Type Here to Get Search Results !

पहा कोणी कोणी पटकावला भजन स्पर्धेमध्ये आपला नंबर

 सासवडला स्व चंदूकाका जगताप यांच्या पुण्यसमरणानिमित्त भजन स्पर्धा संपन्न... 

आंबेगाव पठारचे अष्टविनायक, पारगावचे पारेश्वर भजनी मंडळ प्रथम..... 



सासवड ( प्रतिनिधी ) :-        

    सहकारमहर्षी स्व चंदूकाका जगताप यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या आयोजनातून आणि सासवड सांस्कृतिक मंडळ व बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयोजनातून येथील संत सोपानकाका महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात दोन दिवस ( दि २९ व ३० ) भजन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोमवारी ( दि ३० ) झाले. यामधे खुल्या गटात आंबेगाव पठारचे अष्टविनायक भजनी मंडळाने तर बाल गटात पारगाव च्या पारेश्वर बाल भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

    विजेते संघ अनुक्रमे पुढीलप्रमाणे :- खुला गट - अष्टविनायक भजनी मंडळ आंबेगाव पठार, गोविंदबुवा प्रासादिक भजनी मंडळ काळदरी, ज्ञानेश्वर भजनी मंडळ हिवरे, गुरूदत्त भजनी मंडळ दरेवाडी, आणि स्वरधारा भजनी मंडळ फुरसुंगी. 



बाल गट - पारेश्वर बाल भजनी मंडळ पारगाव मेमाणे, नवखंडेनाथ बाल भजनी मंडळ गराडे, स्वरांगण बाल भजनी मंडळ पारगाव, मेघमल्हार बाल भजनी मंडळ सासवड, आणि वृंदावनी बाल भजनी मंडळ होळकरवाडी. आळंदी येथील संगित अलंकार राधाकृष्ण गरड, तबला अलंकार गणेश टाके यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. 

   आमदार संजय जगताप, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, पुरंदर नागरीचे उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी, अंकुशराव जगताप, डॉ विनायक खाडे, आनंदराव घोरपडे, प्रकाश पवार, म्हस्कू दळवी, वसंतराव शिंदे, सुनील जगताप, सविता वीरकर, कृष्णाजी देवकर, ज्ञानेश्वर भोईटे, सुधाकर गिरमे, विठ्ठल जाधव, नगरसेवक अजित जगताप, गणेश जगताप, नंदकुमार जगताप, सागर जगताप तसेच माऊली यादव, संदीप फडतरे, बाळासाहेब काळाणे, शरदचंद्र जगताप, सुनील जगताप, अनिल उरवणे, सतिश शिंदे, हरीभाऊ शिंदे, चंद्रशेखर जगताप, विश्वजीत आनंदे, धर्माजी गायकवाड, उत्तम निगडे यांच्या हस्ते दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे ११, ९, ७, ५ आणि ३ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र तसेच सहभागी संघांना ग्रामीण संस्थेच्या वतीने अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या माध्यमातून सहभागी सर्व संघांना सतरंजी भेट देण्यात आली., तसेच विजेत्या संघांना ट्रॉफी देण्यात आली. दरम्यान रविवारी संध्याकाळी स्वरसम्राट ज्ञानेश्वर देशमुख, संगीत अलंकार प्रा केशव गाडेकर, संगीत विशारद ऐश्वर्या कामथे आणि तबला अलंकार शिवानंद वैरागकर यांचा शास्त्रीय संगीताचे विशेष सादरीकरण झाले. 

      दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जवळपास नव्वद भजनी मंडळांनी सहभाग घेतला. आमदार संजय जगताप यांच्या या उपक्रमामुळे सांप्रदायिक चळवळीला बळ आणि उत्तम व्यासपीठ मिळाल्याचे स्पर्धांचे परीक्षक राधाकृष्ण गरड व गणेश टाके यांनी सांगितले. संजय काटकर यांनी सूत्रसंचलन केले. बोपगाव भजनी मंडळाचे हभप दत्तात्रय फडतरे, संदीप फडतरे, सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप, सदस्य संजय काटकर, नंदकुमार दिवसे, सागर घाटगे, दिपक जगताप, जीवन कड, मनिषा कामथे, विजय चिकणे, रोहिदास इंगळे, हरीभाऊ रायकर, मोहन नातू यांसह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मचार्‍यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या स्पर्धांच्या निमित्ताने पुरंदर - हवेलीतील भागवत सांप्रदायातील अनेक मंडळींनी हजेरी लावून या भजन स्पर्धेचा आनंद घेतला. प्रदीप पोमण यांनी आभार मानले. 


वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन..... 

स्व चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ आमदार संजय जगताप यांनी गेली पाच वर्षांपासून सुरू केलेल्या या भजन स्पर्धेमुळे पुरंदर - हवेलीतील वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्यासाठी भजनी मंडळांना आत्तापर्यंत हार्मोनियम, पकवाज, तबला, वीणा, टाळ, सतरंजी आदी साहित्य तसेच सकल गाथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे नवीन पिढीही या संप्रदायाकडे वळत असून यावर्षी २४ बाल भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला. याबद्दल आमदार संजय जगताप यांचे उपस्थित भजनी मंडळांच्या सदस्यांनी कौतुक केले. 



.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies