Monday, January 31, 2022

जेजुरी येथे देव दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व रोख रकमेची चोरी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल

 जेजुरी येथे देव दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व रोख रकमेची चोरी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल

जेजुरी दि.३१






जेजुरी मोरगाव रोडवर अपघात प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल

 जेजुरी मोरगाव रोडवर अपघात प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल

 जेजुरी दि.३१



दिवेच्या उपसरपंचपदी श्रद्धा पोमण यांची निवड .

 दिवेच्या उपसरपंचपदी श्रद्धा पोमण यांची निवड

सासवड दि.३१



नीरा शहर व परिसरासाठी नवीन पोलीस स्टेशन द्या.राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांची गृह मंत्र्यांकडे मागणी.

 नीरा शहर व परिसरासाठी नवीन पोलीस स्टेशन द्या.राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांची गृह मंत्र्यांकडे मागणी.

दि.३१



वाईन बाबत शासनाचा निर्णय म्हणजे येणारी पिढी बरबाद करण्याचे कारस्थान आहे.बामसेफचे श्रीकांत होव्हाळ यांची राज्य सरकारवर टीका .

 वाईन बाबत शासनाचा निर्णय म्हणजे येणारी पिढी बरबाद करण्याचे कारस्थान आहे.बामसेफचे श्रीकांत होव्हाळ यांची राज्य सरकारवर टीका

 नीरा दि.३१




Sunday, January 30, 2022

२८ फेब्रुवारीला होणार पारगाव येथील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला.

 २८ फेब्रुवारीला होणार पारगाव येथील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला.

अमोल बनकर यांच्या उपोषणाला यश.

  सासवड दि.३०

.......(प्रतिनिधी) अपंग विकास संघाचे अमोल बनकर यांनी उपोषण केल्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.१५ फेब्रुवारीला भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून २८ फेब्रुवारीला भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करू असे लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

        पिसर्वे पारगाव (तालुका पुरंदर)येथील रेल्वे क्रॉसिंग ठिकाणी वर्षभरापासून रेंगाळत सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे पूर्व भागातील नागरिकांची हेळसांड होत होती. रस्ता बंद असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.शेतकरी,ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अपंग विकास संघाचे अमोल बनकर यांनी महात्मा गांधी जयंती दिवशी आमरण उपोषणाचा इशारा आठ दिवसांपूर्वीच दिला होता.



       त्यानुसार रविवार(दिनांक, 30)रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात केली होती.याची तत्काळ दखल घेत रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्ते अमोल बनकर यांची मागणी मान्य करून १५ फेब्रुवारीला भुयारी मार्गाचे काम पूर्ण करू. व २८ फेब्रुवारीला भुयारी मार्गातून वाहतूक सुरू करून देऊ असे लेखी पत्र दिले.तदनंतर नारळपाणी घेऊन बनकर यांनी उपोषण स्थगित केले. वर्षभरापासून रेंगाळत सुरू असलेल्या कामाबद्दल काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करू असे लेखी पत्र ठेकेदार अथवा संबंधित प्रशासनाकडून मिळाले नव्हते. मात्र अपंग विकास संघाचे अमोल बनकर यांनी उपोषण केले व याची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासन व ठेकेदार यांनी प्रत्यक्ष येऊन लेखी आश्वासन दिले. यामुळे पूर्व भागातील ग्रामस्थांनी अमोल बनकर यांचे कौतुक केले.


       


        यावेळी गौरव कोलते, पुष्कराज जाधव , शिवाजी कोलते, आरुन कोलते, याकुब सय्यद, जालिंदर मेमाने, सर्जेराव मेमाने, राजेद्र भोसले हरिदास खेसे ऑड. राहुल कोलते, ऑड दयानंद कोलते, महेश राऊत, गौरव खेनट, तुशार जगताप, किशोर वचकल, जितेंद्र मेमाने, चंद्रकांत मेमाने, प्रथमेश कोलते, चंद्रकांत मेमाने, दर्वा दळवी यांच्या सह आनेक नागरिक उपस्थित होते.

Friday, January 28, 2022

 पिसर्वे येथील महिलेचा विनयभंग प्रकरणी जेजुरी पोलिसात तक्रार दाखल



जेजुरी दि.29


 पुरंदर तालुक्यातील   पिसर्वे येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जेजुरी पोलिसात पीडित महिलेने तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 452,354 नुसार गुन्हा दाखल केला आहे 


याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पिसर्वे गावातील एका महिलेने या संदर्भात तक्रार दिली आहे .तिने दिलेल्या तक्रारीनुसार घरामध्ये काम करत असताना नितीन शिवाजी कोलते. हा इसम तिच्या घरात आला आणि त्यांनी तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.त्यामूळे तिने  जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजलेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबतचं अधिकचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावस कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सरक करीत आहेत.


खासदार येण्या आगोदराच शिवसैनिकांनी केले गुरोळी रस्त्याचे भूमिपूजन

 खासदार येण्या आगोदराच शिवसैनिकांनी केले गुरोळी रस्त्याचे भूमिपूजन 



  सासवड दि.२८


   पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमी पूजन व उद्घाटन आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात येतंय .मात्र यामध्ये आघाडी सरकारमधील शिव सेनेला बाजूला ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.त्यामूळे गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचे भूमी पूजन शिवसैनिकांनी केले आहे 

      

         वाघापूर चौफुला ते गुरोळी गाव या रस्त्याच्या कामासाठी गुरोळी गावाचे उद्योगपती महादेव शिंगाडे यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी विजय शिवतारे यांची गेल्या वर्षी भेट घेतली होती. शिवतारे यांनी ग्रामस्थांची ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आणि ऐन कोरोनाच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. गुरोळी रस्त्यासोबतच रावडेवाडी, कोडीत बु (धरणवस्ती), सोनोरी, चांबळी, सुपे खुर्द आदी रस्त्यांसाठी शिवतारे यांनी निधी मंजूर करून घेतला. असा दावा शिव सेनेकडून केला जातोय. 



आणि म्हणूनच वाघापूर चौफुला ते गुरोळी या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव आणि ज्योतीताई झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच उज्वला जाधव, राजेंद्र झेंडे, सुरेश खेडेकर, संदीप खेडेकर, संतोष खेडेकर, अविनाश जाधव, दादा खेडेकर, कैलास जाधव, सुनील जाधव, बाळासाहेब मचाले, नितीन कुंजीर, हिरामण खेडेकर, मनोज कुंजीर, विक्रांत पवार, प्रविण लवांडे, प्रल्हाद झिंजुरके, जालिंदर खेडेकर, दशरथ लवांडे, दादा खेडेकर, परशुराम खेडेकर, पोपट खेडेकर, निलेश खेडेकर, बाला खेडेकर, पंकज खेडेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.   




Thursday, January 27, 2022

खळद येथे हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

 खळद येथे हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 



जेजुरी प्रतिनिधी दि.२८


खळद (ता.पुरंदर) येथे शिवमणी क्रिकेट क्लबच्यावतीने हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काल दिनांक २७ जानेवारी रोजी या स्पर्धांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



     यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम संचालक बाळासाहेब आप्पा कामथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष अजिंक्यभैया टेकवडे, खळद गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास आबा कामथे, विद्यमान सदस्या तथा माजी उपसरपंच नम्रतामाई कादबाने, ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, उद्योगपती शिवाजी कामथे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कामथे, शिवशंभो फटाका मार्टचे विठ्ठल दादा कामथे, उद्योगपती संतोष कामथे, कुलदीप मेमाणे, वैभव कादबाने, शरद रासकर, प्रशांत रासकर, देवेंद्र कामथे, रोहित कामथे, कल्याण रासकर, संगम कामते, हर्षल रासकर, गौरव रासकर, साई कादबाने, निखिल रासकर, गर्दिश कादबाने तसेच क्रिकेटप्रेमी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आता पोलीस पाटलांना मिळणार ग्रामपंचायत कार्यालयातच कामासाठी जागा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना



सासवड दि.२७

     प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलभ करून  देण्याच्या सूचन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यानी दिल्या आहेत.तशा प्रकारचे पत्र त्यानी प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे आता नागरिकांना पोलीस पाटलांना सरपंचां प्रमाणे ग्राम पंचायत कार्यालयातच भेटता येणार आहे.

        शासनाने प्रत्येक गावात कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती केली. प्रशासनात  गाव पातळीवर पोलीस पाटलाला विशेष महत्व आहे.पोलीस पाटील हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा मानला जातो.  मात्र या पोलीस पाटलाला गावात बसण्यासाठी सध्या तरी कर्यालय नाही.त्यामुळे त्यांना पाटीलकीचा कारभार घरातून चालवावा लागतो आहे.त्यामुळे पोलीस पाटलांची आणि नागरिकांची बऱ्याच वेळा भेट होत नाही.मात्र आता पोलीस पाटील लोकांना ग्रामपंचायत कार्यालयातच भेटू शकतील. 

     याबाबत बोलताना पोलीस पाटील संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कुंजीर  म्हणाले कि पोलीस पाटलांना ग्रामास्तरावर काम करताना कार्यालयाची आवश्यकता आहे. शासनाने नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधताना पोलीस पाटलांसाठी  एक स्वतंत्र खोली बांधण्या बाबत व ती पोलीसा पाटलांना कार्यालयीन कामासाठी देण्याबाबत आदेश दिले होते. मात्र  खेडेगावात अनेक ठिकाणी अशा प्रकारे नवीन इमारती बांधल्या नाहीत. त्यामुळे पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील  व पुणे जिल्हा संघटनेच्या पदाधिकार्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधीकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यानंतर त्यानी सध्या तत्काळ पोलीस पाटलांसाठी ग्रामपंचायत कार्यालयातच एक टेबल तीन खुर्चा व एक  कपाट उपलब्द करून देण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यांचा सुचनेनुसार पोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा मिळाल्यास पाटलांना लोकाशी संपर्क ठेवणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व कार्यालयीन कामासाठी त्याचा उपयोग होणार आहे.   

आता नीरा ते राख मार्गे पीएमपीएलएमची बस सुरू करण्याची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांची मागणी

 आता नीरा ते राख मार्गे पीएमपीएलएमची बस सुरू करण्याची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांची मागणी.



नीरा दि.२७


   पुरंदर तालुक्यात पीएमपीएलएमची बस सुरू झाल्यानंतर या बसचा येथील नागरिकांना चागला उपयोग होतोय. तालुक्यातील मुख्य मर्गाबरोबरच इतर मार्गावरही ही बस सुरू करावी अशी मागणी आता होते आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ प्रदीप खाटपे यांनी सासवडहून नीरा पर्यंत येणाऱ्या काही बस राख गुळूंचे मार्गे निरिकडे सोडाव्यात अशी मागणी केली आहे.याबाबतच्या पीएमपीएलएमकडे तशा प्रकारचे मागणी पत्र त्यांनी दिलं आहे.या भागातून बस सुरू झाल्यास येथील विध्यार्थी व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा त्यांनी म्हटलं आहे. ते आज दिनांक २७ जानेवारी रोजी माध्यमांशी बोलत होते. याबाबत त्यांनी आमदार संजय जगताप,खासदार सुप्रिया सुळे यांना ही पत्र दिले आहे.


Wednesday, January 26, 2022

तहसीलदरांच्या बोगस आदेशद्वारे जमिनीचा घेतला ताबा ; सासवड येथील घटना आरपीआयचे पंकज धीवर यांची माहिती

 तहसीलदरांच्या बोगस आदेशद्वारे जमिनीचा घेतला ताबा ; सासवड येथील घटना आरपीआयचे पंकज धीवर यांची माहिती


 सासवड प्रतिनिधी दि.२७



   पुरंदर तालुक्यातील सासवड येथील जमिनीच्या सातबारावर बोगस आदेशाद्वारे नोंद करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे तालुका अध्यक्ष पंकज धीवार यांनी आज दिनांक. २७ जानेवारी रोजी माध्यमांना दिली आहे .त्यामूळे पुरंदर तालुक्यात तहसीलदारांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर होत असल्याचं पुन्हा एकदा पुढं आले आहे.


   पंकज धीवर यांनी सासवड मधील काही गटांवर करण्यात आलेल्या नोंदी संदर्भात पुरंदरच्या तहसीलदारांकडे विचारणा केली होती. या नोंदी बाबत दिलेले आदेश तहसीलदार यांनी स्वतः दिले आहेत का ? अशी विचारणा त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी हे आदेश बनावट असल्याचे म्हटले आहे.त्याच बरोबर या बाबत आपण पोलिसात तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी म्हटलय.मात्र यामुळे पुरंदर मध्ये बनावट शासकीय कागदपत्रे बनवणारी टोळी अजूनही अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.

पुरंदरला होणाऱ्या विमानतळालामुळे या भागातील जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि त्यामुळेच असे बनावट कागदपत्रे बनवून जमिनी बळकावण्याचे प्रकारही वाढले आहेत.या बाबतची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पंकज धीवर यांनी केलीय...



हडपसर नीरा बस मार्गावर जादा बस सोडण्याची नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांची मागणी.

 हडपसर नीरा बस मार्गावर जादा बस सोडण्याची नीरेचे  उपसरपंच राजेश काकडे यांची मागणी.



नीरा दि.२६


       पुरंदर तालुक्यातील हडपसर ते निरा या मार्गावर पीएमपीएलएमने २१ जानेवारीपासून बस सेवा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना या बस सेवेचा चांगला उपयोग होतोय. मात्र सध्या येत असलेली बसची संख्या अपुरी पडत असून बसच्या फेऱ्या आणखी वाढवाव्यात अशी मागणी निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केली आहे


  पुरंदर तालुक्यातील नीरा पर्यंत पीएमपीएलएमची बस सेवा सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या अजूनही एसटी बस सुरू नाहीत निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. लोकांना नीरा हे ठिकाण मध्यवर्ती पडत असल्याने या ठिकाणी पुण्याला जाण्यासाठी  लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवाशांची मोठी आवक-जावक असते. पीएमपीएलएम बस सेवा सुरू झाल्यामुळे या बसने प्रवास करण्यास अनेक जण पुढे सरसावले आहेत. त्यामुळे बस नीरा येथेच पूर्ण भरते अनेकांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे रूट वरील गावातील लोकांना बस मध्ये जागाच मिळत नाही. पिंपरे, पिसुर्टी दौंडज,वाल्हे या गावातील लोकांना या बसमध्ये जागाच मिळत नाही. त्यामुळे आता बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी लोकांकडून होते आहे. आज दिनांक २६ जानेवारी रोजी उपसरपंच राजेश काकडे यांनी याबाबत प्रवाशांशी  संवाद साधला. यानंतर त्यांनी बसच्या फेऱ्या आणखी वाढविण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे योगेंद्र माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

मांडकी येथील एकाची पिंपरे येथे लोहमार्गावर रेल्वे खाली आत्महत्या.

 मांडकी येथील एकाची पिंपरे येथे लोहमार्गावर  रेल्वे खाली आत्महत्या.



   नीरा दि.२६


     पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील एकाने पुणे मिरज रेल्वे मार्गावर पिंपरे येथे रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली आहे. रेल्वे पोलिसांनी या  व्यक्तीचा मृतदेह  ताब्यात घेतलाअसून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.


    याबाबत  रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील रेल्वेमार्गावर पिंपरे गावचे हद्दीमध्ये नीरा डावा कालव्याच्या  जवळ मांडकी  येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय  सचिन शंकर जगताप  याने आत्महत्या केली आहे.आज दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी  साडे दहा वाजलेच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे मैल नंबर 82/6 या ठिकाणी ही घटना घडली आहे. सकाळची साडे दहाची महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीच्या  वेळी निरा रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये सचिन शंकर जगताप यांचा जगीच मृत्यु झाला आहे.या घटनेचा अधिकचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

गुळुंचे ग्रामपंचायतीने पुन्हा घेतली नियमबाह्य ग्रामसभा कोरम पूर्ण नसताना दुसऱ्यांदा पूर्ण ग्रामसभा घेण्याचा पराक्रम; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

 गुळुंचे ग्रामपंचायतीने पुन्हा घेतली नियमबाह्य ग्रामसभा

कोरम पूर्ण नसताना दुसऱ्यांदा पूर्ण ग्रामसभा घेण्याचा पराक्रम; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली



नीरा ता.

   नियमबाह्य कामे करण्यात प्रसिद्धी पावलेल्या गुळुंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराला वेसण लावण्याची गरज निर्माण झाली आहे. चार महिन्यात दुसरी ग्रामसभा गणसंख्यापूर्ती नसतानाही घेऊन ग्रामसभेने विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशावर तसेच मालमत्ता पत्रके व मालकी हक्काचा सातबारा असलेल्या काही नागरिकांचे अतिक्रमण असल्याचे जाहीर करत त्याचा ठराव केल्याने डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

   प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गायरान जागेत आईचे अतिक्रमण असल्याने सरपंच संभाजी कुंभार यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. सचिव म्हणून ग्रामसेवक जयेंद्र सुळ हजर होते. ऑनलाईन ग्रामसभेला केवळ ५७ व्यक्तींची ऑनलाईन उपस्थिती असताना ग्रामसभा सुरू करण्यात आली. सभा संपेपर्यंत केवळ ८० ते ८१ मतदार हजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन सभेला कोरम पूर्ण झाल्याशिवाय सभा घेऊ नये असे पत्र २६ जानेवारीपूर्वी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना काढले होते. तरीही कोरम पूर्ण नसताना बेकायदा ग्रामसभा घेण्यात आल्याने पंचायतीच्या मनमानी कारभाराच्या गप्पा गावात रंगल्या आहेत.

   एकीकडे दोन गटात विवाद सुरू असताना काहीजण गावातील वाद मिटविण्याच्याऐवजी त्यात तेल ओतत असल्याचे आज पाहायला मिळाले. एकाने चक्क मालकी हक्काचे उतारे असलेल्या काहीजणांचे अतिक्रमण असल्याचे सांगत तसा ठराव करायला ग्रामसेवकांना सांगितले. ग्रामसेवक सुळ यांनीही याला दुजोरा दिला. ग्रामसभेची नियमावली पायदळी तुडवत ज्याला जे वाट्टेल तो ते बोलत होता. माजी उपसरपंच संतोष निगडे यांचा ग्रामसभा नियोजित वेळेत उरकण्याचा कल होता मात्र, काहीजण वारंवार तेच तेच प्रश्न उपस्थित करून नव्या वादांना निमंत्रण देत होते.


ठरावांची चौकशी करणे गरजेचे :-

वास्तविक ग्रामपंचायत संदर्भात अनुसूची एकमध्ये दिलेल्या ७८/७९ विषयांवर विकासात्मक निर्णय घेण्याचे बंधन ग्रामपंचायतीवर असते. मात्र, या अनुसुचिला बगल देत वैयक्तिक ठराव करण्याचा विक्रम यापूर्वीच केला आहे. तसेच माळवस्ती भागातील १९७८ साली झालेले सिटी सर्व्हे रद्द करण्याचा ठराव देखील केला आहे. माळीण प्रकारणानंतर डोंगरउतारावर घरे बांधण्यास शासनाने मज्जाव केला असतानाही तुकाई डोंगराच्या पायथ्याला काही भूमिहीन लोकांना गायरान जागा मंजूर करण्यासाठी हरकत नसल्याचा ठराव केला. सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकवत गायरान जागेतील काही जागा वापरासाठी देण्याचे ठराव करण्यात आले, पत्रकारांच्या बातम्यांच्याविरोधात माध्यमांच्या प्रतिनिधींच्या विरोधात ठराव केला. वास्तविक असे ठराव करणे नियमात बसणारे आहे का ? याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी लोक करत आहेत. अन्यथा राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कांना पायदळी तुडविणारे अनेक ठराव होत राहतील अशी भावना जाणकारांनी व्यक्त केली.


"दुसऱ्यांदा गणसंख्या नसताना ग्रामसभा घेतली गेली. दगडूशेठ ट्रस्टने गावाला पाणी पाजले आणि ग्रामपंचायतने स्वतः पाणी दिले असे सांगत स्वतःच अभिनंदनाचा ठराव करून स्वतःच स्वतःची पाठ थोपटली. मतदार यादीतून बोगस नावे कमी करणाऱ्या प्रांतांच्या निर्णयाच्या विरोधात ठराव करण्यात आला. कोरम नसताना सगळी ग्रामसभा अगदी आभार मानून पार पडली. याबाबत मुख्य कार्यकारी यांनी लक्ष घालण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. परंतु, कार्यवाही होत नाही." - नितीन निगडे, उपाध्यक्ष, काँग्रेस पार्टी नीरा गट.

Tuesday, January 25, 2022

साकुर्डे येथून दोन लक्ष चोवीस हजाराच्या अल्युमिनियम वीज वाहक तारांची चोरी

 साकुर्डे येथून दोन लक्ष चोवीस हजाराच्या अल्युमिनियम वीज वाहक तारांची चोरी



  जेजुरी दि.२५


     पुरंदर तालुक्यातील साकूर्डे येथील अती उच्च दाबाच्या वीज वहिनीच्या अल्युमिनियमाच्या तारांची चोरी झाल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४३७व भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम. १३७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


   याबाबत जेजुरी पोलिसांनी आआज दिनांक २२ जानेवारी रोजी दिलेली माहिती अशी की,

पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथे जून २०१४ पासून ते दिनांक १९/१/२०२० रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत साकुर्डे गावच्या हद्दीत गट नंबर ९३ मधून २२४००० रुपये किमतीची ॲल्युमिनियमच्या अतिउच्चदाब वाहिनीची विद्युत वाहक दोन तारा अंदाजे १ किलोमीटर ,१०० मीटर लांबीची चोरीला गेली आहे. तसेच हार्डवेअर व इंसुलेटर याचे नुकसान केले आहे.या बाबत मुकुंद रंगराव लोखंडे यांनी दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुत्तनवार करीत आहेत.


अखेर हॉटेल ताहिती सील.....

 *अखेर हॉटेल ताहिती सील.....!*

*रिपब्लिकन पक्षाच्या निवेदनाला यश.*



सासवड : दि.२५


  पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटा नजीक असणारे हॉटेल ताहिती मध्ये अवैध रित्या हुक्का पार्लर सुरु होते. यामुळे या तालुक्यातील युवा वर्ग हुक्का या नशेच्या अधीन होउ नये. यासाठी सदरचे हुक्का पार्लर बंद करावे असे आशयाचे पत्र सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेत सासवड चे पी आय आणासाहेब घोलप यांनी सदर हॉटेल वर कारवाई केली व तसा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी दौण्ड - पुरंदर चे प्रमोद गायकवाड यांचेकडे पाठविला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी सदरचे हॉटेल सील करण्याचे आदेश दिले. यावेळी कारवाई तलाठी सुधीर गिरमे, मंडलाधिकारी भामे व तलाठी खोत, चांदगुडे पोलिस यांनी या आदेशाचे पालन करत सदरचे हॉटेल सील केले.



 या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पोलिस प्रशासन व प्रांतधिकारी यांच्या या संयूक्तिक कारवाई मुळे तालुक्यात असे अवैध धंदे करण्यास कोणीच धजवनार नाही. आर पी आयचे तालुका युवाध्यक्ष स्वप्निल कांबळे व सासवड शहराध्यक्ष विकास देशमुख यांनी या कारवाई साठी सातत्याने पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने सासवड येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

 भारतीय जनता पक्षाच्यावतीने सासवड येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन



सासवड दि.२६


     भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात येतंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे बाबत केलेल्या वक्तव्याचा पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सासवड येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.



     पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, तसेच युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस अडवोकेट श्रीकांत ताम्हणे यांच्या नेतृत्वात सासवड येथील शिवतीर्थ चौकात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश जी भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 25 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून नाना पटोले यांच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात. आला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आडवोकेट श्रीकांत ताम्हणे, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, जेजुरी शहर कार्याध्यक्ष गणेश भोसले, कैलास जगताप, आनंद जगताप, हनुमंत साळुंखे, विकास कटके, किरण सोनवणे, नदीम इनामदार, किशोर घोरपडे, सूर्यकांत ननवरे, राम पोटरे आदी मान्यवर उपस्थित होते

दिवे येथे एका व्यक्तीचा धारधार हत्याऱ्याने करण्यात आला खून ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल

 दिवे येथे एका व्यक्तीचा धारधार हत्याऱ्याने करण्यात आला खून ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल



सासवड :  दि.२५


   पुरंदर तालुक्यातलं दिवे येथील भापकरमाळा येथे  दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग  मनात  धरून एकाचा खून करण्यात आला आहे. या बाबत सासवड पोलिसात मयताच्या पत्नीने फिर्याद दिली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम ३०२व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की.या बाबतलता अशोक भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार   आरोपी संजय बबन  भापकर, व  किरण झेंडे (दोघे रा.दिवे ता.पुरंदर) यांनी अशोक लक्ष्मण भापकर (वय ५६ रा.भापकर मळा) याचा धारदार शस्त्राने  खून केला आहे.  दि २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भापकर मळा येथे फिर्यादीच्या   घराजवळ तिचे पती अशोक लक्ष्मण भापकर यांना संजय बबन भापकर व किरण झेंडे यांनी काळेवाडीच्या ढाब्यावर झालेल्या भांडणाचे कारणावरून घरी येवुन पतीला बाहेर बोलावले व कसल्यातरी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करून त्यांचा खुन केला.  गटाने नंतर घटनास्थळाला  सासवड भोर उपविभागीय पोलिस अधिकारी  धनंजय पाटील यांनी भेट दिली आहे तर पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत

Sunday, January 23, 2022

पारगाव येथील अंडरपास पुलाच्या रखडलेल्या कामासाठी अपंग संघटनेचे अमोल बनकर करणार उपोषण

 


मुलीच्या लग्नाचा अवांतर खर्च टाळून राख येथील प्रकाश ताटे यांनी तालुक्यातील रुग्णासाठी दिली ॲम्बुलन्स .


 मुलीच्या लग्नाचा अवांतर खर्च टाळून राख येथील प्रकाश ताटे यांनी तालुक्यातील रुग्णासाठी दिली ॲम्बुलन्स .

  

पुरंदर दिनांक २३ जानेवारी 


पुरंदर तालुक्यातील राख येथील रहिवासी असलेल्या व शिवसेनेचे नेते असलेल्या प्रकाश ताटे यांच्या मुलीचा विवाह आज संपन्न झाला. या विवाहाच्या वेळी प्रकाश ताटे यांनी अवांतर खर्च टाळून बचत झालेल्या पैशातून पुरंदर तालुक्यातील लोकांच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स भेट दिली आहे.

     राख येथील प्रकाश ताटे यांची कन्या योगिता प्रकाश ताटे व सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील श्रीजित संभाजीराव देशमुख यांचा विवाह आज दिनांक 23 जानेवारी रोजी संपन्न झाला या विवाहामध्ये अवांतर होणारा खर्च या दोन्ही कुटुंबांकडून टाळण्यात आला. त्यामुळे या विवाहामध्ये वधु पित्याचे जे पैसे बचत झाले होते . या पैशातून त्यांनी पुरंदर तालुक्यातील लोकांसाठी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिली. पुरंदरचे माजी आमदार व राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या हस्ते आज विवाह स्थळी या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप यादव, आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब भोर त्याचबरोबर अनेक वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. प्रकाश ताटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कौतुक केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्त साधून ताटे यांनी आपल्या मुलीचा विवाह आज 23 जानेवारी रोजी आयोजित केला होता. त्याचबरोबर ही ॲम्बुलन्स सुद्धा सुरू करण्यात आली.

नीरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती करण्यात आली साजरी.




 नीरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस  व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती करण्यात आली साजरी. 

नीरा दिनांक २३ जानेवारी

     पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक 23 जानेवारी रोजी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तरुणाच्या मनात देश प्रेमाची ज्योत जागवणारे आणि या स्वतंत्र  लढ्यात स्वतंत्र हिंदुस्थानची सेना उभी करणारे नेताजी  सुभाष चंद्र भोष यांची जयंती साजरी करण्यात आलाय त्याच बरोबर संपूर्ण देशात हिंदुत्वाची ज्योत जागवणाऱ्या  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली निरा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली पोलीस आउट पोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुप्ता घर व पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने व शिवसेनेचे नीरा येथील कार्यकर्ते दयानंद चव्हाण,सुदाम बंदगर  यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

    यावेळी  केशव बंडगेर.सागर बागडे, रवि गायकवाड़ रणवीर खरात, पोलिस पाटिल राजेंद्र भास्कर, केतन चव्हाण, संग्राम घोने, सुशांत ढोक, गोपाल बंडगर,  सिकंदर शेख, राजू पटने, सचिन गायकवाड़ इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Friday, January 21, 2022

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल करू नका :आरपीआयचे पंकज धिवार यांची मागणी



अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल करू नका  आरपीआयचे पंकज धिवार यांची मागणी

सासवड दि.२१

       राज्य शासनाच्यावतीने आनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या मध्ये कोणतेही बदल करू नयेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे  पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यानी केली आहे .याबाबतच एक निवेदन त्यानी आज पुरंदर दौंड चे प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे दिले आहे.



     याबाबत धिवार म्हणाले की, राज्य सरकार  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात बदल करीत आहे. अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे. कायद्या नुसार या गुन्ह्याचा  तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या मार्फत केला जातो. तो आता शासन पोलीस निरीक्षक किंवा  सहाय्यक पोलीस निरीक्षकपदाच्या अधिकाऱ्या मार्फत तपास करण्याचा बदल करीत आहे. पण असे करणे म्हणजे मुळ कायद्याचा भंग करणे होईल. यातून या कायद्याच्या मूळ उद्देशाला बगल दिली जाईल. राज्यात आणि देशात आजही दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत . अशात या कायद्यात बदल करणे योग्य होणार नाही. देशात इतर राज्यात  आजही वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत तपास केला जातो. त्यामुळे सरकारने अशा प्रकारच बदल करू नये अशा प्रकारची विनंती त्यानी केली आहे. आज दिनांक २१ जानेवारी रोजी त्यानी याबाबतच निवेदन प्रांत अधिकाऱ्यांकडे दिले आहे.


अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल करू नका: आरपीआयचे पंकज धिवार यांची मागणी

 

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल करू नका : आरपीआयचे पंकज धिवार यांची मागणी

सासवड दि.२१


        राज्य शासनाच्यावतीने आनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या मध्ये कोणतेही बदल करू नयेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे  पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यानी केली आहे .याबाबतच एक निवेदन त्यानी आज पुरंदर दौंड चे प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे दिले आहे.



     याबाबत धिवार म्हणाले की, राज्य सरकार  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात बदल करीत आहे. अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे. कायद्या नुसार या गुन्ह्याचा  तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या मार्फत केला जातो. तो आता शासन पोलीस निरीक्षक किंवा  सहाय्यक पोलीस निरीक्षकपदाच्या अधिकाऱ्या मार्फत तपास करण्याचा बदल करीत आहे. पण असे करणे म्हणजे मुळ कायद्याचा भंग करणे होईल. यातून या कायद्याच्या मूळ उद्देशाला बगल दिली जाईल. राज्यात आणि देशात आजही दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत . अशात या कायद्यात बदल करणे योग्य होणार नाही. देशात इतर राज्यात  आजही वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत तपास केला जातो. त्यामुळे सरकारने अशा प्रकारच बदल करू नये अशा प्रकारची विनंती त्यानी केली आहे. आज दिनांक २१ जानेवारी रोजी त्यानी याबाबतच निवेदन प्रांत अधिकाऱ्यांकडे दिले आहे.

पुरंदर तालुक्यात आज ४७ रुग्णानाचे कोरोना अहवाला आले पॉजीटीव्ह

 

पुरंदर तालुक्यात आज ४७  रुग्णानाचे कोरोना  अहवाला आले पॉजीटीव्ह

सासवड दि.२१




पुरंदर तालुक्यातील विविध प्रथमी आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले कोरोन तपासणी मध्ये आज ४७ रुग्णानाचे कोरोना अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत .


तालुक्यात आज जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आज ११ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.त्यामध्ये ११ रुग्णानाचे कोरोन अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत.यामध्ये जेजुरी शहरात ५,नावळी येथे 1 पिंपरे खुर्द येथे 1 साकुर्डे येथे १,मुर्ठी १तर नाझरे क.प येथील एका रुग्णाचा कोरोन अहवाल पॉजीटीव्ह आला आहे.. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात ८१ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली या मध्ये १० रुग्णानाचे कोरोना अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. यामध्ये सासवड ५,परिंचे २,शिवरी १,मोरगाव १, व साकुर्डे येथील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पोजीटीव्ह आला आहे. आज नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ४४ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १२ रुग्णानाचे कोरोना अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत.यामध्ये नीरा ६ पिंपरे २,निम्बूत २, पाडेगाव १, सोमेश्वर १ अश्या प्रकारे कोरोन अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. माळसिरस आरोग्य केंद्रात १२ रुग्णाची कोरोन चाचणी करण्यात आली यामध्ये 3 तीन रुग्नानाचा अहवाल पॉजीटीव्ह आला आहे यामध्ये आंबळे २, वाघापूर १ तर परिंचे २७ रुग्णानाचे कोरोंना चाचणी करण्यात आली यातील ११ रुग्णानाचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत यामध्ये परिंचे ५ नवलेवाडी 2 आस कर वाडी 3 सासवड १,हरगुडे १ आहेत अश्या प्रकारे तालुक्यात आज ४७ रुग्णानाचे कोरोन अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत

गर्भवती असलेल्या वनरक्षक महिलेला अमानुष मारहाण

 

गर्भवती असलेल्या वनरक्षक महिलेला अमानुष मारहाण 


news img

सातारा: दि.२१

         सातारा जिल्ह्यातील पळसावडे या गावाचे माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा जानकर  यानी महिन्याची गर्भवती असलेल्या वनरक्षक सिंधू सानप व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना मारहाण केली असून  याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्मायात आली आहे .या प्रकरणी  सरपंच व त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

         सिंधू सानप व त्यांचे पती सातारा जिल्ह्यात वनरक्षक म्हणून काम करतात. ते काल सातारा जिल्ह्यातील पळसावडे या गावाच्या हद्दीत गेले होते. माजी सरपंचांना न विचारता वनमजुर दुसरीकडे नेले याचा राग मनात ठेवून वन समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी या गर्भवती महिलेला मारहाण केली. या  घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजातून एकच संतापाची लाट उसळली. गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणी  माजी सरपंच यांना अटक केली आहे.

नीरा येथे सरपंच तेजश्री काकडे यांनी केले पीएमपीएल बसचे स्वागत.

 

नीरा येथे सरपंच तेजश्री काकडे यांनी केले पीएमपीएल बसचे स्वागत.

   

नीरा दि. २१

 


           हडपसर ते नीरा दरम्यान सुरू झालेल्या पीएमपीएलच्या पहिल्या बसचे नीरा येथे  निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी निरेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात या बसते स्वागत केले. या बसच्या स्वागतासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

       पुरंदर तालुक्यातील बहुप्रतिक्षीत हडपसर ते नीरा या मार्गावर पीएमपीएलएमची बस सुरू करण्यात आली आहे.भाजप राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेक नेते कार्यकर्ते व नागरिकांनी  ही बस सुरू करण्याची मागणी केली होती.खासदार गिरीश बापट व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचने नंतर आज दिनांक २१ जानेवारी पासून ही बस सुरू करण्यात आली आहे.नीरा येथे दुपारी आडीच वाजता या बसचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.सरपंच तेजश्री काकडे व महिला सदस्यांनी बसचे औक्षण केले, तर उपसरपंच राजेश काकडे यांनी चालक व वाहक याना पूर्ण पोशाख देऊन त्यांचे स्वागत केले.

        यावेळी ग्रामपंचायत सदस्य राधा माने,वैशाली काळे,माधुरी वाडेकर अभिषेक भालेराव,अंनाता शिंदे,अनिल चव्हाण, मार्केट कमिटी संचालक विजय शिंदे,माजी उपसरपंच दीपक काकडे, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, सुनीता भादेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष  भैय्यासाहेब उर्फ प्रदीप खाटपे, माजी जी.प.सदस्य विराज काकडे, निरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे, दीपक काकडे,भाजपचे माजी राज्य परिषद सदस्य अशोक रणदिवे,राजेश चव्हाण,महाराष्ट्र क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष महेश बाबर, अड आदेश   गिरमे,काँग्रेसचे जावेद शेख,गणेश जगताप, यांसह अनेक नागरिक उपस्थित होते

     यावेळी भाजपचे बाळासाहेब भोसले,योगेंद्र माने,सचिन लांबते,काका निगडे इत्यादी हडपसर ते नीरा बस प्रवास करून नीरा येथे आले.तर या बसचे  वाल्हे, पिसूर्टी,जेऊर फाटा, पिंपरे या ठिकाणीं सुद्धा नागरिकांनी या बसचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Thursday, January 20, 2022

हडपसर नीरा पिएमपीएल बस सेवा सुरू;

 हडपसर नीरा पिएमपीएल बस सेवा सुरू;  हडपसर येथे नारळ फोडून पूजन करून बस सेवेचा करण्यात  आला शुभारंभ. बस नीरेकडे रवाना 



नीरा दि.२१


    पुरंदर तालुक्यातील बहुप्रतिक्षीत हडपसर ते नीरा या मार्गावर पीएमपीएलएमची बस सुरू करण्यात आली आहे.भाजप राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेकांनी  ही बस सुरू करण्याची मागणी केली होती.खासदार गिरीश बापट व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या. सुचने नंतर आज दिनांक २१ जानेवारी पासून ही बस सुरू करण्यात आली आहे. आज हडपसर येथून बसचे पूजन करून ही बस निरेकडे रवाना करण्यात आली.



            यावेळी नगरसेवक आबासाहेब तुपे,जीवन जाधव पंडित आप्पा मोडक, पिएमपीएलएमचे दत्तात्रय झेंडे, हडपसर आगार व्यवस्थापक गायकवाड ,भाजपचे साचींन लंबते,  निरेतील भाजप कार्यकर्ते, बाळासाहेब भोसले,योगेंद्र माने,भाऊ कुदळे, आदेश भुजबळ  इत्यादी उपस्थित होते.जेजुरी  पासून फुढे ही बस प्रथमच येत असल्याने  वाल्हे, पिंपरे आणि नीरा येथे या बसच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून ग्रामीण भागातील जनता आता या बसची वाट पाहत आहे

Monday, January 17, 2022

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करत मेट्रोच्या कामाची केली पाहणी.

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करत मेट्रोच्या कामाची केली  पाहणी.

पुणे १७

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शरद पवार यांनी सोमवारी सकाळी फुगेवाडी मेट्रो स्थानकाला भेट दिली.तिथून त्यांनी मेट्रोतून पिंपरी चिंचवड महापालिका (पीसीएमसी) मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित त्यांच्यासोबत उपस्थित होते.

डॉ. दीक्षित यांनी मेट्रोच्या संपूर्ण कामाची शरद पवार यांना माहिती दिली. फुगेवाडी कार्यालयात मेट्रोकडून शरद पवार यांना मेट्रोच्या कामाबद्दलचे प्रेझेंटेशन देण्यात आले. शरद पवार यांनी मेट्रोच्या अधिका-यांशी संवाद साधत मेट्रोच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली.     

पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोच्या विस्तारीकरणाचे देखील काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरातील सहा मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी सज्ज होणार आहेत. दरम्यान मेट्रोचे उदघाटन कधी होणार याबाबत मात्र मेट्रोकडून मौन पाळले जात आहे. उदघाटनाचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार मिळून घेणार असल्याचे मेट्रोकडून सांगितले जात आहे.   

               

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्गदर्शन खाली जिल्हा बँक अग्रगण्य बँक ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्गदर्शना खाली पुणे जिल्हा बँक आशिया खंडातील अग्रगण्य बँक ठरली:- प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची अध्यक्षपदी निवडी नंतर प्रतिक्रिया.  

शेतकऱ्यांच्या विकासासाठी करणार  विशेष प्रयत्न

नीरा  दि.१७

        राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे  जिल्हा बँक आशिया खंडातील अग्रगण्य बँक ठरली आहे.शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी बँकने विविध योजना राबवल्या, शेतीसाठी पाच लाखा पर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज या बँकेच्या मार्फत दिले जात आहे. उपमुख्य्मात्री अजित पवार व संचालक मंडळाच्यासाथीने जिल्हा बँक व शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे  पुणे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यानी म्हटलंय. ते आज दिनांक  १७ जानेवारी रोजी निवडी नंतर प्रथमच माध्यमांशी बोलत होते.  

Saturday, January 15, 2022

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची निवड

 पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची निवड


 पुणे दि.१५

जी


      पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वाल्हे येथील प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या पुणे येथील कार्यालयात आज झालेल्या या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे.



      पुणे जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पारपडली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमत प्राप्त केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष बरोबरच भाजपचा एक सदस्य यामध्ये निवडून आला होता. आज दिनांक १५ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यानंतर दिगंबर दुर्गाडे यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

         


           प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे गेली तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतात. ते यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांचा मागील कार्यकाळात बँकेने चांगला नफा कमावला होता. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. दुर्गाडे यांचा अनुभव आणि कौशल्य जिल्हा बँकेसाठी उपयुक्त ठरणार आहे. दुर्गाडे यांच्या निवडीनंतर पुरंदर तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येतोय.तसेच त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.



Wednesday, January 12, 2022

सौ .लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 सौ .लिलावती रिखवलाल  शहा कन्या शाळेत  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

नीरा ; 


दिनांक २१ जानेवारी

    पुरंदर तालुक्यातील सौ लीलावती रिखवलाल  शहा कन्या शाळेत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवा पिढीला मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

        आज दिनांक १२ जानेवारी रोजी विद्यालयाच्या प्राचार्य निवेदिता पासलकर व पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांच्या हस्ते  स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवा पिढीला मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .स्वराज्याची उभारणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सांस्कृतिक आणि धाडसी जडणघडण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांचे कार्य अतुलनीय आहे.त्यांच्या कार्याचा आदर्श सर्व समाजाने ठेवावा असे प्रतिपादन यावेळी प्राचार्य निवेदिता पासलकर यांनी केले.स्वामी विवेकानंदांनी युवा पिढीला मार्गदर्शक तत्वे देऊन राजयोग, कर्मयोग, आणि भक्ती योगाची शिकवण दिली,त्या मार्गाने जाऊन देशहित साधावे  असे प्रतिपादन पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले.या वेळी संजय भोसले,अमर नांदखिले,ज्ञानेश्वर जाधव,शीतल शिंदे,सविता मदने , सुप्रिया लाटकर व सर्व सेवक उपस्थित होते.

Tuesday, January 11, 2022

 

सौ. लिलावती रिखवलाल शहा विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनीनी मिळवले  शिष्यवृत्ती परीक्षेत यश 


  

 नीरा दि. ११

      पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनीनी  शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्ती मिळवली आहे.विध्यालायाच्या मुख्याध्यापिका  निवेदिता पासलकर यानी याबाबतची माहिती आज  दिनांक १1 जानेवारी रोजी माध्यमांना दिली आहे.

              उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत २०२१ – २००२२ या शैक्षणिक वर्षात कन्या शाळेच्या इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातून स्वरांजली संदीप येळे हिने  १८४ गुणमिळवून    जाई संतोष डोईफोडे १४४ गुण मिळवून   गुणवत्ता यादीत निवड निश्चित केली आहे.त्याच बरोबर  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी ईश्वरी दिनेश मनमोडे हिने १७० गुणमिळवल्याने ती  विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे . शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवल्या बद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  निवेदिता पासलकर व पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्याना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षे करिता या विद्यार्थ्यांनीना  संतोष शिंदे , अमरसिंह नांदखिले, अश्विनी खोपे, रूपाली रणनवरे, अनिता दाभाडे, सविता मदने या शिक्षकांनी मार्गदर्शन केले .तर इयत्ता ५ वि शिष्यवृत्तीसाठी संजय भोसले, अनिता दाभाडे ,शीतल शिंदे,सविता मदने , अश्विनी खोपे यांनी मार्गदर्शन केले.

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...