खळद येथे हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
जेजुरी प्रतिनिधी दि.२८
खळद (ता.पुरंदर) येथे शिवमणी क्रिकेट क्लबच्यावतीने हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काल दिनांक २७ जानेवारी रोजी या स्पर्धांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम संचालक बाळासाहेब आप्पा कामथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष अजिंक्यभैया टेकवडे, खळद गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास आबा कामथे, विद्यमान सदस्या तथा माजी उपसरपंच नम्रतामाई कादबाने, ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, उद्योगपती शिवाजी कामथे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कामथे, शिवशंभो फटाका मार्टचे विठ्ठल दादा कामथे, उद्योगपती संतोष कामथे, कुलदीप मेमाणे, वैभव कादबाने, शरद रासकर, प्रशांत रासकर, देवेंद्र कामथे, रोहित कामथे, कल्याण रासकर, संगम कामते, हर्षल रासकर, गौरव रासकर, साई कादबाने, निखिल रासकर, गर्दिश कादबाने तसेच क्रिकेटप्रेमी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.