पोस्ट्स

मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार. ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

इमेज
मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार.  ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात  पुरंदर :         देशाच्या पंतप्रधानपदाची ओळख पूर्वी प्रामाणिकपणा, समाजवाद आणि लोकशाही मूल्यांशी जोडली जात होती; मात्र सध्याच्या पंतप्रधानांची ओळख ‘सगळ्यात जास्त खोटं बोलणारा आणि फेकणारा नेता’ अशी झाली असल्याचा तीव्र आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरंदर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत भाजपचा कारभार म्हणजे ‘आजची औरंगजेबी प्रवृत्ती’ असल्याचे म्हटले.     पुरंदर तालुक्यातील निरा येथे झालेल्या सभेत सपकाळ  पुढं म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त पंतप्रधान अशी होती. माहिती अधिकार, अन्न सुरक्षा आणि शिक्षणाचा हक्क देत त्यांनी लोकशाही अधिक मजबूत केली. मात्र आजचे पंतप्रधान दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना दीडपट भ...

सामाजिक बांधिलकीची सशक्त ओळख : पत्रकार संजय सावंत यांना मा. साहेब प्रतिष्ठानचा कार्यगौरव पुरस्कार

इमेज
 सामाजिक बांधिलकीची सशक्त ओळख : पत्रकार संजय सावंत यांना मा. साहेब प्रतिष्ठानचा कार्यगौरव पुरस्कार जेजुरी | वार्ताहर समाजातील दुर्बल, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपत, मा. साहेब प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मानाचा कार्यगौरव पुरस्कार यंदा जेजुरी येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय सावंत यांना प्रदान करण्यात आला. श्री क्षेत्र जेजुरी येथे झालेल्या गौरवपूर्ण सोहळ्यात जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीपशेठ बारभाई व उपनगराध्यक्ष गणेशशेठ निकुडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गेल्या २६ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या पत्रकार संजय सावंत यांनी कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गरजू, वंचित व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. राज्यभरातील २३५ हून अधिक सामाजिक कार्यकर्ते, शिक...

दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी

इमेज
दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी  मुंबई :       महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असतानाच, त्या दु:खातूनच कर्तव्याचा नवा अध्याय सुरू झाला. दिवंगत दादांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी राजभवनात साध्या पण भावनिक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वैयक्तिक आघात बाजूला ठेवत, जनसेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला.         बुधवारी (दि. २८) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्याच रात्री सुनेत्रा पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळीच राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आणि सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ...

२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर

इमेज
२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर  मुंबई :         ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा झेंडा उंचावणाऱ्या पत्रकार संघांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण होणार असून, यानिमित्ताने राज्यातील तालुका अध्यक्षांचा भव्य मेळावाही संपन्न होणार आहे.       कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात सकाळी ११ वाजता हा सन्मानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.         ग्रामीण महाराष्ट्रात कार्यरत असलेले अनेक तालुका पत्रकार संघ केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत...

पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात

इमेज
पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात  पुरंदर :        पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपताच राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून खरी निवडणूक लढत सुरू झाली आहे. एकूण ८७ अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८ जागांसाठी विविध पक्षांचे व अपक्ष असे ३३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आगामी ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.        पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार (दि. २७) हा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज वैधतेनंतर तब्बल पाच दिवसांची मुदत मिळाल्याने विविध पक्षांतील नाराज उमेदवार, तसेच अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. या काळात अनेक 'अर्थपूर्ण' राजकीय घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.       आता पंचायत समितीच्या ...

पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला; अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात

इमेज
पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला; अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात  पुरंदर :       पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत वाढली असून, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही जिल्हा परिषद गटांमध्ये आता थेट लढती निश्चित झाल्या असून, ५ फेब्रुवारी रोजी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.        पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होत असून, मंगळवारी (दि.२७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघांतून तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात शिल्लक राहिले आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठीही मोठ्या प्रमाणावर अर्ज माघारी घेण्यात आल्या असून, दाखल केलेल्या अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. परिणामी आता ३३ उमेदवारांचे ...

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

इमेज
 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  बारामती :       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळ देण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी गुळूंचे (ता.पुरंदर) येथील सुरेश आनंदराव जगताप-निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.       या नियुक्तीमुळे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व खडकवासला ग्रामीण तालुक्यांची महत्त्वाची जबाबदारी सुरेश जगताप-निगडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना अधिक मजबूत करणे व तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे. नियुक्तीबद्दल संभाजी होळकर यांनी जगताप-निगडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर विश्वास व्य...