पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या वाढीव निधीला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी
पुरंदर दि.३१
पुरंदर, बारामती, दौंड आणि हवेली तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उप्सा सिंचन योजनेसाठी राज्य सरकारने वाढीव निधीला मंजुरी दिली असून आता या योजनेसाठी 460 कोटी रुपयांच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्य दिली आहे. याबाबतची माहिती पुरंदरचे माजी आमदार शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिली आहे.
सतत दुष्काळी तालुका असलेल्या पुरंदर तालुक्याला पुरंदर उपसा सिंचन योजना ही जीवनदायी ठरली आहे. त्याचबरोबर बारामती, दौंड आणि हवेलीतील काही गावांना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजनेचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून या योजनेची आणखी काही कामे मंजूर आहेत. तर काही ठिकाणी दुरुस्त करणे आवश्यक आहेत. यासाठी आज मुंबई येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत वाढीव खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेली, दौंड, बारामती आदी तालुक्यातील शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या पुरंदर उपसा योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता आज कॅबिनेटने दिली. पुरंदर उपसा योजनेतून या चार तालुक्यातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रा सिंचनाखाली येते. यातील ३८३ कोटी रुपये आज अखेरीस योजनेवर खर्च झाले असून पाईपलाईन, दुरुस्त्या व अन्य कामांसाठी हा नवीन निधी खर्च केला जाणार आहे.
"पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यरत होऊन १० ते १२ वर्षे झाले आहेत. या योजनेमध्ये काही दुरुस्त करणे गरजेचे होते तर काही ठिकाणी आणखी पाईप टाकणे गरजेचे आहे.यासाठी राज्य सरकारकडे वाढीव निधीची मागणी करण्यात आली होती. त्याला आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने या निधीला प्रशासकीय मंजूरी दिली. असून पुरंदरकरांच्यावतीने मी त्यांचे आभार मानतो."
विजय शिवतारे ( प्रवक्ते,बाळासाहेबांची शिवसेना )