निरा नदीत ४ हजार २३० क्युसेक्सने पाणी सोडले

 निरा नदीत ४ हजार २३० क्युसेक्सने पाणी सोडले




पुरंदर :
     गेली दोन दिवस निरा देवघर धरणसाळीत पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरल्याने धरणातून ४ हजार २३० क्युसेक्सने विसर्ग सुरू झाल्याची माहिती निरा पाटबंधारे उपविभागाकडून सकाळी सात वाजता देण्यात आली आहे.

      महत्त्वाची सूचना
निरा देवघर धरण

दिनांक: १०-०९-२०२३

निरा देवघर प्रकल्प , ता. भोर, जि. पुणे

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने  निरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले आहे त्यामुळे *धरणातून नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या २४९० क्यूसेक विसर्गमध्ये वाढ करून ठीक सकाळी ७:०० वाजता धरणाच्या सांडव्या वरून ३४८० क्यूसेक व विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक एकूण ४२३० क्यूसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.


     यो. स. भंडलकर
सहाय्यक अभियंता, श्रेणी १
निरा पाटबंधारे उपविभाग, निरा
    ता. पुरंदर, जि. पुणे

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..