भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड : महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड : महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक


राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार 



दौंड,ता.८ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमलेनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. 


संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले यांची तर निमंत्रकपदी सुयश देशमुख व सह निमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष ढमाले हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, आरोग्य व शिक्षण या मूलभूत घटकात अग्रेसर काम करीत आहे.


चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि.१४ व १५ जून २०२५ रोजी चौफुला ता.दौंड येथे होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामभाऊ नातू, आनंदा बारवकर, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, कैलास शेलार, डॉ.अशोकराव जाधव, सौ.रेश्मा जाधव आदी उपस्थित होते. 


भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुका आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, संभाजी बिर्गेडचे प्रवक्ते संतोष शिंदे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक दौंड तालुकाध्यक्ष सागर फडके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर, तानाजी केकाण, आनंद थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका अध्यक्ष नितिन दोरगे, केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


  संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण यांची दूरदर्शन आणि चित्रपट या माध्यमातून त्यांची गीते सर्वदूर लोकांपर्यंत पोहचलेली आहे. संगीतकार राम कदम, गजानन वाटावे, चंद्रशेखर गाडगीळ, अच्युत ठाकूर, रोशन सातारकर, भीमराव पांचाळे आदी संगीतकारांनी त्यांची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात कविता आलेल्या आहेत. पुणे विद्यापीठात ते बहिशाल व्याख्याते आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, मृत्युंजय स्मृती पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आणि यु आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. प्रेमशाळा कविता दर्शन या त्यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पृथ्वीराज प्रकाशन ही संस्था गेली ४० ते वर्ष ते पाहत आहेत, त्यांची 'धर्मशाळा' ,'वाहवा', 'दुनिया' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..