बापरे एकच गावात तीन ठिकाणी पडली वीज नारळाच्या झाडांनी झेतला पेट
बापरे एकच गावात तीन ठिकाणी पडली वीज
नारळाच्या झाडांनी झेतला पेट
इंदापूर दि.१४
इंदापूर तालुक्यात आज शुक्रवारी देखील विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यात तालुक्यातील बेडशिंगे येथील भारत मारुती चव्हाण यांच्या तर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातील शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली आहे.याच गावात जीवननगर येथे महादेव अर्जुन शिंदे आणि आगलावे वस्ती या ठिकाणी संजय आगलावे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर देखील वीज पडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या बावडा गावात ३ तीन ठिकाणी वीज कोसळली आहे.
चव्हाण हे बेडशिंगे गावातील रहिवासी असून ते शेतात राहतात. ज्या ठिकाणी वीज कोसळली त्या ठिकाणी जनावरे यांसह कुटुंबातील सदस्य देखील होते.घरातील महिला या जनावरांच्या गोठ्यात साफ सफाई करत होत्या. ०५ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान कडाक्याचा आवाज झाला.दरन्यान गोठ्यामागील नाराळाच्या झाडाने पेट घेतला होता असं भारत चव्हाण यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment