Posts

Showing posts from April, 2023

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप जाहीर

Image
 नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी  चिन्ह वाटप जाहीर     आघाडीला कपबशी तर युतीला पतंग सासवड दि.२१        पुरंदर तालुका आणि बारामती तालुका तील  32 गावांमधून कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काल अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 108 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर 16 जागांच्या साठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत.यासाठी आज शुक्रवारी चिन्ह वाटप सासवड येथील निवडणूक कार्यालयात पार पडले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले, तर शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांच्या युतीच्या पॅनलला पतंग हे चिन्ह मिळाले. अपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे बंडखोर  सतीश निगडे यांना विमान हे चिन्ह मिळाले तर शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांना छत्री हे चिन्ह मिळाले.           मागील अनेक वर्षांपासून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक ही शक्यतो बिनविरोध होत होती. काही ठराविक जागा सोडल्या तर संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध होत होती. त्याकाळी जनता...

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा

Image
 मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर पुरस्कारार्थींमध्ये धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांचा समावेश मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा "दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज मुंबईत केली.. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली.. बैठकीत २०२२ चे पुरस्कार नक्की करण्यात आले.. त्यानुसार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत आदि वरिष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार दिला गेला आहे... प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.. पत्रकार शशिकांत सांडभोर या...

महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह

Image
 महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह  सासवड दि.२०      पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये अजूनही एकमत होत नसल्याने उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीतून बाहेर पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.   पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुरंदर तालुक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत. यातून एक जागा उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एक तास उरला असताना देखील याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने स्वतंत्र लढण्याचा विचार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने सकाळीच दहा उमेदवार जाहीर केले तर काँ...

नीरा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी बारामती राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर

Image
 नीरा मार्केट कमिटीच्या  निवडणुकीसाठी बारामती  राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर नीरा दि.२०  पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या निवडणुकीसाठी बारामती राष्ट्रवादी कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप निश्चित होणे बाकी आहे उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे  कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ (जागा - २ ) जगदाळे बाळासाहेब गुलाब ,गांव मुर्टी निळखे पंकज रामचंद्र ,होळ कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी मतदार संघ (जागा १)  वाबळे शरयू देवेंद्र कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जाती / जमाती मतदार संघ  गुलदगड भाऊसो विठ्ठल  ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ (जागा - १)  शिंदे बाळु सोमा

नीरा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर

Image
 नीरा मार्केट कमिटीच्या  निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर नीरा दि.२०  पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादी कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनीही पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप निश्चित होणे बाकी आहे संपूर्ण पुरंदर तालुका आणि बारामती येथील 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या वतीने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरंदर तालुक्याच्या वाट्याला आलेल्या जागा आणि त्यावरील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी जाहीर केले असून  ही यादी पुढील प्रमाणे असणार आहे  राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघ...

आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

Image
 आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट  बाजार समितीतील अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस    नीरा दि.२०               पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 142 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघारी घेणार नसल्याचं भाजपच्यावतीने सांगण्यात येतं आहे . तर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेनं ही सहभाग घेतला आहे.त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र विजयी मतदान आघाडीच्या बाजूला आहे.त्यामुळे इतर पक्ष ऐनवेळी माघारी घेतात की, निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावे लागेल.दुपारी तीन नंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल .      नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील काळात बिनविरोध किंवा का...

विजय शिवतारे यांची साखर पेरणी नक्की कशासाठी

Image
 विजय शिवतारे यांची साखर पेरणी नक्की कशासाठी  आगामी विधानसभा निवणुळीत पराभव टाळण्याचे प्रयत्न ?    नीरा दि.१६ ( राहुल शिंदे)       गेली १३ वर्ष पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामतीच्या पवार कुटुंबियांच्या नावाने खडे फोडत आले आहेत. शिवतारे यांच्या राजकारणाचा पायाच मुळात पवार विरोध आणि पवारांवरील टीका हा राहिला आहे. मात्र हेच विजय शिवतारे सध्या बारामतीचे छोटे पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना गोंजराताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवारांसमोर साखर पेरणी करताना दिसून आले आहेत.        पुरंदर तालुक्यामध्ये राजकारणाला सुरुवात केल्यानंतर पुरंदरचे माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवारांना विरोध आणि पवारांवर जहरी टीका हे राजकारणाचे सूत्र अवलंबले .पवारांनी पुरंदरचा विकास केला नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच पुरंदरची तुलना बारामतीसी केली. बारामतीतील रस्ते, बारामतीतील शिक्षण संस्था, बारामतीत झालेली बागायत शेती, बारामती मध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा याची तुलना विजय शिवतरे हे नेहमीच...

कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या हादरल्या

Image
  कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या   हादरल्या   पुणे:   यवत पोलीस  ठाण्याच्या हद्दीतील कासुर्डी (ता. दौंड) या गावात गरोदर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा खून झाला आहे किंवा काही अपघात झाला आहे , याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान , ही महिला गरोदर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कासुर्डी गावच्या हद्दीत वाहत्या कालव्यात काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. येळी एका महिलेला एक ३५ ते ४० वर्ष वय असलेली एक महिला ही पाण्यात वाहत आल्याचे दिसून आले. समोरचे दृश्य पाहून महिलांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी ही बाब गावच्या पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पंचनामा करण्यात आला. त्यानंतर यवत पोलिसांनी सदर प्रेत हे यवत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. यावेळी सदर महिला हि ७ ते ८ महिन्यांची गरोदर असल्याची ...

भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता.

Image
 भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता.   नीरा दि .१५ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. नीरा येथे डॉ .बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी सर्वत्र आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर शनिवारी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक नीरा शहरातून काढण्यात आली. सर्वोदय सोसायटी पासून या मिरवणुकीला सुरवात झाली तर बुवासाहेब चौक ,शिवाजी चौक मार्गे ही मिरवणूक पुन्हा सर्वोदय सोसायटीत येवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.     या मिरवणुकी दरम्यान सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, संदीप धायगुडे, वैशाली काळे, अनंता शिंदे, दिपक काकडे, कल्याण जेधे, विजय शिंदे, सुदाम बंडगर, आर. पी. आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, अमोल साबळे, नंदु ढावरे, हरिभाऊ जेधे यांसह लहान मुले, युवक, महिला व जेष्ठ नागरिकांनस...

तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

Image
 तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप सकाळी गावात कडकडीत बंद पाळून काढण्यात निषेध  आला मोर्चा   बारामती दि.१५      जमिनीच्या वादातून सांगवी (ता. : बारामती) येथे तीन दिवसांपूर्वी विनोद हिराचंद फडतरे (वय३०) या तरुणाचा चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बुधवारी (दि. १२) रोजी ही सकाळच्या दरम्यान घटना घडली होती. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या मयत विनोद फडतरेच्या कुटुंबीयाला पाठबळ देण्यासाठी व झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि. १५) सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. तर खून करणाऱ्या विशाल फडतरे या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी यात सहभाग घेऊन गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा मिळून सह आरोपींना कठोर शासन होण्याची मागणी यावेळी करण्यात आली.      आरोपीचे संपूर्ण ...

राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?

Image
  राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?  नवीदिल्ली दि.१५ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. अशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मु...

चक्क विधानसभेचा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरत होता पुरंदर मधील हा महाभाग

Image
 चक्क विधासभेचा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरत होता पुरंदर मधील हा महाभाग   सासवड पोलिसांची कारवाई   सासवड दि.१   पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खाजगी चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार mla असल्याचा बोर्ड लावून एक महाभाग फिरवत होता. सासवड पोलिसांनी त्याला कार सह ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला सहा हजार पाचशे रुपयांचा दंड सासवड पोलीस यांनी केला आहे. तर पोलिसांनी हा लोगो त्याच्या कारवरून हटवला असून तो जप्त करण्यात आला आहे.   याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात काही चार चाकी वाहने  गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होते. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते . पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता. परंतु ती वाहने मिळून आलेली नव्हते. आज शनिवारी सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना त्यांना यातील  क्रेेटा कार  मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. गा...

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बस दरीत कोसळून 8 ते 10 जणांचा मृत्यू

Image
   मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बस दरीत कोसळून 8 ते 10 जणांचा मृत्यू   जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर   एका खासगी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला असून यामध्ये 8 ते 10 मृत्यू झाला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनूसार जुना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे यामध्ये 40 ते 45 लोक असून यामधील सात ते आठ लोक मयत झाल्याचे व वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बापरे एकच गावात तीन ठिकाणी पडली वीज नारळाच्या झाडांनी झेतला पेट

 बापरे एकच गावात तीन ठिकाणी पडली वीज नारळाच्या झाडांनी झेतला पेट इंदापूर दि.१४  इंदापूर तालुक्यात आज शुक्रवारी देखील विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यात तालुक्यातील बेडशिंगे येथील भारत मारुती चव्हाण यांच्या तर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातील शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली आहे.याच गावात जीवननगर येथे महादेव अर्जुन शिंदे आणि आगलावे वस्ती या ठिकाणी संजय आगलावे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर देखील वीज पडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या बावडा गावात ३ तीन ठिकाणी वीज कोसळली आहे. चव्हाण हे बेडशिंगे गावातील रहिवासी असून ते शेतात राहतात. ज्या ठिकाणी वीज कोसळली त्या ठिकाणी जनावरे यांसह कुटुंबातील सदस्य देखील होते.घरातील महिला या जनावरांच्या गोठ्यात साफ सफाई करत होत्या. ०५ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान कडाक्याचा आवाज झाला.दरन्यान गोठ्यामागील नाराळाच्या झाडाने पेट घेतला होता असं भारत चव्हाण यांनी सांगितले आहे.

जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका

Image
जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका सासवड दि.१४       तालुक्यातील पुढाऱ्यांची लाथाळी आमच्यावर अन्याय करतायत अस म्हणत नुकतेच भाजपमध्ये गेलेले भानुकाका जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली आहे.सासवड येथे ते आज माध्यमांशी बोलत होते.    राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भानुकाक जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला आहे. बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.त्यांच्या या प्रवेशाने बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला फारसा फरक पडणार नसला तरी राष्ट्रवादीत फुटीचे आणि बंडाचे बीज त्यांनीं पेरले आहे.आणि भाजपला तालुक्यात हातपाय पसरायला संधी मिळाली आहे.त्यांच्या सोबत आमदार संजय जगताप यांचे कट्टर आणि मागील निवडणुकीत ज्यांनी संजय जगताप यांची बाजू नेटाने मंडळी ते प्रदीप जगताप ही भाजप मध्ये गेले आहेत.त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.यामुळे आ.संजय जगताप यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे.   ...

नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Image
 नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी  नीरा दि.१४    पुरंदर तालुक्यातील नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शुक्रवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायात कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रतिमा पुजना नंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुद्ध वंदना घेण्यात आली...     नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वच महापुरुषांच्या जयंती नियमित पनेसाजऱ्या केल्या जातात. आज शुक्रवारी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध राजकीय पक्ष वा संघटना यांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       नीरा येथे सर्वच लोक एकत्र येवून जयंती उत्सव साजरा करीत असतात.हे सामाजिक एकतेच प्रतीक असल्याचे यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटलंय...तर सरपंच तेजश्री काकडे यांनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संर्वकश सविधनामुळेच आज माझ्यासारखी महिला ...

माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचा लेटर बॉम्ब

Image
 माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचा लेटर बॉम्ब तालुक्यातील राष्ट्रवादीत खळाबळ नीरा दि.१२( राहुल शिंदे )   पुरंदर तालुक्यात सध्या एका पत्राने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.त्यातून एका पक्षातील एका नेत्याची किंवा पक्षातील अनेक नेत्यांची घुसमट बाहेर येत आहे.माजी आमदार अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा सर्वत्र होत असून सोशल मीडियातून ही याच पत्राची चर्चा सुरू आहे.मात्र यामुळे राष्ट्रवादीतील दुफळी या निमित्त पुढे आली आहे.तर येत्या १७ तारखेला अजित पवार पुरंदरच्या दौऱ्यावर असणार आहेत.त्यामुळे या पत्राचा परिणाम पुढील काळात काय होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.       पुरंदर तालुका राष्ट्रवादी म्हणजे पदाधिकाऱ्यांचा पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापक्षात पदाधिकारी जास्त आहेत .मात्र कार्यकर्त्यांची मोठी उणीव या पक्षात आहे.त्यातही या पदाधिकाऱ्यांच्या कुरघुड्या नेहमीच सुरू असतात.या पक्षाला तालुक्यात मोठा जनाधार आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे. त्याच बरोबर केवळ शरद पवार यांना विरोध करणारा सुद्धा...

पुरंदरच्या वारकरी दांपत्याला विठ्ठलाच्या चंदनऊटी पुजेचा मान

Image
 पुरंदरच्या वारकरी दांपत्याला विठ्ठलाच्या चंदनऊटी पुजेचा मान.  नीरा  दि. 13 श्री क्षेत्र पंढरपुर येथे चैत्र व वैशाख महिण्यात श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची चंदनऊटी पुजा केली जाते. वाढत्या ऊन्हाच्या उष्णतेने देवाच्या शरीराचा दाह होऊ नये यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेस चंदनऊटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. कांबळवाडी (ता. पुरंदर) येथील श्री. अरविंद काळभोर आणि सौ. रंजना काळभोर या वारकरी दांपत्याला पंढरपुर येथे चंदनऊटी पुजेचा मान मिळाला. श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान समिती, पंढरपुर यांच्या वतीने ही पुजा घेतली जाते. श्री विठ्ठलाला आणि रूक्मिणी मातेला प्रत्येकी दिड किलोचा चंदनाचा लेप लावला जातो. नविन वस्त्रे परीधान करून गोड नैवेद्य दाखवून आरती केली जाते. जवळपास दीड तास ही पुजा चालते.  अरविंद काळभोर हे शेतकरी असून गेली वीस वर्षे नियमीतपणे आषाढी वारी करतात. श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रुद्रगंगा परींचे परीसर भागवत प्रसारक दिंडीचे ते विश्वस्त म्हणुन काम पाहतात. रंजना काळभोर या गृहिणी असुन नियमीतपणे वारी करतात. काळभोर दांपत्याने चंदनऊटी पुजेचा मान मिळाल्याचे समाधान व्यक्त क...

एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न

Image
 एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न कमी पाण्यावर उत्पादन घेत तरुणाची दमदार कामगिरी     नीरा दि.११ - राहुल शिंदे    कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे या दोघ बंधूंनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत कर्नलवाडी येथील शेतात स्वीटकॉर्न मक्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. तिनं महिन्याच्या या पिका मध्ये त्यांना 1 लाख 16 हजाराचे उत्पादन मिळाले आहे. तर 98 हजाराचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.     कर्नलवाडी म्हणजे कायम पाणी टंचाई असणार गाव. अनेक वर्ष या गावातील लोकांनी दुष्काळ पहिला आहे.गावात शेती करण्या पेक्षा पुण्या मुंबईला जाऊन कोणतीतरी नोकरी करावी आणि आपले कुटुंब चालावाव हा शिरिस्ता अनेक वर्ष पासून या गावात सुरू होता. पण आता शहरातही नोकऱ्या मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील.शिकलेला तरुण आता आपल्याच शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.कर्नलवाडी येथील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे हे सुद्धा आपली शेतात वेगवेगळे प्रयोग नेहमीच करीत असतात.या पूर्वी त्यांनी...

आल्याच्या शेतीतून शेतकरी झाला लखपती

Image
 पाऊने दोन एकरात घेतले  २७  टन आल्याचे उत्पादन  सेवानिवृत्ती नंतर संभाजी काकडे यांची शेती मध्ये भरारी    नीरा दि.९        नीरा नजीक असलेल्या निंबुत येथील शेतकरी संभाजीराव काकडे Sambhajirao Kakade यांनी आपल्या शेतात आल्याचे  यशस्वी उत्पादन घेतले आहे. पहिलं वर्ष तोट्यात गेले असले तरी यावर्षी त्यांना आल्याला चांगला बाजार मिळाला आहे.यावेळी त्यांन प्रतिटन 66  हजाराचा भाव मिळाला आहे.त्यामुळे आल्या पासून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.    नींबुत येथील संभाजीराव काकडे हे सोमेश्वर विद्यालयात नोकरीला होते. 2021 मध्ये नोकरीतून निवृत्त झाले . यानंतर त्यांनी आपल्या शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरवात केली. आपल्या शेता पैकी पावणे दोन एकर शेतात त्यांनी आल्याची लागवड केली.विशेष म्हणजे पपईच्या बागेत अंतर पीक म्हणून त्यांनी हे आल्याचे पीक घेतले आहे. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ 10 हजाराचा भाव मिळाला.त्यामुळे पाहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेले. मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा पावने दोन एकर क्षेत्रात आल्याची पुन्हा लागव...

मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,

Image
-मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू, भोर दि. 10  मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं ह्या तरुणाचा मृत्यू झालाय.मोहीत हेमंत सराफ असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नावय.14 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलय. वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळच्या धिंडली  येथील एका रिसॉर्टच्या परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे.  मोहीत हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता. ७ एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली...

नांदगाव येथील भावंडांनी बनवले आईचे स्मारक

Image
 नांदगाव येथील भावंडांनी  बनवले आईचे स्मारक   भोर  दि.१०      पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नांद गावातील दोघा भावांनी, आईच्या स्मरणार्थ घरासमोर आईच स्मारक उभारलय.दिवंगत आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा बनवून, घरासमोच्या अंगणात त्याची स्थापना केलीय. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी समाजा समोर आदर्श ठेवलाय.परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचं कौतुक केलंय. भोर तालुक्यातील नांद गावाचे रहिवासी, शिक्षक असलेले सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे(मेकॅनिक) यांच्या घरकाम आणि शेती करणाऱ्या मातोश्री कै. राहीबाई गोळे (वय ६२) यांचे वर्षापुर्वी करोना मुळे बाणेर (पुणे) येथे निधन झाले. निधना नंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. परंतू आई विषयी असणारे प्रेम,श्रद्धा,भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरा समोरच मंदिर उभारून त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श त्यांनी समाजा समोर निर्माण केला आहे. ...

पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग इको कार खड्ड्यात गेल्याने दोन जण जखमी

Image
 पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग इको कार खड्ड्यात गेल्याने दोन जण जखमी सासवड दि.९ पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे  रुंदीकरणाचे काम सध्या चालू आहे. परंतु महामार्गावर  सूचनाफलक यांचा अभाव असल्याने  महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चालले आहे. त्यातच अनेक ठिकाणे रस्ते एकदमच वळवले जातात. रविवारी पहाटे असाच रस्त्याचं अंदाज न आल्याने एक कार रस्त्यावरून खाली गेली आणि  खड्यात पडली.  यामध्ये दोन वृध्द गंभीर जखमी झाले. साकुर्डे  गावानजीक भोंगळे माळा येथे हा अपघात घडलाय    सुदैवाने कोणाला मोठी   पुरंदर तालुक्यातील साकुर्डे  गावा भोंगळे मला येथे इको कार खड्ड्यात गेल्याने इको कारमधील ज्येष्ठ नागरिक यांच्या गंभीर दुखापत झाली आहे.MH 12 HF 8165 ही ईकोकार वडगाव ता.माण येथून पुणेकडे जात असताना रात्रीच्या वेळी अचानक रस्ता अरूंद झाला. त्यामुळे चालकाचा अंदाज चुकल्याने इको कार महामार्गाकडील खड्ड्यात कोसळली या अपघातात कारमधील ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व अपघाताबाबतीत हे जेष्ठ नागरिकांचे नातू अभिमन्यू माळवे यांनी...

नितीन गडकरी अतिरेक्यांच्या रडारवर ? गडकरींना ही धमकी

Image
नितीन गडकरी अतिरेक्यांच्या रडारवर ? गडकरींना ही धमकी  मुंबई दि.८ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadakari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात तब्बल 2 वेळा फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सर्तक झाल्या होत्या. तसेच नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारीचा ( jayesh Pujari ) ताबा मिळवला होता. जयेश पुजारीची वरिष्ठ पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. परंतु नितीन गडकरी हे अतिरेकी संघटनांच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीतून समोर आला आहे. जयेश पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी आणि तुरुंगात असून सुद्धा त्याच्याकडे फोन उपलब्ध होते. त्यामुळे तो आपल्या कुटुंबियांशी सातत्याने संवाद साधायचा. त्याला मांसाहारी जेवण तुरुंगात उपलब्ध करून दिले जात होते. जयेश पुजारी मागील 12 वर्षांपासून वेगवेगळ्या तुरूंगात आहे. परंतु बेळगावच्या तुरूंगात त्याला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या सर्व सोयीसुविधा कुणाच्य...

धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

Image
धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल  मुंबई दि.८  बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या विरोधात मुंबईतील (Mumbai News) वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचंही युवासेनेनं तक्रारीत म्हटलं आहे.  बागेश्वर धाम सरकारविरोधात ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास...

तेल्या भुत्याच्या कावड यात्रेतील बैलगाडीला निरा येथे अपघात : टेम्पो ने धडक दिल्याने बैल झाला गंभीर जखमी

Image
 तेल्या भुत्याच्या कावड यात्रेतील बैलगाडीला निरा येथे अपघात : टेम्पो ने धडक दिल्याने बैल झाला गंभीर जखमी   नीरा दि. ८          पुरंदर तालुक्यातील सासवड येथून शिखर शिंगणापूर यात्रेसाठी गेलेल्या सासवड येथील तेल्या भुत्याच्या कावडीचा सध्या परतीचा प्रवास सुरू आहे. ही कावड आज शनिवारी निरा येथे मुक्कामी आली. मात्र या दरम्यान या कावडीच्या यात्रेतील एका बैलगाडीला टेम्पोची जोरदार धडक बसून यातील एक बैल गंभीर रित्या जखमी झाला आहे. सुदैवाने यामध्ये दुसरं कोणीही जखमी झालं नाही. मात्र या जोरदार धडकेमुळे बैल गंभीर जखमी झाला असून तो रस्त्यातच पडला होता. यानंतर खाजगी पशुवैद्याने त्याच्यावर उपचार केले आहेत.     पुरंदर तालुक्यातून अनेक कावडी या शिखर शिंगणापूर येथे महादेवाला कऱ्हेच्या पाण्याने स्नान घालण्यासाठी जात असतात. बार्शी दिवशी धार पडल्यानंतर या कावडी आता माघारी फिरल्या आहेत सासवड येथील मानाची असलेलो तेल्या भुत्याची कावड सर्वात शेवट येत असते. ही कावड आज निरा येथे आठ वाजता मुक्कामासाठी आली. निरा येथील नगर बायपासवर या कावडीतील बैलगाड्या आल्या असताना ...

'माणुसकीचा गाव' पुस्तकाचे चौदा एप्रिल रोजी प्रकाशन

Image
 'माणुसकीचा गाव' पुस्तकाचे चौदा एप्रिल रोजी प्रकाशन     नीरा  दि.८    गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्रवीण जोशी हे माण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रवीण जोशी लिखित माणुसकीचा गाव या पुस्तकाचे प्रकाशन दहिवडी (ता.माण) येथे होणार असून यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.    शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ व ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमासाठी माण तालुका गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांसह शिक्षणविस्तार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शंकरराव भेलके महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. जगदीश शेवते, शिवछत्रपती आर्ट्स व कॉमर्स कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. वैजीनाथ राख, मिरज येथील शेठ र. वि. गोसलीया कॉलेजचे व्याख्याते प्रा. उत्तम पांढरे, विशेष सरकारी वकील ऍड. बापूसाहेब शिलवंत, ऍड. पृथ्वीराज चव्हाण, ऍड.अमोल यादव, किरण बोधे व पत्रकार परिषदेचे भरत निगडे उपस्थित राहणार आहेत.    लेखक जोशी यांनी ...

याकरणाने अजितदादां होते नॉट रीचेबल!!

Image
 याकरणाने अजितदादां होते नॉट रीचेबल!! पुणे:    जेव्हा पासून अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली तेव्हा पासून अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर जनता आणि मीडिया दोघांचेही लक्ष असते . दादांनी एखादा कार्यक्रम रद्द केला किंवा फोन बंद केला तरी लगेच दादा फुटले की काय असा प्रश्न सर्वानाच पडतो .केला पासून असाच गोंधळ राज्य भारत पाहायला मिळतोय मात्र आता खुद्द अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केलाय         " अरे बाबांनो मी काल एका कार्यक्रमा साठी जात असताना मला प्रवासातच ऍसिडिटी चा त्रास जाणवायला लागला, दोन-तीन दिवस प्रवास, कार्यक्रम, दगदग यामुळे पित्ताचा त्रास असह्य झाल्याने मी पुढचे दौरे रद्द करून डॉक्टराकडे गेलो. आणि आराम करणे पसंत केले.". " आता माध्यमांनी लगेच अजित पवार नॉट चेबल, राजकीय कारण अशा बातम्या केल्या, हे योग्य नाही. उगाच राईचा पर्वत माध्यमे करत आहेत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. दोन दिवस नोट रीचेबल असलेले अजित पवार आज पुण्यात एका खाजगी कार्यक्रमात माध्यमांना दिसले. यावेळी बोलताना दादांनी आपल्या स्टाईल मध्ये माध्यमांच्या बातम्यांवर सडकून भाष्य ...

तांबेवाडी येथील किशोर तांबे यांची निघृण हत्या

Image
तांबेवाडी येथील किशोर तांबे यांची निघृण हत्या पुणे दि. ८   बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी किशोर तांबे राहणार तांबेवाडी तालुका जुन्नर हे रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार आळेफाटा पोलीस स्थानक मध्ये देण्यात आली होती. किशोर तांबे हे बेल्हे सोसायटीचे संचालक होते त्यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत आपला अर्ज देखील नुकताच दाखल केला होता.त्यामुळे तांबे यांचा घातपात नक्की कोणत्या कारणामुळे झाला अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु झाली आहे. दरम्यान पोलिसांच्या चौकशी वरून किशोर तांबे यांचे चुलत बंधू संतोष तांबे यांनी म्हटले होते की रात्री दूध घालण्यासाठी समर्थ दूध डेअरीमध्ये किशोर तांबे व त्यांचे बंधू यांची भेट झाली होती त्या ठिकाणाहून ते दोघे घरी परतल्यानंतर किशोर तांबे हे त्यांची दुचाकी एम एच 15 सी एन 92 18 21गाडी घेऊन ते रात्री आठ वाजता शेतात जातो असे सांगून गेले होते मात्र सहा एप्रिल रोजी सकाळी पर्यंत घरी न आल्यामुळे सर्वांनी शेतात जाऊन त्यांच्या दुचाकीचा शोध घेतला परंतु मोटरसायकल ही दिसून आली नाही. अदयाप त्याचा शोध लागला नसल्याने त्यांचा पोलिसांनी श...

संसदेला टाळे, प्रशासन गुलामासारखा पायरीवर बसलेला. संजय राऊत : वृत्तपत्रासह सर्वच स्तंभ विकलेले

Image
 संसदेला टाळे, प्रशासन गुलामासारखा पायरीवर बसलेला.  संजय राऊत : वृत्तपत्रासह सर्वच स्तंभ विकलेले  कर्जत (जि. अहमदनगर) दि. ७ :         'देश हा भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे. आज न्यायालय जनतेचे राहिले नाही, ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्या सुद्धा स्वायत्त राहिल्या नाहीत, वृत्तपत्राचे मालक हे कोणा एका व्यक्तीच्या अधीन गेले आहेत. संसदेला टाळे लागल्या आहे, प्रशासन हे गुलामासारखा पायरीवर बसलेला आहे. हे सर्व पाहता समाजाला आता दिशा देण्याचे काम हे पत्रकारांना करायचे असून पत्रकारांनी आता जे काही सत्य आहे, ते समाजापुढे मांडले पाहिजे. क्रांतीची ठिणगी ज्या विचारातून पडली, तो पत्रकारांचा विचार आज अशाच पद्धतीने तेवत राहिला पाहिजे,' असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे सरकार कसले? ही तर टोळी आहे. टोळीचा एन्काऊंटर होत असतो, जनताच एन्काऊंटर करेल असा घाणाघात राज्यसरकार केला.        नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व तालुका पत्रकार संघाच्या अ...