Tuesday, January 31, 2023

पहा कोणी कोणी पटकावला भजन स्पर्धेमध्ये आपला नंबर

 सासवडला स्व चंदूकाका जगताप यांच्या पुण्यसमरणानिमित्त भजन स्पर्धा संपन्न... 

आंबेगाव पठारचे अष्टविनायक, पारगावचे पारेश्वर भजनी मंडळ प्रथम..... 



सासवड ( प्रतिनिधी ) :-        

    सहकारमहर्षी स्व चंदूकाका जगताप यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या आयोजनातून आणि सासवड सांस्कृतिक मंडळ व बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयोजनातून येथील संत सोपानकाका महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात दोन दिवस ( दि २९ व ३० ) भजन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोमवारी ( दि ३० ) झाले. यामधे खुल्या गटात आंबेगाव पठारचे अष्टविनायक भजनी मंडळाने तर बाल गटात पारगाव च्या पारेश्वर बाल भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

    विजेते संघ अनुक्रमे पुढीलप्रमाणे :- खुला गट - अष्टविनायक भजनी मंडळ आंबेगाव पठार, गोविंदबुवा प्रासादिक भजनी मंडळ काळदरी, ज्ञानेश्वर भजनी मंडळ हिवरे, गुरूदत्त भजनी मंडळ दरेवाडी, आणि स्वरधारा भजनी मंडळ फुरसुंगी. 



बाल गट - पारेश्वर बाल भजनी मंडळ पारगाव मेमाणे, नवखंडेनाथ बाल भजनी मंडळ गराडे, स्वरांगण बाल भजनी मंडळ पारगाव, मेघमल्हार बाल भजनी मंडळ सासवड, आणि वृंदावनी बाल भजनी मंडळ होळकरवाडी. आळंदी येथील संगित अलंकार राधाकृष्ण गरड, तबला अलंकार गणेश टाके यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. 

   आमदार संजय जगताप, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, पुरंदर नागरीचे उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी, अंकुशराव जगताप, डॉ विनायक खाडे, आनंदराव घोरपडे, प्रकाश पवार, म्हस्कू दळवी, वसंतराव शिंदे, सुनील जगताप, सविता वीरकर, कृष्णाजी देवकर, ज्ञानेश्वर भोईटे, सुधाकर गिरमे, विठ्ठल जाधव, नगरसेवक अजित जगताप, गणेश जगताप, नंदकुमार जगताप, सागर जगताप तसेच माऊली यादव, संदीप फडतरे, बाळासाहेब काळाणे, शरदचंद्र जगताप, सुनील जगताप, अनिल उरवणे, सतिश शिंदे, हरीभाऊ शिंदे, चंद्रशेखर जगताप, विश्वजीत आनंदे, धर्माजी गायकवाड, उत्तम निगडे यांच्या हस्ते दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे ११, ९, ७, ५ आणि ३ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र तसेच सहभागी संघांना ग्रामीण संस्थेच्या वतीने अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या माध्यमातून सहभागी सर्व संघांना सतरंजी भेट देण्यात आली., तसेच विजेत्या संघांना ट्रॉफी देण्यात आली. दरम्यान रविवारी संध्याकाळी स्वरसम्राट ज्ञानेश्वर देशमुख, संगीत अलंकार प्रा केशव गाडेकर, संगीत विशारद ऐश्वर्या कामथे आणि तबला अलंकार शिवानंद वैरागकर यांचा शास्त्रीय संगीताचे विशेष सादरीकरण झाले. 

      दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जवळपास नव्वद भजनी मंडळांनी सहभाग घेतला. आमदार संजय जगताप यांच्या या उपक्रमामुळे सांप्रदायिक चळवळीला बळ आणि उत्तम व्यासपीठ मिळाल्याचे स्पर्धांचे परीक्षक राधाकृष्ण गरड व गणेश टाके यांनी सांगितले. संजय काटकर यांनी सूत्रसंचलन केले. बोपगाव भजनी मंडळाचे हभप दत्तात्रय फडतरे, संदीप फडतरे, सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप, सदस्य संजय काटकर, नंदकुमार दिवसे, सागर घाटगे, दिपक जगताप, जीवन कड, मनिषा कामथे, विजय चिकणे, रोहिदास इंगळे, हरीभाऊ रायकर, मोहन नातू यांसह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मचार्‍यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या स्पर्धांच्या निमित्ताने पुरंदर - हवेलीतील भागवत सांप्रदायातील अनेक मंडळींनी हजेरी लावून या भजन स्पर्धेचा आनंद घेतला. प्रदीप पोमण यांनी आभार मानले. 


वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन..... 

स्व चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ आमदार संजय जगताप यांनी गेली पाच वर्षांपासून सुरू केलेल्या या भजन स्पर्धेमुळे पुरंदर - हवेलीतील वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्यासाठी भजनी मंडळांना आत्तापर्यंत हार्मोनियम, पकवाज, तबला, वीणा, टाळ, सतरंजी आदी साहित्य तसेच सकल गाथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे नवीन पिढीही या संप्रदायाकडे वळत असून यावर्षी २४ बाल भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला. याबद्दल आमदार संजय जगताप यांचे उपस्थित भजनी मंडळांच्या सदस्यांनी कौतुक केले. 



.

पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्यसरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

 पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या वाढीव निधीला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी



पुरंदर दि.३१


             पुरंदर, बारामती, दौंड आणि हवेली तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उप्सा सिंचन योजनेसाठी राज्य सरकारने वाढीव निधीला  मंजुरी दिली असून आता या योजनेसाठी 460 कोटी रुपयांच्या खर्चाला   सुधारित प्रशासकीय मान्य दिली आहे. याबाबतची माहिती पुरंदरचे माजी आमदार शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिली आहे. 


      सतत दुष्काळी तालुका असलेल्या पुरंदर तालुक्याला पुरंदर उपसा सिंचन योजना ही जीवनदायी ठरली आहे. त्याचबरोबर बारामती, दौंड आणि हवेलीतील काही गावांना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजनेचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून या योजनेची आणखी काही कामे मंजूर आहेत. तर काही ठिकाणी दुरुस्त करणे आवश्यक आहेत. यासाठी आज मुंबई येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत  वाढीव खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.  पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेली, दौंड, बारामती आदी तालुक्यातील शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या पुरंदर उपसा योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता आज कॅबिनेटने दिली. पुरंदर उपसा योजनेतून या चार तालुक्यातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रा सिंचनाखाली येते. यातील ३८३ कोटी रुपये आज अखेरीस योजनेवर खर्च झाले असून पाईपलाईन, दुरुस्त्या व अन्य कामांसाठी हा नवीन निधी खर्च केला जाणार आहे. 


      "पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यरत होऊन १० ते १२ वर्षे झाले आहेत. या योजनेमध्ये काही दुरुस्त करणे गरजेचे होते तर काही ठिकाणी आणखी पाईप  टाकणे गरजेचे आहे.यासाठी राज्य सरकारकडे वाढीव निधीची मागणी करण्यात आली होती. त्याला आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने या निधीला प्रशासकीय मंजूरी दिली. असून पुरंदरकरांच्यावतीने मी त्यांचे आभार मानतो."

  विजय शिवतारे ( प्रवक्ते,बाळासाहेबांची शिवसेना )

Friday, January 27, 2023

धक्कादायक ! पोटाच्या मुलीचा खून बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनीच केला खून

 धक्कादायक ! पोटाच्या मुलीचा खून

बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनीच केला खून



पुणे, दि. २७ (न्युज मराठी)


नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात ऑनर किलिंगच्या प्रकारानं खळबळ उडाली आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.


मुलीच्या प्रेमामुळे संतापलेल्या वडील, भाऊ आणि मामांनीच मुलीची हत्या केली आणि गुपचूप मृतदेह जाळून टाकला. शुभांगी जोगदंड असे मुलीचे नाव असून, ती BHMS च्या तिसऱ्या वर्षां शिकत होती.


मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय शुभांगी ही BHMS च्या


तिसऱ्या वर्षांत शिकत होती आणि तिचे गावातील एका



तरुणासोबत प्रेम जुळले. कुटुंबीयांना त्यांचं नात मान्य नव्हतं. यानंतर घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न जुळवलं, पण तिनं हे लग्न मोडलं. यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.


शुभांगीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं आणि तिची राख ओढ्यात फेकून दिली. तीन-चार दिवसांपासून गावातील मुलगी अचानक गायब झाल्यामुळे गावातील लोकांना संशय आला. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि हा धक्कादायक ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

Thursday, January 26, 2023

अत्यंत हृदयद्रावक घटना ! पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू ...

  • अत्यंत हृदयद्रावक घटना ! पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू ...



बारामती दि.२७ (प्रतिनिधी) न्युज मराठी 



बारामती तालुक्यातील चोपडज (गायकवाड वस्ती)  येथे ३ वर्षाच्या लहान मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यु झाला आहे .समर्थ रमेश गायकवाड  या. बालकाच नाव आहे. घरासमोर खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून या मुलाचा मृत्यू झाला.


काल दि २६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती  अशी की, चोपडज येथील  गायकवाड वस्ती येथे रमेश गायकवाड यांनी घरामागे नवीन बांधकाम करण्यासाठी  लागणारे पाणी साठवण्यासाठी खड्डा खांदला होता. काल दुपारच्या वेळी समर्थ याठिकाणी खेळता खेळता पाण्यात पाडला. घरच्यांनी अनेक ठिकाणी शोधधोध केल्यावर पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला.


सासवड येथे एकावर चाकू हल्ला : हल्लेखोरा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

 सासवड येथे एकावर चाकू हल्ला : हल्लेखोरा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल


जीवघेणा हल्याची महिना भारा


तील तिसरी घटना


       सासवड 

        पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एकाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले आहेत. यामध्ये 

गणेश शशिकांत जगताप हे गंभीर जखमी झाले असून सासवड पोलिसात आरोपी अरविंद भाऊसो पवार यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. अस फिर्यादीत म्हटले आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी गणेश शशिकांत जगताप जगताप हे गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजले च्या सुमारास त्यांच्या शेतात जातं असताना आरोपी अरविंद भाऊसो पवार याने त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागीतले. ते दिले नाहीत म्हणून पवार यांनी जगताप यांना शिवीगाळ करायला सुरवात केली. यानंतर फिर्यादी यांनी त्याला शिवीगाळ करू नको म्हणून समजावले मात्र त्याने त्याच्या हातातील चाकू जगताप यांच्या पोटात उजव्याबाजूला खुपसला. व त्यांना जखमी केले. जगताप यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत . यामध्ये आरोपी पवार हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 307,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत

प्रेस क्लब पुरंदर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास शुभारंभ

  प्रेस क्लब पुरंदर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास शुभारंभ



सासवड दि.२६


         पुरंदर तालुक्यातील सासवड येथे प्रेस क्लब पुरंदरच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अधक्ष जालिंदर कामठे,माजी सभापती बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.



      यावेळी अरुणअप्पा जगताप, धनंजय भोईटे,राहुल गिरमे, साकेत जगताप,महेश जगताप,गिरीश जगताप,संतोष जगताप, नंदकुमार सागर,कुंडलिक मेमाणे, सुनील लोणकर,राहुल शिंदे,निलेश जगताप,दीपक जगताप ऋषाली जगताप



    पुरंदर प्रेस क्लबचावतीने मागील वर्षापासून स्थानिक कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच पारंपारिक लोककलेचे जतन व्हावे या उद्देशाने गेल्या वर्षीपासून या सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन करण्यात येते. पुरंदर प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जगताप यांच्या संकल्पनेतून या मोहत्स्वाची सुरावात करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांचे माध्यमातून भजन,भावगीत ,लोकगीते तसेच नाट्यसंगीताच सादरीकरण केले जाते. गुरुवारी झालेल्या या सदाबहार संगीताच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. शुक्रवारी संध्याकाळी "ती परत आलीय" हे नाटक सादर करण्यात येणार असून शनिवारी "मदमस्त अप्सरा" हा लावणी व चित्रपट संगीतात आधारित कार्यक्रम होणार असल्याचे माहिती अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी दिली.


  

Wednesday, January 25, 2023

दौंड येथील हत्या कांडा बाबत पोलिसांची पत्रकार परिषद : पाहा काय म्हणतायत पोलीस


 

गुळुंचेच्या आठ दुबार मतदारांवर गुन्हे नोंद करण्याचे पोलिसांना आदेश अखेर दूध

 गुळुंचेच्या आठ दुबार मतदारांवर गुन्हे नोंद करण्याचे पोलिसांना आदेश

अखेर दूध का दूध और पाणी का पाणी झाले...



नीरा दि. २५

   गुळुंचे येथील आठ दुबार व बोगस मतदारांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिले आहेत. यासाठी सहायक निवडणूक अधिकारी उत्तम बडे यांना प्राधिकृत केले असून त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून इतर दुबार मतदारांचे धाबे दणाणले आहेत.

    नितीन निगडे व अक्षय निगडे यांनी दुबार मतदारांवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम ३१ प्रमाणे गुन्हे नोंद करण्याची मागणी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे केली होती. दरम्यान, कार्यवाही न झाल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कडाक्याच्या थंडीत दोन दिवस उपोषण केले. आमदार संजय जगताप यांनी देखील या प्रकरणात नियमाप्रमाणे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दोन महिन्यात गुन्हे नोंद न झाल्याने व्यथित होऊन निगडे यांनी प्रजासत्ताक दिनापासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खडबडून जागे होत धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईचे गुळुंचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

   दरम्यान, स्वतःच्या परिवारातील नावे कमी होऊ नयेत यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक जितेंद्र निगडे व काही ग्रामस्थ यांनी यापूर्वी प्रशासनाने वगळलेल्या नावावर हरकत घेतली होती. संचालक निगडे यांनी याबाबत अजित पवार यांना पत्र दिले होते. दरम्यान, गावकामागर तलाठी यांच्यावर कारवाई करत त्यांची विभागीय चौकशी देखील प्रस्तावित करण्यात आली. मात्र, प्रशासनाने पुन्हा मतदारांची चौकशी केल्यावर अनेक बोगस मतदार आढळले. नावे कमी करूनही ती पुन्हा नव्याने यादीत घालण्याचे उद्योगही करण्यात आले. अखेर गुन्हे नोंद करण्याचे आदेश झाल्याने दूध का दूध और पाणी का पाणी झाले असून आता बोगस नावे नोंद करणारे मतदार धास्तावले आहेत.


गुन्हे नोंद करण्याचे आदेश झालेले दुबार मतदारांची नावे -

विजयकुमार उत्तम निगडे

महेश उत्तम निगडे

निलेश दत्तात्रय निगडे

सोनाली दशरथ निगडे

श्वेता नेताजी काकडे

स्वप्नाली शिवलाल निगडे

प्रणित शिवलाल निगडे

नंदा शिवलाल निगडे


"अखेर सत्य बाहेर आले. अजून यादीत जवळपास १०० नावे दुबार असण्याची शक्यता आहे. सर्व यादीचे शुद्धीकरण करून दुबार नावे कमी न झाल्यास आता उच्च न्यायालयात जाणार आहे. संचालकांनी कितीही राजकीय ताकद वापरली तरी त्याला उत्तर देऊ."- नितीन निगडे,  

(काँग्रेस, गट प्रमुख)



Tuesday, January 24, 2023

निघोज'च्या 'त्या' सात जणांची हत्याच!! चारजण ताब्यात

 करणी बाधेतून त्या सात जणांची हत्या ?

निघोज'च्या 'त्या' सात जणांची हत्याच!! चारजण ताब्यात



दौंड:

      दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात सहा दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता या सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायकत धक्कदायक माहिती समोर आली आहे. कुटुंबातील नातेवाईंकानीच म्हणजेच चुलत भावनेचं संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. जादूटोणा केला असल्याच्या संशयातून या हत्या केल्याचे समजत असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. 


       भीमा नदी पात्रात आढळलेल्या सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चार जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


  यामध्ये मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू (५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीत आढळले होते. १७ तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज मधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते.

          परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे. त्यावरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल दुपारी 1 वाजता यवत पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत.



Tuesday, January 17, 2023

दूध वाहतूक करणाऱ्या पिकअपची दुसऱ्या पीकअप टेम्पोला पाठीमागून धडक

 दूध वाहतूक करणाऱ्या पिकअपची दुसऱ्या पीकअप टेम्पोला पाठीमागून धडक

   दोन्ही वाहनांच मोठा नुकसान



नीरा दि. १८


   पुरंदर तालुक्यातील नीरा शहारा जवळ असलेल्या पुणे पंढरपूर मार्गावर जेऊर फाटा येथे दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप टेंपोने दुसऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली आहे.यामध्ये दूध वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला असून यामुळे सुमारे दोन हजार लिटर दूध वायाला गेलं आहे. तर यामध्ये दोन्ही टेम्पोच मोठ नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही.


       याबाबत प्रत्यक्ष दर्शी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार वाल्हे बाजूकडून येणारा पिकअप टेम्पो क्रमांक एम. एच. 12 ए क्यू 9619 हा नीरा बाजूला निघाला होता. थोपटेवाडी फट्या पासूनच या टेम्पोचालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले होते.जेऊर फाट्याजवळ आल्यावर या टेम्पो ने दुसऱ्या एका टेम्पोला धडक दिली. या टेम्पो मधून चार जण प्रवास करीत होते. सुदैवाने यातील कोणालाही मोठी दुखापत झाली नाही.

मात्र यामध्ये दोन्ही टेम्पोच मोठ नुकसान झाले आहे. दूध रस्त्यावर सांडल्याने काही काळ वाहतूक थांबली होती.. मात्र नंतर स्थानिक लोकांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे. 

माजी मंत्री विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी निवड

 माजी मंत्री विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी निवड




पुरंदर दि. १८


   पुरंदर_हवेलीचे माजी आमदार ,माजी मंत्री,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे...तज्ञ सदस्य म्हनून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.


    शिवतारे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत.पुणे जिल्ह्यात त्यांनी राष्ट्रवादी विरोधात आक्रमक आघाडी घेतली आहे . पूर्वी पासूनच ते शरद पवार, अजित पवार,आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार टीका करतात.शिवतारे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मतदार संघात बांधनिही सुरू केली आहे .बारामती, इंदापूर, भोर अशा तालुक्यातून दौरे करून जनसंपर्क वाढवत राष्ट्रवादीच्या गोटात फोडा फोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवतारे हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवणीस यांचे जवळचे मानले जातात.. शिवसेनेत जरी असले तरी देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असले तर फारस आश्चर्य वाटायला नको. जिल्हा नियोजन समिती घेतल्याने शिवतारे यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क वाढणार आहे. त्यामुळे शिवतारे यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे..


थापेवाडी खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा


थापेवाडी खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा



पुणे:

 एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना २०१९ मध्ये पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथे घडली होती.कर्ज बाजारी झाल्याने चक्क स्वतच्या कारमध्ये दुसऱ्या व्यक्तीला जिवंत पेटवून देऊन स्वताच्या मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला होता. जवळ पास महिन्यांहून अधिक काळ या घटनेचा तपास सुरू होता. त्यानंतर पोलिसांना हा बनाव असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी खर्या आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. त्या आरोपीला आज शिवाजीनगर न्यायालयाने जनमाठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने थापेवाडी प्रकरण पुन्हा एकदा जागे झाल्यासारखे वाटते.



विठ्ठल चव्हाण असे जनमठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर नायायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 


याबाबत अधिक. माहिती अशी की, बारामती तालुक्यात राहणारा विठ्ठल चव्हाण हा व्यक्ती कर्जबाजारी झाला होता. या कर्ज बाजारी पणाला तो कंटाळला होता. त्याची विनायक उर्फ पिंटू ताराचंद या व्यक्तीशी ओळख झाली. ताराचंद याला दारूचे व्यसन होते. याच गोष्टीचा फायदा घेत विठ्ठल चव्हाण याने त्याला अनेकदा दारू पाजत असतं. एका दिवशी त्याला दारू पाजून पुरंदर तालुक्यातील थापेवाडी याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत स्वतच्या गाडीत आणले. त्यानंतर त्याचे कपडे स्वतः घातले आणि स्वतःचे कपडे त्याला घातले. आणि स्वतःच्या कारसह त्याला पेटवून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यावेळी पोलिसांनी घटनेचा जवळपास सखोल तपास केला. शेवटी पोलिसांच्या हा काही तरी बनाव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. आपल्यावरील कर्ज कुणी मागू नये, आपल्याला त्रास होऊ नये या उद्देशाने चव्हाण याने हा प्रकार केला. आज तीन वर्षानंतर त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन. लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Monday, January 16, 2023

खेड - शिवापूर नाक्यावर पोलिसांनी पकडलं ८किलो गांजा

 खेड - शिवापूर नाक्यावर पोलिसांनी पकडलं ८किलो गांजा 



भोर दि.१६

     पुणे सातारा महामार्गावरील खेड - शिवापूर टोलनाक्यावर संशयित कार थांबवून पोलिसांनी ८ किलो गांजा पकडलाय. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून, ८ किलो गांजा आणि वाहतूकीसाठी वापरलेली कार, असा एकूण ४ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खेडशिवापूरच्या राजगड पोलिसांनी ही कारवाई केलीय.

खेड शिवापुर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी संशयत कार थांबवून गांजा पकडला असून कारमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  खेड शिवापुर टोलनाका येथील पुणे बाजूकडून येणारी भरधाव  एच आर ५१ बि. सी. २४२४ क्रमांकाची कार सातारा बाजूकडे जात असताना राजगड पोलिसांचे वाहतूक विभाग नियत्रंणचे पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्होवाळ, अमोल सूर्यवंशी, होमगार्ड पंकज शिंदे यांनी संशयित कार थांबविली. कारची तपासणी केली असता मागील डिकीत गांजा आढळला. यातील १) ईस्माईल बाबु सय्यद, वय ३० वर्षे, रा. कनगल्ला, ता. बसवसर्कल जवळ, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, २) सैफाली शब्बीर सुतार, वय २३ वर्षे, रा. निपानी, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ३) जैनुल गजबार मुल्ला, वय ३५ वर्षे, रा. सोलापूर दर्गा गल्ली, ता.हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ४) जिआउल रेहमान रियाज मुजावर, वय २० वर्षे, रा. हरणापूरगड, ता.हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ५) आजु अजगर अल्ली खान, वय २१ वर्षे, रा. माणखुर्द, मुंबई या पाच आरोपींना पकडले आहे.

खेड शिवापूर टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. गांजा पडकलेली कार आणि आरोपींना घेऊन खेडशिवापूर चौकीत आणण्यात आलय.पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हे आरोपीची कसून चौकशी करत आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की  नाकाबंदी करीत असताना प्राप्त माहीतीतील वर्णनाची हुंडाई वेरना गाडी नं. एच. आर 51 बी.सी. 2424 ही जवळ आलेनंतर थांबवून तीला बाजुस घेवून सदर गाडीमधील इसमाकडे चौकशी केली असता चालक याचेकडे चौकशी करीता  त्याचेकडील गाडीची पाहणी केली असता मागील डीग्गी उघडून त्यामध्ये पाहणी करीत असताना एक काळे रंगाचे ट्रॅव्हलींग बॅगेमध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ ( 81,970 /- रू. किमंतीचे व वर्णनाचे गांजा प्लॅस्टीकच्या पिशवीसह एकुण वजन 8197 ग्रॅम (8 किलो 197 ग्रॅम) सदर गाडीतुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला आहे. तसेच हुंडाई वेरना गाडी नं. एच. आर 51 बी.सी. 2424 हिची अंदाजे किमंत 4,00,000/- रूपये अशी एकुण 4,81,970 /- रू. किमंतीचा अमली पदार्थ आणि गाडीसह त्यांना हस्तगत करण्यात आली आहे.आजच्या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. सदर कारवाईचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

Thursday, January 12, 2023

मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मोठे

 मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मोठे 

मुख्य  विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन 



राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क प्रमुख’ पुरस्कार देण्याची घोषणा 


मुंबई :  मराठी पत्रकार परिषद या ८५ वर्षाची संघटनेचे नियतीने दिलेले उत्तरदायित्व निभाऊन आपण भरभक्कमपणे उभी केली आहे. परिषदेमुळेच आज सर्वत्र ६ जानेवारी ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने आपण राबविलेल्या विविध उपक्रमातून संघटनेसोबतच परिषदेची मोठी चळवळ पाहून आज कृतकृत्य होण्याची संधी लाभली, त्यामुळेच भांडवलदारी मालकवर्गाची पोटदूखी वाढल्याने परिषदेमुळे मोठे झालेले चार चौघे व काहींची ‘मजबुरी’ असलेल्यांना हाताशी धरून भांडवलदारी मालकधार्जिण्या पत्रकार संघटना उभ्या केल्या जात आहेत. तरीही परिषद त्यांना पुरुन उरली असून याचे श्रेय सर्वस्वी  ‘सोशल मिडीयाचे’ आहे. परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’ हा महत्त्वाचा घटक असून पत्रकारांच्या कल्याणासाठी परिषदेची धोरणात्मक भूमिका पत्रकारांसहीत समाजसमोर पोहोचविण्याचे काम जागृतपणे प्रसिद्धी प्रमुखांनी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले.



    गुरुवारी (दि.१२) रोजी रात्री मराठी पत्रकार परिषदेचे राज्यातील पदाधिकारी व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना एस.एम.देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या ऑन लाईन बैठकीस परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते. 



      मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, आदर्श जिल्हा व तालुका संघ पुरस्कार सोहळा ५ मार्च रोजी चाकुर येथे होणार असून राज्यातील ३५४ तालुक्यातील अधिकाधिक तालुकाध्यक्षांनी या मेळाव्यास यावे. ३ मार्च रोजी पिंपरी-चिंचवड ते चाकुर या शिक्रापुर, रांजणगाव, शिरुर, पारनेर फाटा, जामखेड, पाटोदा, बीड, अंबेजोगाई, लातूर मार्गे चाकूर येथे पोहचणाऱ्या भव्यदिव्य एकता ज्योत रॅलीत आपल्या वाहनास परिषदेचा झेंडा, स्टिकर लावून मोठ्या संख्येने सामील होऊन गावागावात सरपंच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत परिषदेची भूमिका समजावून सांगावी. लाईव्ह कव्हरेज करावे असे आवाहन केले. फेब्रुवारी महिन्यात १० व ११ तारखेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण समारंभासह डिजीटल मिडीया राज्य प्रमुख अनिल वाघमारे व सरचिटणीस हाजीर मन्सुरभाई शेख यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी अखेर नगर येथे डिजीटल मिडीयाचे नियोजित राज्यव्यापी मेळाव्यात उपस्थित राहात उपक्रमशील राहण्याचे आवाहन केले. तसेच चाकुर येथील मेळाव्यात मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, रायगडचे झुंजार पत्रकार स्व. संतोष पवार यांच्या स्मरणार्थ राज्यातील एका प्रसिद्धी प्रमुखास ‘उत्कृष्ट जनसंपर्क प्रमुख’ पुरस्काराने गौरविण्यात येईल अशी घोषणा केली. या घोषित केलेल्या पुरस्कारामुळे राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अधिक जोमाने कार्यरत असल्याने चुरस दिसून येत आहे. 


    परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. कारण परिषद कुणाचीही मिंधी नाही. सरकारने ‘अ’ वर्गाच्या धनाढ्य मालकवर्गाला कामाला लावून भांडवलदारी मालकांच्या पत्रकार संघटना उभ्या करणे सुरु केले आहे. मात्र ‘ब’ आणि ‘क’ वर्गाचे मालक आपल्या संघटनेसोबत आहेत, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. परिषदेचे काम उत्तम आहे. जो उत्तम काम करेल त्याला आपोआप पोच मिळेल. त्यामुळे मराठी पत्रकार परिषद एकूणच पत्रसृष्टीत अग्रभागी आपली प्रतिमा टिकवून असल्याचे किरण नाईक यांनी नमूद केले. पुणे ते चाकुर अशा नियोजित एकता ज्योत रॅली राज्यातून १०० हुन.अधिक वाहने सहभागी होतील असे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी नमूद केले. 


मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरदजी पाबळे यांनी बैठकीच्या प्रारंभी बैठकीच्या आयोजनाबाबत भूमिका विषद केली व बैठकीचे सुत्रसंचलन केले.  राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी आभार मानले. या बैठकीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कोषाध्यक्ष विजय जोशी, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, गो.पी. लांडगे (धुळे), भरत निगडे (पुणे), सुभाष राऊत (नागपूर), संदीप कुलकर्णी (अहमदनगर), जमीर खलपे (रत्नागिरी), अमोल वैद्य (अहमदनगर), अमर राऊत (बुलढाणा), सुरेश नाईकवाडे (परभणी), संजय हंगे (बीड), मोहन चौकेकर (बुलढाणा), दिपक शिंदे (सातारा), प्रशांत साळुंके (लातुर), यशवंत पोटे (भंडारा), ॲड. दिगंबर गायकवाड (नांदेड), प्रकाश इंगोले (हिंगोली), लंकेश बारांडे (गडचिरोली), आदींसह तीस जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी यावेळी चर्चेत आपला सहभाग नोंदविला.     


Sunday, January 8, 2023

रॉकेट टाकून एकाला पेटवून देण्याचा प्रयत्न : पुरंदर तालुक्यातील घटना

 रॉकेट टाकून एकाला पेटवून देण्याचा प्रयत्न :पुरंदर तालुक्यातील घटना






      नीरा दि.८

                 इतिहासामध्ये ' काका मला वाचवा' असं आपण वाचले आहे. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे 'काका मला मारू नका' असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली आहे.. वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद आहे . पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आई सुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाली आहे.


   यासंदर्भात जेजुरी पोलिसात भारतीय दंड विधान कलम 307,324,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वागदरवाडी येथील शारदा नानासाहेब भुजबळ या महिलेन याबाबत फिर्याद दिली आहे . तीने दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी हिं घटना घडली आहे.. त्यांचा दिर आरोपी भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी त्यांचा मुलगा स्वप्नील नानसो भुजबळ यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर पेटत्या टेभ्याने त्याला मारहाण केली.. या काका पुतण्याच जमिनीवरून भांडण आहे. काकाने पुतण्याच्या जमिनीत अतिक्रमण करून ऊस लावला आहे.त्या ऊसाला तोड आल्यावर पुतण्याने हरकत घेतली .मात्र तरी देखील काकान ऊस तोडन्याचा प्रयत्न केला .ही ऊस तोड थांबवण्यासाठी पुतण्या आणि त्याची आई शेतात आले असता ही घटना घडली. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक कुंडलिक गावडे करीत आहेत.



Wednesday, January 4, 2023

*वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा*

 *वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा* 



*मोहाडी, धामणगाव, औढा नागनाथ, अमळनेर, जत, पैठण, महाड, पुरंदर तालुका पत्रकार संघ ठरले मानकरी* 


मुंबई दिनांक ५ : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराची आज येथे घोषणा करण्यात आली आहे.. लवकरच लातूर जिल्हातील चाकूर येथे होणार्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे..

राज्याच्या विविध भागातील पत्रकार संघ वर्षभर अनेक उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी जपत समाज जागृतीचे कार्य करीत असतात..समाजाकडून अशा पत्रकारांच्या किंवा पत्रकार संघाच्या कार्याची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही.. त्यामुळे देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने उत्कृष्ट कार्य करणार्या  तालुका संघांच्या कार्याचं कौतूक करण्याची परंपरा गेली सहा वर्षे सुरू केली आहे..जाणीवपूर्वक राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुरस्कार वितरण सोहळे आयोजित करून पत्रकार संघांचा यथोचित गौरव केला जातो.. .. २०२२ चे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे होणार आहेत.. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तारखेची लवकरच घोषणा करण्यात येईल असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..

प्रत्येक महसूल विभागातून एक या प्रमाणे नऊ महसूल विभागातील नऊ आदर्श तालुका पत्रकार संघांचा परिषदेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव केला जातो.. . स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे..

*यंदाचे पुरस्कार पुढील प्रमाणे*

*नागपूर विभाग* : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा

*अमरावती विभाग* : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती

*लातूर विभाग* : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली

*नाशिक विभाग* : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव

*पुणे विभाग* : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे

*कोल्हापूर विभाग* : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली

*औरंगाबाद विभाग* : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद

*कोकण विभाग* : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड

पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श तालुका पत्रकार संघाचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे..

दिवे येथे अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू

 दिवे येथे दोन मोटारसायकलची धडक  

अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी



सासवड दि.४


   पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर दिवे येथे आज बुधवारी सायंकाळी दोन मोटार सायकलची जोरदार धडक झाली. यामध्ये दिवे येथील गोकुळ कोंडीबा झेंडे या 63 वर्षीय व्यक्तीच व त्यांचा चार वर्षाचा नातु पद्मनाभ निलेश झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मोटार सायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सासवड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे .

  

    आज दुपारी झेंडे हे नातवा सोबत मोटार सायकलवरून रस्ता क्रॉस करून घराकडे जात असताना त्यांना दुसरऱ्या एका मोटारसायकल ने जोरदार धडक दिली. या अपघातात नातुं जागेवराच मृत्यूमुखी पडला. तर झेंडे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.. तर दुसऱ्या मोटार सायकलवरील दोन तरुण ही गंभीर जखमी झाले आहेत .या प्रकरणी पोलिसांनी यशवर्धन रवींद्र मगदुम रा. हडपसर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Monday, January 2, 2023

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन, पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

 

 


पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली.

गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते.पुण्यातील(Pune) खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.

जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

 

देवेंद्र फडणवीसांनी मानले होते आभार

जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या मतदानाच्या वेळी पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. मुक्ता टिळख आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती चिंताजनक असतानाही भाजपसाठी मतदान केलं होतं. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे विशेष आभार मानले होते. 22 डिसेंबर रोजी मुक्ता टिळक यांचं निधन झालं तर आज ३ जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचं वृत्त आलं. यामुळे भाजपाने दोन महत्त्वाच्या नेत्यांना गमावल्याची स्थिती आहे.

पुण्यातलं प्रभावी नेतृत्व हरपलं..

·         पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.

·         1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले.

·         त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

·         पिंपरी चिंचवडचे महापौर पद त्यांनी दोन वेळा भूषवलं तर एकदा स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले.

·         2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य बनले.

·         2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला. अपक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

·         2014 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढले. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासमोर त्यांना हार पत्करावी लागली.

·         यानंतर लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 ची विधानसभा निवडणूक लढली. विजयी झाले आणि त्यानंतरी 2019 मध्येही त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली.

 

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा

 

 


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

(Maharashtra Politics) असली असली होता है, और नकली नकली, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावलाय. संभाजीनगरमध्ये भाजपची सभा पार पडली. यावेळी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकले. मात्र, संभाजीनगर सभेच्यावेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.

जेपी नड्डा यांच्यावर शिवसेनेचा निशाणा

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि संभाजीनगर येथील दोन सभांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी एक चूक झाली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख बाळासाहेब देवरस यांचे नाव घेतले. शिवसेनेने नड्डा यांची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाले भाजप अध्यक्ष नड्डा?

आपल्या भाषणात नड्डा म्हणाले, 'ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्या विरोधात बाळासाहेब देवरस आयुष्यभर लढले त्यांना साथ दिली. स्वर्गीय देवरस हे आरएसएसचे तिसरे सरसंघचालक होते.

अंबादास दानवे यांचे नड्डांना प्रत्युत्तर

नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे नाव काय हे शिकले पाहिजे.

दानवे यांनी ट्विट केले की, 'नड्डाजी, पुढच्या वेळी महाराष्ट्रात या, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शिका. आज तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब देवरस म्हणता. ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव माहीत नाही ते त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत.

 

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द

 

 


सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.

त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला.

भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.

ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या.

सावित्रीबाई फुले यांची कारकीर्द

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.

दहावी नापास टोळीचा देशभरात धुडगूस, ओएलएक्सवरून कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

 


मुंबई : ओएलएक्सवरून जवान, पोलिस असल्याचे भासवून खरेदी करण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रासह देशभरातील १९ राज्यांतील नागरिकांना राजस्थान, उत्तर प्रदेशमधून गंडविणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांच्या 'स्पेशल २०' टीमने पर्दाफाश केला.

या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीविरोधात राज्यासह भारतातून २७० तक्रारी समोर आल्या आहेत.
सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सविता कदम, संदीप पाचांगणे यांच्यासह पोलिस नाईक सचिन सावंतसह २० जणांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पाच दिवस सुरू असलेल्या या ऑपरेशनअंतर्गत सायबर पोलिसांनी टोळीचा म्होरक्यांपैकी एक सर्वसुख खुट्टा रुजदार ऊर्फ समशू (३७, भरतपूर) यांच्यासह तुलसीराम रोडुलाल मीणा (२५, जयपूर), अजित शिवराम पोसवाल (१९, भरतपूर), इरसाद सरदार (२४, मथुरा) या चौकडीला अटक केली आहे. आरोपींकडून ९ मोबाइल फोन, ३२ विविध बँकांचे डेबिट कार्ड, चेकबुक, १ चेकबुक, ४ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३५ मोबाइल क्रमांक, ३८ आयएमईआय क्रमांक प्राप्त झाले असून त्याबाबतही अधिक तपास सुरू आहे.
सुरतहून मुंबईत बदली झालेल्या तक्रारदाराने फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. आरोपींनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे भासवून संपर्क साधला. पुढे, पैसे पाठविण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून अवघ्या दोन तासांत १२ व्यवहार त्यांच्या खात्यातील १७ लाख ८२ हजार रुपयांवर डल्ला मारला. हे प्रकरण सायबर पोलिसांकडे येताच तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पथकाने शोध सुरू केला. याच, तपासातून राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंतच्या या टोळीपर्यंत पथक पोहोचले.

असे चालते काम...
चार टप्प्यांमध्ये या टोळीचे कामकाज चालते. यामध्ये ओएलएएक्सवर नवीन येणाऱ्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्याशी बोलणारे, माहिती देणारे आणि पैसे काढणारे असे ग्रुप आहेत. प्रत्येक टप्प्यात कमिशनचे रेटदेखील ठरले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी...
नागरिकांनी ओएलएक्सवरून व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. या टोळीकडून जवान, पोलिस असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. कुठलीही खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नका. फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा. या टोळीविरोधात २६९ तक्रारी आल्या असून राज्यातील १४ तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, तेलंगणामध्ये देखील ५०० हून अधिक तक्रारी असल्याची माहिती मिळत असून ते प्रकरणदेखील तपासासाठी घेण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...