माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
(Maharashtra Politics) असली असली होता है, और नकली नकली, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावलाय. संभाजीनगरमध्ये भाजपची सभा पार पडली.
यावेळी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकले. मात्र, संभाजीनगर सभेच्यावेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना
मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
जेपी नड्डा यांच्यावर शिवसेनेचा निशाणा
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि संभाजीनगर येथील दोन सभांना
संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी एक
चूक झाली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी
माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख बाळासाहेब देवरस यांचे नाव घेतले. शिवसेनेने नड्डा
यांची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले भाजप अध्यक्ष नड्डा?
आपल्या भाषणात नड्डा म्हणाले, 'ठाकरे यांनी
सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्या विरोधात बाळासाहेब
देवरस आयुष्यभर लढले त्यांना साथ दिली. स्वर्गीय देवरस हे आरएसएसचे तिसरे
सरसंघचालक होते.
अंबादास दानवे यांचे नड्डांना प्रत्युत्तर
नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे
यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे नाव काय हे शिकले पाहिजे.
दानवे यांनी ट्विट केले की, 'नड्डाजी, पुढच्या वेळी महाराष्ट्रात या, तेव्हा बाळासाहेब
ठाकरे यांचे नाव शिका. आज तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब देवरस म्हणता.
ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव माहीत नाही ते त्यांच्या विचारांचा वारसा पुढे
नेऊ शकत नाहीत.

No comments:
Post a Comment