Type Here to Get Search Results !

तहसीलदरांच्या बोगस आदेशद्वारे जमिनीचा घेतला ताबा ; सासवड येथील घटना आरपीआयचे पंकज धीवर यांची माहिती

 तहसीलदरांच्या बोगस आदेशद्वारे जमिनीचा घेतला ताबा ; सासवड येथील घटना आरपीआयचे पंकज धीवर यांची माहिती


 सासवड प्रतिनिधी दि.२७



   पुरंदर तालुक्यातील सासवड येथील जमिनीच्या सातबारावर बोगस आदेशाद्वारे नोंद करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे तालुका अध्यक्ष पंकज धीवार यांनी आज दिनांक. २७ जानेवारी रोजी माध्यमांना दिली आहे .त्यामूळे पुरंदर तालुक्यात तहसीलदारांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर होत असल्याचं पुन्हा एकदा पुढं आले आहे.


   पंकज धीवर यांनी सासवड मधील काही गटांवर करण्यात आलेल्या नोंदी संदर्भात पुरंदरच्या तहसीलदारांकडे विचारणा केली होती. या नोंदी बाबत दिलेले आदेश तहसीलदार यांनी स्वतः दिले आहेत का ? अशी विचारणा त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी हे आदेश बनावट असल्याचे म्हटले आहे.त्याच बरोबर या बाबत आपण पोलिसात तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी म्हटलय.मात्र यामुळे पुरंदर मध्ये बनावट शासकीय कागदपत्रे बनवणारी टोळी अजूनही अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.

पुरंदरला होणाऱ्या विमानतळालामुळे या भागातील जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि त्यामुळेच असे बनावट कागदपत्रे बनवून जमिनी बळकावण्याचे प्रकारही वाढले आहेत.या बाबतची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पंकज धीवर यांनी केलीय...



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies