Friday, April 7, 2023

याकरणाने अजितदादां होते नॉट रीचेबल!!

 याकरणाने अजितदादां होते नॉट रीचेबल!!



पुणे:

   जेव्हा पासून अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली तेव्हा पासून अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर जनता आणि मीडिया दोघांचेही लक्ष असते . दादांनी एखादा कार्यक्रम रद्द केला किंवा फोन बंद केला तरी लगेच दादा फुटले की काय असा प्रश्न सर्वानाच पडतो .केला पासून असाच गोंधळ राज्य भारत पाहायला मिळतोय मात्र आता खुद्द अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केलाय 

       " अरे बाबांनो मी काल एका कार्यक्रमा साठी जात असताना मला प्रवासातच ऍसिडिटी चा त्रास जाणवायला लागला, दोन-तीन दिवस प्रवास, कार्यक्रम, दगदग यामुळे पित्ताचा त्रास असह्य झाल्याने मी पुढचे दौरे रद्द करून डॉक्टराकडे गेलो. आणि आराम करणे पसंत केले.". " आता माध्यमांनी लगेच अजित पवार नॉट चेबल, राजकीय कारण अशा बातम्या केल्या, हे योग्य नाही. उगाच राईचा पर्वत माध्यमे करत आहेत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. दोन दिवस नोट रीचेबल असलेले अजित पवार आज पुण्यात एका खाजगी कार्यक्रमात माध्यमांना दिसले. यावेळी बोलताना दादांनी आपल्या स्टाईल मध्ये माध्यमांच्या बातम्यांवर सडकून भाष्य केले. आता माझी तब्येत ठीक नसेल तर अराम पण करू नये का? असे म्हणत माध्यमे बातम्यांची करत असलेली घाई आणि त्यामुळे जनतेत निर्माण होणारा संभ्रम यावर नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...