"दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची" संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील जनजागृतीची प्रभावी मोहीम

"दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची"  संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी 


आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील जनजागृतीची  प्रभावी मोहीम




सासवड दि.२४ :

        पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची शान असलेली परंपरा आहे. याच पवित्र वारीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे – "दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची" राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य शासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

चित्ररथ आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, पथनाट्य पथक, माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल वॅन आणि जनतेस सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. “संकटाला घाबरू नका, सज्ज राहा” असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिनांक १९ जून पासून वारी बरोबर प्रारंभ झालेला या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झालेली आहे. दि. ६ जुलै आषाढी एकादशी पर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.




चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रे, वारकरी परंपरेचे दर्शन, तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे.

    वारकऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त 

वारीत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन प्रमुख पालख्यांच्या मागोमाग गावागावातील लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत असतात. ही संपूर्ण वारी जिथे भक्तिभाव, कीर्तन, रिंगण, अभंग गजरात रंगलेली असते, तिथेच ही "दिंडी सजगतेची" आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेऊन शांतपणे आपले कार्य करत आहे. वारकऱ्यांनी या चित्ररथांचे आणि माहिती स्टॉल्सचे स्वागत केले असून, “सजग व सुरक्षित वारी” ही संकल्पना सर्वांच्या मनात घर करत आहे.राज्य शासनाचा स्तुत्य उपक्रम हा उपक्रम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेच्या सहभागाचा उत्कृष्ट संगम आहे. लाखो वारकऱ्यांचे या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रबोधन होत आहे. 



चौकट 


सामाजिक बांधिलकीचा आदर्श :- या उपक्रमातून केवळ आपत्ती व्यवस्थापनाची माहितीच नव्हे तर – "संकट काळात कसे वागावे, आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवावा, कोणती खबरदारी घ्यावी" यासंबंधी देखील प्रबोधन करण्यात येत आहे. वारकऱ्यांनो, सजग राहा – सुरक्षित वारी करा! जय हरी विठ्ठल! जय ज्ञानोबा- तुकोबा!....

  श्री.गिरीश महाजन, मंत्री आपत्ती व्यवस्थापन विभाग महा

राष्ट्र राज्य.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..