Type Here to Get Search Results !

||धक्कादायक बातमी|| मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

 ||धक्कादायक बातमी||  मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे 
मुंबई :

      सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर हवामानाच्या बदलामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमान हे खाजगी विमान आहे. ही दुर्घटना घडताच मुंबई विमानतळावरील विमानांची टेकऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आली आहे. अपघात झालेल्या विमानामध्ये एकूण सहा जण होते. त्याचबरोबर दोन क्रूमेंबर देखील या विमानामध्ये होते. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 


       सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशाखापट्टनमच्या विझाग येथून निघालेलं विमान मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी खाली उतरत होतं यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. मात्र जमिनीच्या अवघ्या काही अंतरावर असतानाच विमान क्रॅश झाले. 


         हे विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने क्रूमेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. माहितीनुसार या अपघातामध्ये जवळपास तीन प्रवासी जखमी झाले आहेत. तिघांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घडलेल्या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies