Type Here to Get Search Results !

शरद विजय सोसायटी करणार मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप. बाळासाहेब वि. निगडे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.

 शरद विजय सोसायटी करणार मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप. बाळासाहेब वि. निगडे 


सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत. 






पुरंदर : प्रतिनिधी 


   पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आता शरद विजय सहकारी सोसायटी मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप करणार असून, सभासद शेतकऱ्यांसाठी विहिर बांधणी, गाई-म्हशी गोठा, पाइपलाइन इत्यादी कारणांसाठी पाच वर्षे परत फेडीचे मध्यमुदत तर शेततळे निर्मितीसाठी सात वर्षं परतफेडीचे दिर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होणार. तरी शेतकऱ्यांनी या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद विजय सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब विठ्ठलराव निगडे यांनी केले आहे. 


     कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील शरद-विजय विविध कार्यकारी सेवा सह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्योतीबा मंदिराच्या सभामंडपात  खेळीमेळीच्या वातावरणात शनिवारी पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरून सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब निगडे बोलत होते. सोसायटीचे सभासद पृथ्वीराज निगडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन धोरणानुसार आपली सोसायटी पण मध्यमुदत व दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप करु शकते असे सुचित केले. या विषयाला माजी चेअरमन नंदकुमार निगडे यांनी अनुमोदन दिले. 


       ६८४ सभासद असलेल्या या सोसायटीचे भाग भांडवल एक कोटी असून वसुली भाग भांडवल ६४ लाख ४२ हजार २२८ रुपये आहे. बॅक कर्ज ४ कोटी ९१ लाख १६ हजार ६९३ रुपये आहे. या वर्षी सोसायटीला ३१ लाख ४१ हजार ०९७ रुपये इतका तोटा झाला आहे. सोसायटीने या वर्षी सभासदांना लाभांश जाहीर केला नाही. मात्र या वर्षी थकबाकी असलेल्या कर्जदारांची घरोघरी संचालक मंडळासह  भेट घेऊन वसुली करणार असून पुढील वर्षी संस्था नफ्यात आणण्यासाठीचे कसोशीने प्रयत्न करणार आहोत. पुढील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेआधी भरघोस लाबांशाची रक्कम प्रत्येक सभासदांच्या खात्यावर जमा होईल. अशी माहिती सोसायटीचे सचिव मंगेश निगडे यांनी दिली. सर्व सभासंदांच्या शंकांचे निरासरन संचालक मंडळाने व सचिवांनी केले. 


    यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन व निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक निगडे, व्हाइस चेअरमन नरेंद्र रासकर, माजी चेअरमन ज्ञानदेव निगडे, माजी व्हाइस चेअरमन दिलीप निगडे, प्रमोद निगडे, श्रीकांत निगडे, रणजित निगडे, निलेश भोसले, ज्योतिराम कर्णवर, भानुदास पाटोळे, मच्छिंद्र गदादे, विजय कोंडे  उपस्थित होते. 


     सोसायटीचे २८ व्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन सचिव मंगेश निगडे यांनी केले. सभेला जेष्ठ सभासद जयवंतराव कोंडे, नारायणभाऊ निगडे, माजी सरपंच लक्ष्मण वाघापूरे, सुरेश गोरगल, माजी चेअरमन विराज निगडे, माजी उपसरपंच भरत निगडे, धनराज कोंडे, विकास कर्णवर, अशोक निगडे, विठ्ठल निगडे, पृथ्वीराज निगडे, नंदकुमार निगडे, माणिकराव गदादे, धनाजी निंबाळकर, मधुकर निगडे, सुरेश दानवले, बाळासाहेब कापरे, क्रुष्णराव निगडे, सुभाष निगडे, बाळासाहेब रासकर, बाप्पूराव निगडे, भुजंगराव निगडे, राजेंद्र निगडे, दिलीप भोसले, दत्तात्रय निगडे, अरुण निगडे, ताराचंद निगडे, रणजित अशोकराव निगडे यांनसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या वतीने सभासदांचे स्वागत व्हाइस चेअरमन नरेंद्र रासकर यांनी केले तर आभार जेष्ठ सभासद जयवंतराव कोंडे यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies