अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल करू
नका आरपीआयचे पंकज धिवार यांची मागणी
सासवड दि.२१
राज्य शासनाच्यावतीने आनुसूचित जाती जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायद्या मध्ये कोणतेही बदल करू नयेत, अशी मागणी रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे पुरंदर तालुका अध्यक्ष
पंकज धिवार यानी केली आहे .याबाबतच एक निवेदन त्यानी आज पुरंदर दौंड चे प्रांत
अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे दिले आहे.
याबाबत धिवार म्हणाले की, राज्य सरकार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात बदल करीत आहे. अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे. कायद्या नुसार या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या मार्फत केला जातो. तो आता शासन पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षकपदाच्या अधिकाऱ्या मार्फत तपास करण्याचा बदल करीत आहे. पण असे करणे म्हणजे मुळ कायद्याचा भंग करणे होईल. यातून या कायद्याच्या मूळ उद्देशाला बगल दिली जाईल. राज्यात आणि देशात आजही दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत . अशात या कायद्यात बदल करणे योग्य होणार नाही. देशात इतर राज्यात आजही वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत तपास केला जातो. त्यामुळे सरकारने अशा प्रकारच बदल करू नये अशा प्रकारची विनंती त्यानी केली आहे. आज दिनांक २१ जानेवारी रोजी त्यानी याबाबतच निवेदन प्रांत अधिकाऱ्यांकडे दिले आहे.