अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत 


ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण 


मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन 




मुंबई - अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण 2 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने विविध पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी देखील १० पत्रकारांचा मा. शरद पवार आणि मा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जवळपास ६५ वर्षे निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना "बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापुर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी आदि मान्यवरांना देण्यात आला आहे. 


  अन्य पुरस्कार आणि पुरस्कार्थी पुढील प्रमाणे 


अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठीचा शशिकांत सांडभोर पुरस्कार मुंबई तक चे अभिजित करांडे यांना, स्व. पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार अंमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना, नागोजीराव दुधगावकर पुरस्कार बीड येथील सुराज्य दैनिकाचे संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार दैनिक हेराल्डचे संपादक दिनेश केळुसकर यांना, महिला पत्रकारांसाठी असलेला सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार सिंधुदुर्ग येथील पत्रकार सीमा मराठे यांना, कृषी क्षेत्रातील पत्रकारांसाठी यावर्षी पासून सुरू करण्यात आलेला स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार अँग्रोवनचे पत्रकार बाळासाहेब पाटील यांना, मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दीचे काम उल्लेखनीय करणाऱ्या राज्यातील प्रसिद्धी प्रतिनिधींना दिला जाणारा संतोष पवार स्मृती पुरस्कार यंदा पुणे येथील पत्रकार भरत निगडे यांना देण्यात येणार आहे. 


    दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी, कलाकार भरत जाधव यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. बीधवार दि.२ जुलै २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान मुंबई येथे दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. पुरस्कार वितरण सोहळयास सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी राज्याध्यक्ष शोभा जयपूरकर,  मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई शाखा अध्यक्ष राजा आदाटे यां

नी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..