धक्कादायक विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
धक्कादायक
विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ;
विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
फलटण :
राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. विठ्ठल रुक्मिनी सह माऊली माऊलीचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढपुराकडे चालली आहेत. ज्ञानोबा तुकाराम नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. याच विठुरायाच्या दर्शनाची ओढ बाळगून असलेला एका वारकरी विसाव्यासाठी थांबले. मात्र, अचानक या वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या वारकऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वडजल ते तांबेमळा दरम्यान निंबाळकर वस्ती येथे नामदेव किसन मारकड वय ८० रा. न्हावी ता. इंदापूर जिल्हा पुणे हे विश्रांती घेत होते व तेथेच झोपी गेले. पालखी पुढे निघाल्यावर नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत. त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना अंत्यसंस्कारासाठी गावी नेले. फलटण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment