भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता.

 भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता.



  नीरा दि .१५


पुरंदर तालुक्यातील नीरा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. नीरा येथे डॉ .बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी सर्वत्र आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर शनिवारी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक नीरा शहरातून काढण्यात आली. सर्वोदय सोसायटी पासून या मिरवणुकीला सुरवात झाली तर बुवासाहेब चौक ,शिवाजी चौक मार्गे ही मिरवणूक पुन्हा सर्वोदय सोसायटीत येवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

    या मिरवणुकी दरम्यान सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, संदीप धायगुडे, वैशाली काळे, अनंता शिंदे, दिपक काकडे, कल्याण जेधे, विजय शिंदे, सुदाम बंडगर, आर. पी. आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, अमोल साबळे, नंदु ढावरे, हरिभाऊ जेधे यांसह लहान मुले, युवक, महिला व जेष्ठ नागरिकांनसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?