गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम

 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत


प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम 




पुरंदर दि.२५ : 

     पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावचे सुपुत्र, प्रगतशील अंजीर व सीताफळ शेती व्यावसायिक हनुमंत शिवदास लवांडे पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून मूळचे लातूरचे पण सध्या नारायणपूर येथे राहत असलेले अभिनव शंकर हलसे व अनिकेत शंकर हलसे या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

     उच्चशिक्षण घेण्याची अतोनात इच्छा असलेल्या हलसे बंधूंची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण घेणे जिकीरीचे झाले होते. हा विषय पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, हॉटेल लोणकरवाडा डायरेक्टर, शिक्षक नेते सुनील लोणकर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या १९९२ ते १९९४ अकरावी बारावी कला विभागाचा मित्र-मैत्रिणींच्या सदाबहार जिव्हाळा मित्र परिवाराला कळविला. त्या सर्वांनी हनुमंत लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या वतीने त्यांच्या शुभहस्ते सासवड मधील प्रसिद्ध हॉटेल मोहिनी येथे हलसे बंधूंना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

     शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी हनुमंत लवांडे, संतोष लोणकर, संतोष गिरमे, सतीश शिंदे, विजय कुंजीर, अरुण मोहिते, राजेंद्र कुंजीर, धनंजय गाडेकर, बाळासाहेब खेनट, दिलीप कामठे, जीवन दळवी, भाऊसाहेब जगताप, सचिन जगताप, अशोक जगदाळे, रघुनाथ ढवळे, बाळासाहेब कटके, नानासाहेब कुंभारकर, संतोष वारे,  शिवराज लोणकर व सुनील लोणकर उपस्थित होते.

    यावेळी हनुमंत लवांडे म्हणाले, आमच्या जिव्हाळा मित्र परिवाराच्यावतीने हलसे बंधूंना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याविषयी सांगण्यात आले. त्यावेळी मी तात्काळ सासवड मधील प्रियांका जनरल स्टोअर्स मधून शैक्षणिक साहित्य विकत घेऊन माझ्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून त्यांना भेट दिले. यापुढे आमचा जिव्हाळा मित्रपरिवार परिस्थितीने गरीब असणाऱ्या परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी मेहनती असणाऱ्या हलसे बंधूंना वर्षभरासाठी शैक्षणिक मदत करणार आहे.

     यावेळी अभिषेक हलसे व अनिकेत हलसे म्हणाले ,हनुमंत लवांडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला जी शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहे. आम्ही दोघे मन लावून अभ्यास करणार आहोत. आम्हाला आमच्या आयुष्यात पुढे खूप प्रगती करायची आहे.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..