Type Here to Get Search Results !

राज्य सरकारकडून पत्रकारांची मुस्कटदाबी सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाहीच्या संपदकावर केला गुन्हा दखल माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न

 राज्य सरकारकडून पत्रकारांची मुस्कटदाबी

सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाहीच्या  संपदकावर केला गुन्हा दखल
     
माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न.

मुंबई :
       सध्याचं सरकार हे हुकूमशाहीच्या मार्गाने चालले आहे. त्यांना प्रश्न विचारणारे आणि सत्य समोर मांडणारे नको आहेत आणि म्हणूनच सरकार आता माध्यमांची मुस्कटदाबी करते आहे. दोन महिन्यापूर्वी  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या बद्दल बातमी  प्रसारित  केल्याबद्दल सरकारने आता लोकशाही वाहिनीच्या संपादकावर गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकारे सर्व माध्यमावर अंकुश आणण्यासाठी आता सरकार पत्रकार आणि माध्यमांवर गुन्हे दखल करून लोकशाहीचा गळा घोटत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.

      राजकारण्यांच्या नजरेत  पत्रकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहेत. किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणातही हेच होताना दिसतंय. किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्त वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ही साधारणत: दोन महिन्यापुर्वी घटना. सोमय्याचं या नैतिकतेचे धिंडवडे उडविणारया या व्हिडिओनं देशभर खळबळ उडाली. किरीट सोमय्या यांनी या व्हिडिओचा इन्कार केला नव्हता किंवा तो खोटा आहे त्यात दिसणारी व्यक्ती मी नव्हेच असा दावाही त्यांनी केला नव्हता. म्हणजे जे दाखविलं गेलं होतं ते सत्य आणि सत्यच होतं. तरीही किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काल सायबर पोलिसांनी किरीट सोमय्या यांचा जवाब नोंदवून घेतल्यानंतर रात्री उशिरा लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  भारतीय दंड संहिता कलम 500 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 E , 67 A अंतर्गत ही कारवाई करण्यात आहे.






     सत्य बातमी दाखवल्याबद्दल असा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्रात पत्रकारिता करणे अशक्य होईल. सरकार पत्रकारांवर असे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करीत आहे असा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेने काढलेल्या एका संयुक्त पत्रकात करण्यात आला आहे. सरकारची ही कारवाई संतापजनक आणि निषेधार्ह असल्याचे एस.एम.देशमुख यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies