पुरंदर आप युवा आघाडी अध्यक्षपदी महेश जेधे यांची निवड

 पुरंदर आप युवा आघाडी अध्यक्षपदी महेश जेधे यांची निवड




पुरंदर : 
       पुरंदर तालुका आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्या अध्यक्ष पदी नीरा येथील महेश अर्जून जेधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीरा शहरासह ग्रामीण भागातील युवकांनी जेधे यांचे अभिनंदन केले.

     सोमवार दि. २५ रोजी आम आदमी पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सासवड येथील पक्षाच्या कार्यालयात आम आदमी पार्टी पुरंदरचा युवा आघाडी अध्यक्षपदी निराचे सामाजिक कार्यकर्ते महेश जेधे यांची तर उपाध्यक्ष पदी मावडी क. प. चे सचिन गायकवाड यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती जाहीर केली. यावेळी शेतकरी आघाडी अध्यक्ष संजयनाना जगताप, संघटक अमोल कड, निरा शाखा अध्यक्ष विजय धायगुडे, पिसर्वे शाखेचे शहाजी कोलते, संपतराव मोटे, कुंजीर, रेवण पोटे, सुदाम चव्हाण, विशाल मोहिते आदी उपस्थित होते.

     निवडीनंतर पक्षाची ध्येय धोरणे तसेच दिल्ली व पंजाब सरकारची कामे सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवण्याबरोबर पुरंदर तालुक्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे जेधे व गायकवाड यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.