Wednesday, January 26, 2022

मांडकी येथील एकाची पिंपरे येथे लोहमार्गावर रेल्वे खाली आत्महत्या.

 मांडकी येथील एकाची पिंपरे येथे लोहमार्गावर  रेल्वे खाली आत्महत्या.



   नीरा दि.२६


     पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील एकाने पुणे मिरज रेल्वे मार्गावर पिंपरे येथे रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली आहे. रेल्वे पोलिसांनी या  व्यक्तीचा मृतदेह  ताब्यात घेतलाअसून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.


    याबाबत  रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील रेल्वेमार्गावर पिंपरे गावचे हद्दीमध्ये नीरा डावा कालव्याच्या  जवळ मांडकी  येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय  सचिन शंकर जगताप  याने आत्महत्या केली आहे.आज दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी  साडे दहा वाजलेच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे मैल नंबर 82/6 या ठिकाणी ही घटना घडली आहे. सकाळची साडे दहाची महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीच्या  वेळी निरा रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये सचिन शंकर जगताप यांचा जगीच मृत्यु झाला आहे.या घटनेचा अधिकचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured Post

'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा' - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

 'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा'  - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन  - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हा...