नितीन गडकरी अतिरेक्यांच्या रडारवर ? गडकरींना ही धमकी

नितीन गडकरी अतिरेक्यांच्या रडारवर ? गडकरींना ही धमकी 



मुंबई दि.८

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadakari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात तब्बल 2 वेळा फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सर्तक झाल्या होत्या.


तसेच नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारीचा ( jayesh Pujari ) ताबा मिळवला होता. जयेश पुजारीची वरिष्ठ पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. परंतु नितीन गडकरी हे अतिरेकी संघटनांच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीतून समोर आला आहे.


जयेश पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी आणि तुरुंगात असून सुद्धा त्याच्याकडे फोन उपलब्ध होते. त्यामुळे तो आपल्या कुटुंबियांशी सातत्याने संवाद साधायचा.


त्याला मांसाहारी जेवण तुरुंगात उपलब्ध करून दिले जात होते. जयेश पुजारी मागील 12 वर्षांपासून वेगवेगळ्या तुरूंगात आहे. परंतु बेळगावच्या तुरूंगात त्याला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या सर्व सोयीसुविधा कुणाच्या माध्यमातून केल्या जात आहेत, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.


परंतु गडकरी धमकी केसचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.