जवळार्जून सोसायटीचा १२ टक्के लाभांश.
आमदार संजय जगताप यांच्या हस्ते लाभांश वाटप.पुरंदर : जवळार्जुन विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सभासदांना १२ टक्के लाभांशाचे शटप करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील जवळार्जून येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका जगताप, उत्तमराव शिंदे, देवा नाझीरकर, अण्णासाहेब राणे, सुधाकर टेकवडे, रामभाऊ राणे, मामासाहेब गुळूमकर, अनिल उरवणे, खैरे, सुभाष कुतवळ, सयाजी राणे, सोसायटीचे चेअरमन महेश राणे, व्हा.चेअरमन नवनाथ राणे सर्व संचालक मंडळ व मोठ्या संख्येने सभासद बंधू भगिनी उपस्थित होते. जवळार्जुन विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना १२ टक्क्यांनी लाभांशचे वाटप आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरंदर उपशाचे पाणी १० नंबर मायनर पासून जवळार्जुनच्या ९ नंबर चारी पर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत देण्याचे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी दिले. जवळार्जुन गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न व रस्त्याच्या कामाचा प्रश्न सोडवण्याचा आश्वासन आमदारांनी ग्रामस्थांना दिले. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेचे प्रस्ताविक महेश राणे यांनी केले तर आभार नवनाथ राणे यांनी मानले.