वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग लवकरच. कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग
वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग लवकरच.
कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग
पुरंदर :
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील सहा तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ६२.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून शुक्रवारी सकाळी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे
नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वीर धरण ६२.६० टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या १२ तासात नीरा नदीमध्ये शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून २ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये, कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आव्हान पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment