नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास

नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास पुरंदर : नीरा ता.पुरंदर येथील प्रभाग २ मधिल एका घरात चोरी झाल्याची तक्रार नीरा पोलीसांत देण्यात आली आहे. रोख रक्कम दहा हजार, आईचे व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याची लेखी तक्रार वसीम रफीक बगवान (रा.नीरा वाई नं.२) यांनी दिली आहे. नीरा पोलीस दुरक्षेत्रात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार वसीम रफीक बगवान यांच्या घराचे बांधकाम चालू असलेया मुळे बागवान त्यांचे घरचे आई, वडील भंडारी यांच्या घरी घर भाड्याने घेऊन राहत आहे. २८ जून रोजी रात्री त्यांच्या घरातील पैसे व दागिने चोरीला गेले आहे. रोख रक्कम दहा हजार व आईचे दागिने व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेलेला आहे. बगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार आईचा दोन तोळ्याचा राणीहार, एक तोळ्यांचे दोन तीन प्रकारचे कानातले, लहान बाळाचे मनगटे, बहीणीचे अडिच तोळ्यांचा गंठण व दिड तोळ्यांचा लेक्लेस चोरांनी लंपास केल्याचे तोंडी सांगितले. या चोरीचा पोलीसांनी तपास होण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान त्याच रात्री चारच्या सुमारास संशयास्पदरीत्या एक व्यक्ती या परिसरात चालत जाताना दिसत असल्याचे दोन ठ...