Type Here to Get Search Results !

नीरा येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंती निमित्त 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची भव्य मिरवणुक काढण्यात आली

 नीरा येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


जयंती निमित्त 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची भव्य मिरवणुक काढण्यात आली

पुरंदर :
         पुरंदर तालुक्यातील नीरा येथे पैगंबर जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या १४४५ व्या जयंती निमित्त स्टेशन मस्जिद व नीरा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने नीरा शहरातून 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे निरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे व हिंदू बांधवांनी ठीक ठिकाणी स्वागत केलं.

       नीरा (ता.पुरंदर) येथे पैगंबर जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे स्टेशन मस्जिद पासून लोणंदरोड,  नगररोड, बुवासाहेब चौक, अहिल्यादेवी चौक, शिवाजी चौक मार्गे पुन्हा पालखी महामार्गवरून लोणंदरोड व मस्जिद पर्यंत अशी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या दर्गाहच्या 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीमध्ये लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत नागरिक उपस्थित होते. नार- ऐ- तकबीर, अल्लाहू अकबर,  नार - ऐ- रिसालत, या रसुलुल्लाह अशा प्रकारे विविध घोषणा देेेेऊन  लहानमुले, तरूणांनी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या विषयी आदर व्यक्त केला.

      हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या १,४४५ व्या जयंती निमित्त नीरा बाजारपेठेतील  बुवासाहेब चौकात 'गुंबद- ए- खिजरा' च्या प्रतिकृतीला सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, माजी उपसरपंच कल्याण जेधे, बाबुराव दगडे, सुदाम बंडगर, विजय शिंदे, हरिभाऊ जेधे, सुजित वाडेकर, सचिन मोरे आदींनी  हार घालून स्वागत केले. यावेळी आई पतसंस्था व राजेशभाऊ काकडे सोशल फाउंडेशनच्या वतीने मिरवणुकीत सहभागी लहान मुलांना खाऊ वाटप केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies