Type Here to Get Search Results !

No title

 

आता पोलीस पाटलांना मिळणार ग्रामपंचायत कार्यालयातच कामासाठी जागा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना



सासवड दि.२७

     प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलभ करून  देण्याच्या सूचन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यानी दिल्या आहेत.तशा प्रकारचे पत्र त्यानी प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे आता नागरिकांना पोलीस पाटलांना सरपंचां प्रमाणे ग्राम पंचायत कार्यालयातच भेटता येणार आहे.

        शासनाने प्रत्येक गावात कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती केली. प्रशासनात  गाव पातळीवर पोलीस पाटलाला विशेष महत्व आहे.पोलीस पाटील हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा मानला जातो.  मात्र या पोलीस पाटलाला गावात बसण्यासाठी सध्या तरी कर्यालय नाही.त्यामुळे त्यांना पाटीलकीचा कारभार घरातून चालवावा लागतो आहे.त्यामुळे पोलीस पाटलांची आणि नागरिकांची बऱ्याच वेळा भेट होत नाही.मात्र आता पोलीस पाटील लोकांना ग्रामपंचायत कार्यालयातच भेटू शकतील. 

     याबाबत बोलताना पोलीस पाटील संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कुंजीर  म्हणाले कि पोलीस पाटलांना ग्रामास्तरावर काम करताना कार्यालयाची आवश्यकता आहे. शासनाने नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधताना पोलीस पाटलांसाठी  एक स्वतंत्र खोली बांधण्या बाबत व ती पोलीसा पाटलांना कार्यालयीन कामासाठी देण्याबाबत आदेश दिले होते. मात्र  खेडेगावात अनेक ठिकाणी अशा प्रकारे नवीन इमारती बांधल्या नाहीत. त्यामुळे पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील  व पुणे जिल्हा संघटनेच्या पदाधिकार्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधीकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यानंतर त्यानी सध्या तत्काळ पोलीस पाटलांसाठी ग्रामपंचायत कार्यालयातच एक टेबल तीन खुर्चा व एक  कपाट उपलब्द करून देण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यांचा सुचनेनुसार पोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा मिळाल्यास पाटलांना लोकाशी संपर्क ठेवणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व कार्यालयीन कामासाठी त्याचा उपयोग होणार आहे.   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies