Thursday, January 20, 2022

हडपसर नीरा पिएमपीएल बस सेवा सुरू;

 हडपसर नीरा पिएमपीएल बस सेवा सुरू;  हडपसर येथे नारळ फोडून पूजन करून बस सेवेचा करण्यात  आला शुभारंभ. बस नीरेकडे रवाना 



नीरा दि.२१


    पुरंदर तालुक्यातील बहुप्रतिक्षीत हडपसर ते नीरा या मार्गावर पीएमपीएलएमची बस सुरू करण्यात आली आहे.भाजप राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेकांनी  ही बस सुरू करण्याची मागणी केली होती.खासदार गिरीश बापट व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या. सुचने नंतर आज दिनांक २१ जानेवारी पासून ही बस सुरू करण्यात आली आहे. आज हडपसर येथून बसचे पूजन करून ही बस निरेकडे रवाना करण्यात आली.



            यावेळी नगरसेवक आबासाहेब तुपे,जीवन जाधव पंडित आप्पा मोडक, पिएमपीएलएमचे दत्तात्रय झेंडे, हडपसर आगार व्यवस्थापक गायकवाड ,भाजपचे साचींन लंबते,  निरेतील भाजप कार्यकर्ते, बाळासाहेब भोसले,योगेंद्र माने,भाऊ कुदळे, आदेश भुजबळ  इत्यादी उपस्थित होते.जेजुरी  पासून फुढे ही बस प्रथमच येत असल्याने  वाल्हे, पिंपरे आणि नीरा येथे या बसच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून ग्रामीण भागातील जनता आता या बसची वाट पाहत आहे

No comments:

Post a Comment

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...