नीरा खोऱ्यात पावसाने घेतली गती ; चार धरणांमध्ये एकूण साठा 35.93 टक्क्यांवर
नीरा खोऱ्यात पावसाने घेतली गती ; चार धरणांमध्ये एकूण साठा 35.93 टक्क्यांवर
पुणे : नीरा खोऱ्यात मागील चोवीस तासांत समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली असून, त्यामुळे चार प्रमुख धरणांमध्ये एकूण मिळून 1.513 टीएमसी इतका नवपाणी (Inflow) झाला आहे. यामुळे धरणसाठा वाढून 35.93 टक्क्यांवर पोहोचला असून, तो गतवर्षी याच दिवशीच्या तुलनेत चारपट आहे. गतवर्षी या दिवशी केवळ 10.05 टक्के साठा होता.
नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमधील 22 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतचे तपशील पुढीलप्रमाणे
---
🔹 भाटघर धरण :
पावसाची नोंद : 4 मिमी
एकूण साठा : 231 मिमी
पाणीसाठा : 4.812 टीएमसी
टक्केवारी : 20.47%
धारणात येणारे पाणी: +599 क्यूसेक्स
---
🔹 नीरा देवघर धरण :
पावसाची नोंद : 20 मिमी
एकूण साठा : 414 मिमी
पाणीसाठा : 2.749 टीएमसी
टक्केवारी : 23.43%
धारणात येणारे पाणी : +228 क्यूसेक्स
---
🔹 वीर धरण :
पावसाची नोंद : 0 मिमी
एकूण साठा : 134 मिमी
पाणीसाठा : 8.209 टीएमसी
टक्केवारी : 87.26%
धारणात येणारे पाणी : +586 क्यूसेक्स
विसर्ग : 2000 क्यूसेक्स
NLBC : 00, NRBC : 300
---
🔹 गुंजवणी धरण :
पावसाची नोंद : 27 मिमी
एकूण साठा : 592 मिमी
पाणीसाठा : 1.594 टीएमसी
टक्केवारी : 43.19%
धारणात येणारे पाणी : +100 क्यूसेक्स
---
तुलनात्मक पाणीसाठा
चारही धरणांचा मिळून एकूण साठा : 17.365 टीएमसी
साठ्याची एकूण टक्केवारी : 35.93%
मागील वर्षी याच दिवशी साठा होता : 4.859 टीएमसी (10.05%)
पूर नियंत्रणसाठी नियोजन महत्वाचे
या वर्षी पावसाची सुरुवात समाधानकारक झाली असून, धरणांमध्ये पाणीसाठ्याची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः वीर धरण जवळपास भरल्याच्या स्थितीत असून, त्यामधून विसर्गही करण्यात येत आहे. अशा वेळी प्रशासनाने पाणी नियोजनावर अधिक भर देण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment