नीरा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर

 नीरा मार्केट कमिटीच्या  निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर



नीरा दि.२० 


पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादी कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनीही पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप निश्चित होणे बाकी आहे


संपूर्ण पुरंदर तालुका आणि बारामती येथील 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या वतीने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरंदर तालुक्याच्या वाट्याला आलेल्या जागा आणि त्यावरील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी जाहीर केले असून

 ही यादी पुढील प्रमाणे असणार आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजकुमार जयकुमार शहा

ग्रामपंचायत मतदारसंघातून एस सी एस टी साठी अधिकृत उमेदवार सुशांत राजेंद्र कांबळे

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार गणेश दत्तात्रय होले

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शरद नारायण जगताप ,वामन अश्रू कामठे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.


महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर यांनी वरील सर्व उमेदवार जाहीर केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार ताकतीचे व मातब्बर होते परंतु हि निवडणूक आपण महाविकास आघाडीतून लढत असल्याने ५ जागा पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. सर्वांना संधी देणे शक्य नाही तरी ज्यांना संधी मिळाली नाही असं म्हणत पक्षाच्या उर्वरित सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत ही विनंती करण्यात आली आहे


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?