जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केली जेजुरी गडावरील कामाची पाहणी
जेजुरी येथे सुरू आहेत विकास आराखड्याची कामे
काम लवकर पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
जेजुरी दि.२७
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज जेजुरी गडावर खंडोबा मंदिराच्या सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाची आज बुधवारी पाहणी केली. खंडोबाच्या जेजुरी गडावर राज्य सरकारच्या विकासा आराखड्याच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली हे काम सुरू आहे. आज जिल्हाधिकारी यांनी जेजुरी येथील गडावर येऊन या कामाची पाहणे केली.. त्याचबरोबर हे काम लवकर पूर्ण करण्याचा सूचना केल्या. यावेळी त्यांचे सोबत पुरातत्व खात्याचे अधिकारी,पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे व अन्य विश्वस्त,ग्रमास्थ मानकरी,खंदेकरी, व पुजारी उपस्थित होते.