Type Here to Get Search Results !

गर्भवती असलेल्या वनरक्षक महिलेला अमानुष मारहाण

 

गर्भवती असलेल्या वनरक्षक महिलेला अमानुष मारहाण 


news img

सातारा: दि.२१

         सातारा जिल्ह्यातील पळसावडे या गावाचे माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा जानकर  यानी महिन्याची गर्भवती असलेल्या वनरक्षक सिंधू सानप व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना मारहाण केली असून  याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्मायात आली आहे .या प्रकरणी  सरपंच व त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

         सिंधू सानप व त्यांचे पती सातारा जिल्ह्यात वनरक्षक म्हणून काम करतात. ते काल सातारा जिल्ह्यातील पळसावडे या गावाच्या हद्दीत गेले होते. माजी सरपंचांना न विचारता वनमजुर दुसरीकडे नेले याचा राग मनात ठेवून वन समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी या गर्भवती महिलेला मारहाण केली. या  घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजातून एकच संतापाची लाट उसळली. गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणी  माजी सरपंच यांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies