमेज
  निरा नदीत ४ हजार २३० क्युसेक्सने पाणी सोडले पुरंदर :      गेली दोन दिवस निरा देवघर धरणसाळीत पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरल्याने धरणातून ४ हजार २३० क्युसेक्सने विसर्ग सुरू झाल्याची माहिती निरा पाटबंधारे उपविभागाकडून सकाळी सात वाजता देण्यात आली आहे.       महत्त्वाची सूचना निरा देवघर धरण दिनांक: १०-०९-२०२३ निरा देवघर प्रकल्प , ता. भोर, जि. पुणे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने  निरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले आहे त्यामुळे *धरणातून नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या २४९० क्यूसेक विसर्गमध्ये वाढ करून ठीक सकाळी ७:०० वाजता धरणाच्या सांडव्या वरून ३४८० क्यूसेक व विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक एकूण ४२३० क्यूसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.      यो. स. भंडलकर सहाय्यक अभियंता, श्रेणी १ निरा पाटबंधारे उपविभाग, निरा     ता. पुरंदर, जि. ...

नीरा येथील वार्ड नंबर ६ चा गेल्या पन्नास वर्षापासून रखडलेला रस्त्याच्या प्रश्न मिटला.

इमेज
 नीरा येथील वार्ड नंबर ६ चा गेल्या पन्नास वर्षापासून रखडलेला रस्त्याच्या प्रश्न मिटला.  सदस्य आपाल्यादारी उपक्रमाचे फलित  नीरा :         नीरा (ता. पुरंदर) येथील वार्ड नंबर सहा मध्ये लोकांना रस्त्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत होते. मात्र हा प्रश्न आता मिटला असून नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे व जेष्ठ नागरिक यशवंत जाधव यांच्या हस्ते आज गुरुवारी सुमारे दीड किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.         नीरा येथील वार्ड नंबर सहा मधील घरांचे बांधकाम अत्यंत अस्तव्यस्त पद्धतीने झालं होतं. या वार्डामध्ये घरी जाण्यासाठी लोकांना केवळ पायी मार्ग होता. मात्र नीरेच्या सरपंच तेजस्वी काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच दीपक काकडे यांच्या प्रयत्नातून यावर मार्ग निघाला आहे. मागील काळात नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने सदस्य आपल्यादारी हे अभियान राबविण्यात आलं होत. या अभियानांतर्गत प्रत्येक वार्डामधील समस्या जाणून घेऊन, सदस्यांच्या मार्फत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार होता. त्याचाच एक भाग म्हणून नीरा येथील वॉर...

उमाजी राजांनी भारतीयांच्या मनात सर्व प्रथम क्रांतीची ठिणगी पेटवली : राजेश काकडे

इमेज
 उमाजी राजांनी भारतीयांच्या मनात सर्व प्रथम क्रांतीची ठिणगी पेटवली : राजेश काकडे  आद्य क्रांतिवीर उमाजीराजेंची २३२ वीजयंती उत्साहात साजरी   नीरा दि.७     इंग्रजांनी देश काबीज केल्यानंतर त्यांच्या विरोधात पहिली क्रांतीची ठिणगी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांनी पेटवली आणि त्याच ठिणगीमुळे पुढे अनेक वर्ष स्वतंत्र लढ्याचा यज्ञ पेटत राहिला. त्यातुन पुढे जाऊन देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे या आद्य क्रांतिवीराला आपण कायमच नतमस्तक होऊन नमन करायला पाहिजे. उमाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने आंगिकृत केले.असे प्रतिपादन नीरेच आदर्श उपसरपंच राजेश काकडे यांनी आज नीरा येठी बोलताना केले.    नीरा येथे आद्य क्रांतिवीर उमाजी राजे यांची २३२ वी जयंती साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता नीरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे आणि उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते उमाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नीरा येथील अनेक निरेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण,उपसरपंच राजेश काकडे आणि सरपंच तेजश्री काकडे या...

राज्य सरकारकडून पत्रकारांची मुस्कटदाबी सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाहीच्या संपदकावर केला गुन्हा दखल माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न

इमेज
  राज्य सरकारकडून पत्रकारांची मुस्कटदाबी सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाहीच्या  संपदकावर केला गुन्हा दखल       माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न. मुंबई :        सध्याचं सरकार हे हुकूमशाहीच्या मार्गाने चालले आहे. त्यांना प्रश्न विचारणारे आणि सत्य समोर मांडणारे नको आहेत आणि म्हणूनच सरकार आता माध्यमांची मुस्कटदाबी करते आहे. दोन महिन्यापूर्वी  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या बद्दल बातमी  प्रसारित  केल्याबद्दल सरकारने आता लोकशाही वाहिनीच्या संपादकावर गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकारे सर्व माध्यमावर अंकुश आणण्यासाठी आता सरकार पत्रकार आणि माध्यमांवर गुन्हे दखल करून लोकशाहीचा गळा घोटत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.       राजकारण्यांच्या नजरेत  पत्रकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहेत. किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणातही हेच होताना दिसतंय. किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्त वाह...

सातार्‍यात लवकरच पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा : एस. एम. देशमुख अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला हे परिषदेसाठीही भूषणावह

इमेज
  सातार्‍यात लवकरच पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा : एस. एम. देशमुख अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला हे परिषदेसाठीही भूषणावह सातारा :       मराठी पत्रकार परिषद ही शतक महोत्सव गाठणारी संघटना आहे. पत्रकारितेसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पत्रकार संघटना टिकली पाहिजे. संघटनात्मक कामगिरीमुळे राज्यात पत्रकारांची मोठी ताकद निर्माण झाली आहे. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घ्यावी, असा आग्रह राज्यातील डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा आहे. मात्र सातार्‍यातील पत्रकार उत्साहाने काम करत असून ते आपुलकीने परिषदेकडे पाहतात. त्यामुळे ही कार्यशाळा सातार्‍यातच घेतली जाईल. पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला व हरीष पाटणे यांना मिळाले हे परिषदेसाठी भूषणावह आहे, असे गौरवोद्गार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी काढले.      मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने एस. एम. देशमुख सातार्‍यात होते. यावेळी डिजिटल मिडिया परिषदेच्यावतीने राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून एस....

५७ मुकमोर्चातून मराठ्यांचा संयम पाहिला, तो संयम तोडू नका : राजेश काकडे

इमेज
 ५७ मुकमोर्चातून मराठ्यांचा संयम पाहिला, तो संयम तोडू नका : राजेश काकडे   मराठा समाजाला बदनाम करण्याचा सरकारचा डाव        नीरा दि.३      सरकार एका बाजूला मराठ्यांना महामंडळाच्या माध्यमातून मदत करत असल्याचे सांगते. मात्र दुसऱ्या बाजूला मराठ्यांना आरक्षण न देता आरक्षा न देण्याचा छुपा अजिंडा राबवते आहे. असा आरोप मराठा नेते व नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केला आहे. मराठ्यांनी 57 मोर्चे हे शांततेच्या मार्गाने काढले. याची दखल जगभरात घेतली गेली, मात्र याच मराठ्यांना संयम सोडण्यासाठी शासन भाग पाडत असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.       नीरा (ता. पुरंदर) येथे आज मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये येऊन जालना जिल्ह्यात पोलिसांनी क्केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला . शांततेच्या मार्गाने हा निषेध करण्यात आला. मात्र यावेळी मराठा समाजातील तरुणांच्या मनामध्ये तीव्र संतापाच्या भावना दिसून आल्या. हा मोर्चा संपल्यानंतर पुरंदर तालुक्यातील मराठा समाजाचे नेते त्याचबरोबर निरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांनी पत्रकारांची स...