आता नीरा ते राख मार्गे पीएमपीएलएमची बस सुरू करण्याची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांची मागणी.
नीरा दि.२७
पुरंदर तालुक्यात पीएमपीएलएमची बस सुरू झाल्यानंतर या बसचा येथील नागरिकांना चागला उपयोग होतोय. तालुक्यातील मुख्य मर्गाबरोबरच इतर मार्गावरही ही बस सुरू करावी अशी मागणी आता होते आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ प्रदीप खाटपे यांनी सासवडहून नीरा पर्यंत येणाऱ्या काही बस राख गुळूंचे मार्गे निरिकडे सोडाव्यात अशी मागणी केली आहे.याबाबतच्या पीएमपीएलएमकडे तशा प्रकारचे मागणी पत्र त्यांनी दिलं आहे.या भागातून बस सुरू झाल्यास येथील विध्यार्थी व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा त्यांनी म्हटलं आहे. ते आज दिनांक २७ जानेवारी रोजी माध्यमांशी बोलत होते. याबाबत त्यांनी आमदार संजय जगताप,खासदार सुप्रिया सुळे यांना ही पत्र दिले आहे.